IPL 2025, GT vs MI Highlights Match Updates: गुजरातने साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९६ धावांची मजल मारली. शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी उपयुक्त खेळी करत त्याला चांगली साथ दिली. सूर्यकुमार यादवच्या ४८ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरातच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत मुंबईला रोखलं. गुजरातने ३६ धावांनी हा मुकाबला जिंकला.

Live Updates

MI VS GT Highlights IPL 2025: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सचा सामना करायचा आहे.

19:01 (IST) 29 Mar 2025
GT vs MI Live: नाणेफेक

मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याची नाणेफेक मुंबई संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या संघात परतला आहे.

https://twitter.com/IPL/status/1905977327671976263

19:00 (IST) 29 Mar 2025

गुजरातच्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश?

हार्दिक बाजूला झाल्यानंतर शुबमन गिल गुजरातचा कर्णधार झाला. सातत्याने विकेट्स पटकावणं आणि धावांची गती रोखणं यामध्ये रशीद खान निपुण आहे. संघाने रशीद खानला ताफ्यात राखत सर्वाधिक किंमत दिली आहे. जेतेपद मिळवून देण्यात फिनिशरची भूमिका बजावणारा डेव्हिड मिलरला मात्र संघाने रामराम ठोकला आहे. मोहम्मद शमीची दुखापत लक्षात घेता संघाने त्याला रिलीज केलं आहे. याचबरोबर कर्णधार शुबमन गिल, उत्कृष्ट फलंदाज साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना रिटेन केलं आहे.

गुजरात टायटन्स

शुबमम गिल (कर्णधार), रशीद खान, अनुज रावत, जोस बटलर, कुमार कुशाग्र, शेरफन रुदरफोर्ड, ग्लेन फिलीप्स, साई सुदर्शन, शाहरुख खान, करीम जनत, महिपाल लोमरुर, निशांत सिंधू, मानव सुतार, राहुल टेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, गेराल्ड कुत्सिया, गुरनीर ब्रार, कुलवंत खेजरोलिया, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कागिसो रबाडा, साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव.

18:14 (IST) 29 Mar 2025

गुजरात टायटन्सने या खेळाडूंना केलं रिटेन

गुजरात टायटन्सने अपेक्षित अशा खेळाडूंना रिटेन केले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावण्याची किमया केली. दुसऱ्या हंगामातही त्यांनी सातत्यपूर्ण खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्यापासून जेतेपद हिरावलं. हार्दिक पंड्याला केंद्रस्थानी ठेऊन गुजरातने संघाची बांधणी केली होती. मात्र मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला ट्रेडऑफमध्ये आपल्याकडे समाविष्ट केलं.

17:23 (IST) 29 Mar 2025

मुंबईच्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश? असा आहे संघ

मुंबईने ट्रेंट बोल्टच्या रुपात डावखुरा वेगवान गोलंदाज ताफ्यात सामील केला. बोल्टसाठी मुंबईला १२.५० कोटी रुपये मोजावे लागले. काही वर्षांपूर्वी बोल्ट मुंबईकडेच होता. वानखेडेवर बुमराह आणि बोल्ट यांना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी असेल. याशिवाय मुंबई इंडियन्सने चेन्नईच्या ताफ्यातील वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी मोठी बोली लावली. मुंबईने चहरला ९.२५ कोटींना संघात सामील केलं आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकीपटू गझनफरला ४.८० कोटींना खरेदी केलं, पण गझनफर दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. अफगाणिस्तानच्या मुजीब रहमानला बदली खेळाडू म्हणून संघात सामील केलं आहे.

मुंबई संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर

17:01 (IST) 29 Mar 2025

मुंबईने रिटेन केलेल्या पाचही खेळाडूंनी भूषवलंय टीम इंडियाचं कर्णधारपद

मुंबई संघाने आयपीएलपूर्वी संघातील पाच मुख्य खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. मुंबई संघाने जसप्रीत बुमराहला १८ कोटींच्या सर्वाधिक किंमतीसह संघात कायम ठेवलं आहे. यासह मुंबईने लिलावात मोठी चतुराईने खरेदी केली. मुंबईने रिटेन केलेल्या पाचही खेळाडूंनी भारताच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.

16:27 (IST) 29 Mar 2025

मुंबई इंडियन्स की गुजरात टायटन्स? पहिला विजय कोणाच्या पदरात पडणार?

मुंबई आणि गुजरात हे दोनही संघ हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. चेन्नईविरुद्धच्या लढतीत मुंबईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे सलग १३व्या हंगामात सलामीची लढत गमाविण्याची नामुष्की मुंबई संघावर ओढवली. आता कर्णधाराच्या पुनरागमनानंतर कामगिरी उंचावण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, गुजरातला पंजाब किंग्जविरुद्ध मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात ११ धावांनी पराभव पत्करावा लागला.

16:09 (IST) 29 Mar 2025

हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्ससमोर गुजरात टायटन्सचं आव्हान

सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ विजयपथावर येण्यासाठी उत्सुक असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये आज, शनिवारी होणाऱ्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत कर्णधार हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाने त्यांना बळ मिळणार आहे.

IPL 2025, Gujarat Giants vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स