IPL 2025, GT VS LSG Highlights: सुरेख सांघिक प्रदर्शनाच्या बळावर लखनौ सुपरजायंट्स संघाने गुजरात टायटन्स संघावर ६ विकेट्सने विजय मिळवला. सुरेख अशा सांघिक खेळाच्या बळावर लखनौ सुपरजायंट्स संघाने गुजरात टायटन्सवर ६ विकेट्सने विजय मिळवला. शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातला दिमाखदार सलामी दिली पण त्यानंतर त्यांची गती मंदावली. उर्वरित फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आली. लखनौतर्फे शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी यांनी टिच्चून गोलंदाजी केली. गुजरातने १८१ धावांचं लक्ष्य ठेवलं.प्रत्युत्तरादाखल खेळताना एडन मारक्रम आणि निकोलस पूरन यांच्या अर्धशतकांच्या बळावर लखनौनं हे लक्ष्य पार केलं. मारक्रमने ५८ तर पूरनने ६१ धावांची वेगवान खेळी साकारल्या.
IPL 2025 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Highlights : लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
लखनौचा संस्मरणीय विजय
सुरेख अशा सांघिक खेळाच्या बळावर लखनौ सुपरजायंट्स संघाने गुजरात टायटन्सवर ६ विकेट्सने विजय मिळवला. शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातला दिमाखदार सलामी दिली पण त्यानंतर त्यांची गती मंदावली. उर्वरित फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आली. लखनौतर्फे शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी यांनी टिच्चून गोलंदाजी केली. गुजरातने १८१ धावांचं लक्ष्य ठेवलं.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एडन मारक्रम आणि निकोलस पूरन यांच्या अर्धशतकांच्या बळावर लखनौनं हे लक्ष्य पार केलं. मारक्रमने ५८ तर पूरनने ६१ धावांची वेगवान खेळी साकारल्या.
निकोलस पूरनचा झंझावात
चौकार, षटकारांच्या भाषेतच बोलणाऱ्या निकोलस पूरनने झंझावाती अर्धशतक झळकावलं.
वेगवान अर्धशतकानंतर मारक्रम परतला
३१ चेंडूत ५८ धावांची तडाखेबंद खेळी करून एडन मारक्रम बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला बाद केलं.
सलामीवीर ऋषभ पंत परतला
प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा ऋषभ पंतचा प्रयत्न अखेर फसला. प्रसिध कृष्णाने त्याला बाद केलं. वॉशिंग्टन सुंदरने चांगला झेल टिपला.
तुफान फॉर्मात असलेला मिचेल मार्श गुजरातविरूद्ध का नाही खेळत आहे?
लखनौचं दमदार पुनरागमन
पहिल्या १० षटकात दमदार फटकेबाजी करणाऱ्या गुजरातला लखनौ सुपरजायंट्स संघाने पुढच्या १० षटकात जखडून ठेवलं. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांच्या अर्धशतकानंतर गुजरातच्या डावाची लयच हरवली. गुजरातने लखनौसमोर १८१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
दिग्वेश राठीने बटलरला चकवलं; शार्दूल ठाकूरचा शानदार झेल
धावसंख्या वाढवण्यासाठी आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या जोस बटलरला फिरकीपटू दिग्वेश राठीने तंबूत परतावलं. शार्दूल ठाकूरने उत्तम झेल टिपला.
वॉशिंग्टन सुंदरही बाद
दमदार सुरुवातीनंतर गुजरात टायटन्सची गाडी घसरली आहे. रवी बिश्नोईने वॉशिंग्टन सुंदरला बाद केलं आहे.
रवी बिश्नोईने दूर केला साई सुदर्शनचा अडसर
विश्रांतीनंतर लगेचच फिरकीपटू रवी बिश्नोईने साई सुदर्शनला माघारी धाडलं. सुदर्शनने ३७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. निकोलस पूरनने चांगला झेल टिपला.
मारक्रमचा अफलातून झेल; गिल तंबूत
अवेश खानच्या गोलंदाजीवर सीमारेषेनजीक एडन मारक्रमने शुबमन गिलचा सुरेख झेल टिपला. गिलने ३८ चेंडूत ६० धावांची खेळी केली.
सुदर्शनचं अर्धशतक
साई सुदर्शनने यंदाच्या हंगामातलं चौथं अर्धशतक गाठलं. दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर चौकार खेचत सुदर्शनने नवा विक्रम नावावर केला.
शुबमन गिलचं अर्धशतक
कर्णधाराला साजेशी खेळी करत शुबमन गिलने अर्धशतक पूर्ण केलं. सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेत खेळणाऱ्या गिलने नंतर मात्र चौकार, षटकार लगावले.