IPL 2025, SRH VS DC Highlights: आक्रमकतेची नवी व्याख्या सादर करत तुफान आक्रमणाचं धोरण अवलंबलेल्या हैदराबादला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पराभवाचा मोठा दणका दिला आहे. यंदाच्या हंगामात त्यांनी ३०० धावा फटकवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं खर पण संघ २०० धावाही करू शकला नाही. दिल्लीने पॉवरप्लेमध्येच संघाला धक्के देत ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, हेनरिच क्लासेन या पंचकाला दिल्लीने रोखलं. ज्याचं श्रेय मिचेल स्टार्कला आणि दिल्लीच्या फिल्डिंगला जातं. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. तर दिल्लीच्या संघाने सर्वच फलंदाजांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर २४ चेंडू राखून ७ विकेट्सने विजय मिळवला.

Live Updates

IPL 2025, Delhi Capitals VS Sunrisers Hyderabad Highlights

19:35 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: दिल्लीचा विजय

अभिषेक पोरेलच्या विजयी षटकराच्या जोरावर हैदराबादचा 7 विकेट्सने शानदार विजय नोंदवला.

DC vs SRH: दिल्लीचा हैदराबादवर दणदणीत विजय, ‘त्या’ पराभवाचा व्याजासकट घेतला बदला; स्टार्कचे ५ विकेट्स ठरले गेमचेंजर

18:24 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: केएल राहुल क्लीन बोल्ड

केएल राहुलने येताच मोहम्मद शमीच्या षटकात २ चौकार आणि एका षटकारासह दणक्यात सुरूवात केली. पण हैदराबादचा नवा गोलंदाज झीशान अन्सारीच्या १२व्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्वीप खेळण्याच्या नादात तो क्लीन बोल्ड झाला. राहुलने ५ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १५ धावा केल्या.

18:12 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: झीशान अन्सारीच्या खात्यात पहिली विकेट

हैदराबादचा नवा पदार्पणवीर झीशान अन्सारीने एका षटकात दोन विकेट घेत मोठी कमाल केली आहे. त्याने पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसल झेलबाद केलं. तर अखेरच्या चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद करत दुसरी विकेट मिळवली. आयपीएल कारकिर्दीतील झीशानचा हा पहिला सामना आहे. यासह दिल्लीला विजयासाठी ६० चेंडूत ६८ धावांची गरज आहे.

18:07 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: फाफ डू प्लेसिसचं झंझावाती अर्धशतक

फाफ डू प्लेसिसने २६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना फाफचं हे पहिलं अर्धशतक आहे. यासह दिल्लीने ९ षटकांत ८१ धावा केल्या आहेत. यासह दिल्लीला विजयासाठी ६६ चेंडूत ८३ धावांची गरज आहे.

17:54 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: पॉवरप्ले

दिल्ली कॅपिटल्सने शानदार सुरूवात करत पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ५२ धावा केल्या आहेत. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये जेक फ्रेझर मॅकगर्कचे दोन झेल सोडले. दरम्यान मॅकगर्क १५ धावा तर फाफ डु प्लेसिस १८ चेंडूत ३२ धावा करत नाबाद आहेत.

17:32 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: दिल्लीच्या डावाला सुरूवात

हैदरबादने दिलेल्य १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीचा संघ उतरला आहे. दिल्लीकडून जेक फ्रेझकर मॅकगर्क आणि फाफ डे प्लेसीची जोडी फलंदाजीला उतरणार आहे. पहिल्याच षटकात दिल्लीने २ धावा केल्या.

17:13 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: सनरायझर्स हैदराबाद ऑल आऊट

मिचेल स्टार्कच्या १९व्या षटकात सनरायझर्स हैदराबाद संघाने २ विकेट्स गमावले आणि संघ सर्वबाद झाले. दुसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने हवेत झेप घेत एक कमालीचा झेल टिपला. तर चौथ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसने देखील सारखाच झेल टिपला आणि अशारितीने मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये पहिल्यांदा ५ विकेट्स घेतले आहेत. यासह हैदराबादचा संघ १६३ धावा करत सर्वबाद झाला आणि दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य दिले आहे.

16:58 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: अनिकेत वर्मा झेलबाद

हैदराबाद संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेत असलेल्या अनिकेत वर्माच्या रूपात हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने झटपट विकेट गमाले होते पण अनिकेतने एकाट्याने संघाचा डाव सावरला होता. पण कुलदीपच्या षटकात मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. पण यामध्ये जेक फ्रेझर मॅकगर्कने सीमारेषेवर एक कमालीचा झेल टिपला. यासह अनिकेत वर्मा ४१ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ७४ धावा करत बाद झाला. यासह हैदराबादने १६ षटकांत ८ बाद १४९ धावा केल्या आहेत.

16:48 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: अनिकेत वर्माचं पहिलं आयपीएल अर्धशतक

अनिकेत वर्माने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा करत आपलं आयपीएलमधील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. अनिकेतेने मोक्याच्या क्षणी येत सनरायझर्स संघाचा डाव सावरला आहे. अनिकेत मैदानात कायम असून तो चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आहे. अनिकेतचं अर्धशतक होताच पुढच्या चेंडूवर पॅट कमिन्स कुलदीपच्या चेंडूवर झेलबाद झाला.

