IPL 2025 Full list of captains of all Teams: आयपीएलचा १८ वा सीझन येत्या २२ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये सर्व संघ अनेक नव्या चेहऱ्यांसह मैदानात उतरताना दिसणार आहेत. याचबरोबर काही संघांचे कर्णधारदेखील नवे आहेत. दरम्यान या सीझनसाठी सर्व १० संघांचे कर्णधार निश्चित करण्यात आले आहेत. सर्वजण दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असणार या प्रतिक्षेत होते, पण आता दिल्लीनेदेखील घोषणा करत ही प्रतिक्षा संपवली. पाहूया आयपीएल २०२५ साठीच्या सर्व १० संघांचे कर्णधार…
आयपीएल २०२५ मध्ये विशेष म्हणजे एकूण ५ संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. त्याचबरोबर या लीगमध्ये ९ संघांचे कर्णधार हे भारतीय खेळाडू आहेत तर एका संघाचा कर्णधार विदेशी खेळाडू असेल. आयपीएल २०२५ पूर्वी मोठा लिलाव झाला होता, ज्यामध्ये सर्वचं संघांचं चित्र बदललं आहे.
IPL 2025 पूर्वी, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी नवीन कर्णधारांची निवड केली आहे. दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या हाती असेल. त्याचबरोबर ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तर गतवर्षीचा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा कर्णधार असणार आहे. आरसीबीने कर्णधारपदाची धुरा रजत पाटीदारवर सोपवली आहे. तर केकेआरने मोठा निर्णय घेत अनुभवी अजिंक्य रहाणेला संघाचा कर्णधार केलं आहे.
IPL 2025 साठी पाच संघांनी त्यांचे कर्णधार कायम ठेवले आहेत. ज्यात चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
मुंबई इंडियन्सनेही हार्दिक पांड्याला कर्णधारपदी कायम ठेवले आहे. त्याचवेळी संजू सॅमसन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. दुसरीकडे, पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असेल, जो या हंगामात एकमेव विदेशी कर्णधार आहे. कर्णधारपदाच्या बाबतीत पॅट कमिन्स हा सर्वात वरिष्ठ असल्याचे दिसून येते.
पॅट कमिन्स सध्या दुखापतीशी झुंजत आहे. तो आयपीएलपर्यंत फिट होण्याची अपेक्षा आहे. घोट्याच्या दुखापतीनंतर पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेतही खेळू शकला नाही. मात्र, आता तो आयपीएल २०२५ मध्ये पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएल २०२५ मधील सर्व संघांचे कर्णधार (Full List of IPL 2025 Captains)
चेन्नई सुपर किंग्स (CSK) – ऋतुराज गायकवाड
लखनौ सुपर जायंट्स (LSG) – ऋषभ पंत
राजस्थान रॉयल्स (RR) – संजू सॅमसन
सनरायझर्स हैदराबाद (SRH) – पॅट कमिन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) – रजत पाटीदार
पंजाब किंग्स (PBKS) – श्रेयस अय्यर
दिल्ली कॅपिटल्स (DC) – अक्षर पटेल</p>
मुंबई इंडियन्स (MI) – हार्दिक पांड्या
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – अजिंक्य रहाणे</p>
गुजरात टायटन्स (GT) – शुबमन गिल