IPL 2025 Fire at Hyderabad Hotel Where SRH team Staying: आयपीएल २०२५ मध्ये चार सामने गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने अखेर पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. हैदराबादने घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजीची झलक दाखवत संघाला मोठा विजय मिळवून दिला. अभिषेक शर्माने या सामन्यात शतक झळकावलं होतं. घरच्या मैदानावरील सामन्यानंतर हैदराबादचा संघ हैदराबादमध्येच थांबला आहे. पण दरम्यान संघ ज्या हॉटलेमध्ये थांबला आहे. त्या हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील पार्क हयात हॉटेलमध्ये सोमवारी एक किरकोळ आगीची घटना घडली, जिथे सनरायझर्स हैदराबाद (SRH) इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघाचे खेळाडू थांबले होते. आलिशान हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्पामध्ये ही आग लागली. आगीची दुर्घटना घडली तेव्हा टीम हॉटेल परिसरातून बाहेर पडत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल कर्मचाऱ्यांनी आग तातडीने विझवली आणि कोणलाही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. कोणतंही मोठे नुकसान न होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या पाहुण्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतेही नुकसान झाले नाही, याची माहिती अधिकाऱ्यांनी केली आहे.

हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या स्पाच्या स्टीम रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागल्यानंतर, भरपूर धूर येऊ लागला. आगीच्या घटनेच्या वेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या स्पाच्या स्टीम रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागल्यानंतर, भरपूर धूर येऊ लागला. आगीच्या घटनेच्या वेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव, सनरायझर्स हैदराबाद टीमला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे, असे काही माध्यमांनी वृत्त दिले आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा पुढील सामना मुंबई इंडियन्स संघाशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ मुंबईत पोहोचणार आहे, तर हा सामना १७ एप्रिलला खेळवला जाईल.