16:41 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: कुलदीपची फिरकी

कुलदीप यादवच्या १२व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अभिनव मनोहर मोठा खेळण्याच्या प्रयत्नात ४ धावा करत बाद झाला. यासह हैदराबादने १२ षटकांत ६ बाद ११९ धावा केल्या आहेत.

16:39 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: क्लासेन बाद

मोहित शर्माने ११व्या षटकात अनिकेत वर्मा आणि हेनरिक क्लासेनची ७७ धावांची शानदार भागीदारी तोडली. यासह दिल्लीला पाचवी विकेट मिळवून दिली. मोहित शर्माच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विपराज निगमने एक कमालीचा झेल टिपत महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं. क्लासेन १९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा केल्या. यासह हैदराबादने ११ षटकांत ५ विकेट्स गमावत ११५ धावा केल्या.

16:25 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: अनिकेत-क्लासेनने सावरला संघाचा डाव

पॉवरप्लेमध्ये हैदराबादने ४ बाद ५८ धावा केल्या होत्या. पण अनिकेत वर्मा आणि क्लासेनच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने ९ षटकांमध्ये ९८ धावा केल्या आहेत. अनिकेत वर्माने प्रत्येक षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत फलंदाजी केली. अनिकेत वर्मा २१ चेंडूत ४० धाा तर क्लासेन १५ चेंडूत २४ धावा करत खेळत आहे.

16:04 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: ट्रॅव्हिस हेड बाद

मिचेल स्टार्कच्या स्पेलमधील तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर स्टार्कने मोठी विकेट मिळवली. पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेड झेलबाद झाला. चेंडू हेडच्या ग्लोव्ह्जला लागला आणि थेट राहुलच्या हातात गेला आणि दिल्लीला चौथी विकेट मिळाली. यासह हैदराबादने पाच षटकांत ४ बाद ५० धावा केल्या आहेत.

15:48 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: स्टार्कच्या खात्यात पहिली विकेट

मिचेल स्टार्कच्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इशान किशन झेलबाद झाला. इशान किशन २ धावा करत बाद झाला. तर याच षटकात मिचेल स्टार्कला त्याच षटकात दुसरी विकेट मिळाली. नितीश रेड्डी खातेही न उघडता स्टार्कच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना झेलबाद झाला.

15:39 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: दिल्लीला पहिल्याच षटकात मिळाली विकेट

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला चांगलाच फटका बसला आहे. हेडने मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात दोन चेंडूवर दोन चौकार लगावत वादळी सुरूवात केली. यानंतर पाचव्या षटकात हेडने चेंडू खेळत एकेरी धाव घ्यायला निघाला आणि अभिषेकने धाव नाकारली. पण तितक्यात हेड अर्ध्या क्रिझवर आला आणि तोवर विपराज निगमने झटपट अभिषेकला धावबाद केलं.

https://twitter.com/Sbettingmarkets/status/1906287343059038596

15:17 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: दिल्ली संघात कोण कोण?

करुण नायर, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव</p>

15:14 (IST) 30 Mar 2025

आशुतोष शर्माकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा

आशुतोष शर्माने लखनौविरुद्ध थरारक खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्याकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा आहेत. लेकीच्या जन्मामुळे के.एल.राहुल पहिल्या लढतीत खेळू शकला नव्हता. तो संघात परतला आहे. तो कुठल्या क्रमांकावर खेळणार याविषयी उत्सुकता आहे.

15:11 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबादने वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंगच्या जागी फिरकीपटू झीशान अन्सारीला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं आहे.

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

15:10 (IST) 30 Mar 2025
DC vs SRH Live: दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात केएल राहुल परतला असून समीर रिझवी प्लेईं इलेव्हन बाहेर झाला आहे.

जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

15:03 (IST) 30 Mar 2025

DC vs SRH Live: नाणेफेक

सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याची नाणेफेक हैदराबाद संघाने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरणार आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे.

14:45 (IST) 30 Mar 2025

हॅरी ब्रूकने आयपीएलमधून माघार का घेतली?

हॅरी ब्रूकला दिल्लीने लिलावात विकत घेतलं पण इंग्लंडचं कर्णधारपद मिळण्याची शक्यता असल्याने त्याने माघार घेतली. आयपीएलच्या नव्या नियमानुसार त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

14:08 (IST) 30 Mar 2025

IPL 2025 DC VS SRH Live Updates: दिल्लीने सर्वाधिक पैसा कोणत्या खेळाडूंवर खर्च केला?

IPL 2025 DC VS SRH Live Updates : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने एकूण ७२.८० कोटी रुपये खर्च केले. दिल्ली संघाने केएल राहुल, मिचेल मार्श आणि टी नटराजन यांच्यावर सर्वाधिक पैसा खर्च केला. दरम्यान रिपोर्ट्सनुसार केएल राहुलने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिल्याने अक्षर पटेलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली.

13:47 (IST) 30 Mar 2025

दिल्ली कॅपिटल्स संघानेही एक मजबूत संघ निर्माण केला

आयपीएल २०२५ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघानेही एक मजबूत संघ निर्माण केला आहे. यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी अक्षर पटेलवर असेल. तर संघाचा उपकर्णधार फाफ डू प्लेसिस असणार आहे. लिलावापूर्वी संघाने ऋषभ पंतला रिलीज करत कुलदीप यादव, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक परेल यांना रिटेन केलं होतं.

Delhi Capitals VS Sunriserse Hyderabad LIVE Match Updates

हेनरिच क्लासन (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)