IPL 2025 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Match Highlights: या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांकडून शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर फलंदाजांनीही शानदार फलंदाजी केली. नाणेफेक गमावून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला २० षटकअखेर १५९ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक पॉरेलने अर्धशतकी खेळी केली. तर शेवटी केएल राहुलनेही अर्धशतक झळकावलं आणि षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
\
IPL 2025, LSG vs DC Highlights
LSG vs DC Live: अभिषेक पॉरेलचं अर्धशतक पूर्ण
या डावात १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या अभिषेक पॉवेलने संघाला दमदार सुरूवात करून दिली. धावांचा पाठलाग करत असताना त्याने केएल राहुलने मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली यासह ३३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
LSG vs DC Live: दिल्लीची दमदार सुरुवात! राहुल- पॉरेलची जोडी जमली
दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १६० धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीकडून केएल राहुल आणि पॉरेलची जोडी जमली आहे. या दोघांनी संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं आहे.
LSG vs DC Live: लखनऊची दमदार सुरूवात, पण शेवटी डाव गडगडला; दिल्लीसमोर जिंकण्यासाठी १६० धावांचे आव्हान
या डावात लखनऊ सुपर जायंट्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र या संघाला हवा तसा शेवट करता आला नाही. मिचेल मार्श आणि एडन मार्करमने चांगली सुरुवात करूनही लखनऊला २० षटकअखेर १५९ धावा करता आल्या.
LSG vs DC Live: लखनऊच्या १०० धावा पूर्ण
लखनऊ सुपर जायंट्सने १३ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे. सलामीला आलेल्या एडन मार्करमने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर मिचेल मार्श अजूनही खेळपट्टीवर टीकून आहे.
LSG vs DC Live: एडन मार्करमचं अर्धशतक पूर्ण
या सामन्यात लखनऊ सुपर जायटंसकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या एडन मार्करमने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यासह त्याने ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
LSG vs DC Live : पावरप्लेमध्ये लखनऊची दमदार सुरूवात! मार्करम- मार्शची तुफान फटकेबाजी
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. लखनऊकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मिचेल मार्श आणि एडेन मार्करमची जोडी मैदानावर आली आहे. या दोघांनी पावरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी करत संघाची धावसंख्या ५१ वर पोहोचवली आहे.
LSG vs DC Live: अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI): एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), अब्दुल समद, डेविड मिलर, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंह राठी, रवि बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव
दिल्ली कॅपिटल्स (Playing XI): अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार
LSG vs DC Live: नाणेफेक जिंकत दिल्लीचा गोलंदाजीचा निर्णय
लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दिल्लीच्या प्लेइंग ११ मध्ये एक बदल करण्यात आला आहे. मोहित शर्माला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे.
LSG vs DC Live: कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?
कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?
केएल राहुल गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. तर रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना दिसून आला होता. यावेळी रिषभ लखनऊकडून खेळतोय, तर केएल राहुल दिल्लीकडून खेळतोय. याच हंगामात या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला होता. त्यावेळी केएल राहुल संघाचा भाग नव्हता. या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान लखनऊने ३ तर दिल्लीने ३ वेळेस बाजी मारली आहे.