IPL 2025, GT VS DC Highlights: गुजरात टायटन्स संघाने जोस बटलरच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या बळावर २०४ धावांचं लक्ष्य पार केलं.
IPL 2025 Gujarat Titans vs Delhi Capitals Highlights: गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
टेवाटियाचा चौकार, षटकार- गुजरात विजयी
शेवटच्या षटकात १० धावांची आवश्यकता असताना राहुल टेवाटियाने मिचेल स्टार्कला षटकार आणि चौकार लगावत गुजरातला शानदार विजय मिळवून दिला.
४३ धावांची खेळी करून रुदरफोर्ड बाद
४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून शेरफन रुदरफोर्ड तंबूत परतला. मुकेश कुमारने त्याला बाद केलं.
स्टार्कच्या षटकात बटलरने केली ५ चौकारांची लूट
अनुभवी मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जोस बटलरने ५ चौकारांची लयलूट केली.
रुदरफोर्डची षटकारांची बरसात
शेरफन रुदरफोर्डने षटकारांची लयलूट करत जोस बटलरला चांगली साथ दिली आहे. धावगतीचं आव्हान आवाक्याबाहेर जाणार नाही याची शेरफनने काळजी घेतली आहे.
सुदर्शन बाद; कुलदीपने मिळवून दिलं दिल्लीला यश
गुजरात टायटन्सचा बिनीचा शिलेदार साई सुदर्शनला कुलदीप यादवने तंबूत परतावलं. ट्रिस्टन स्टब्जने त्याचा झेल टिपला. त्याने ३६ धावा केल्या.
साई सुदर्शन सुसाट
दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत साई सुदर्शनने जोरदार सुरुवात केली आहे.
शुबमन गिल रनआऊट
करुण नायरच्या अचूक थ्रोच्या बळावर शुबमन गिल रनआऊट झाला. मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याचा शुबमनचा प्रयत्न फसला. त्याने ७ धावा केल्या.
दिल्लीने ओलांडला दोनशेचा टप्पा
करुण नायर (३१), के.एल.राहुल (२८), अक्षर पटेल (३९), ट्रिस्टन स्टब्ज (३१) आणि आशुतोष शर्मा (३७) या पाच फलंदाजांच्या उपयुक्त खेळींच्या बळावर दिल्लीने २०३ धावांची मजल मारली. गुजराततर्फे प्रसिध कृष्णाने ४ विकेट्स पटकावल्या.
जोस बटलरचा अफलातून झेल; विपराज निगम माघारी
प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर विपराज निगमने चेंडू थर्डमॅनच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न केला पण विकेटकीपर जोस बटलरने उजवीकडे झेपावत अफलातून झेल टिपला. प्रसिधने दोन चेंडूत दोन विकेट्स पटकावल्या आहेत.
कृष्णाने दूर केला अक्षरचा अडथळा
वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या अक्षर पटेलला बाद केलं. अक्षरने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी केली.
ट्रिस्टन स्टब्ज तंबूत
मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्कूपचा फटका खेळताना ट्रिस्टन स्टब्ज बाद झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली.
GT vs DC Live:पावरप्लेमध्ये दिल्लीची हवा
दिल्लीच्या फलंदाजांनी पावरप्लेच्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी केली. ६ षटकात दिल्लीने ७० धावांचा पल्ला गाठला आहे.
GT vsDC: दिल्लीचं अर्धशतक पूर्ण
या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजाठी मैदानात आला आहे. दिल्लीला अभिषेक पॉरेलने चांगली सुरुवात करुन दिली. मात्र तो स्वस्तात बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या ५० पार पोहोचवली.
GT vs DC Live: दिल्लीच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल! स्टार फलंदाजाला बसवलं
अभिषेक पोरेल, करुण नायर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्राज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
GT vs DC Live: या सामन्यासाठी अशी आहे गुजरात टायटन्सची प्लेइंग ११
साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अर्शद खान, साई किशोर, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.