IPL 2025, LSG vs MI Highlights: लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२५ च्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. लखनौने मुंबईला १२ धावांनी मात देत अखेरच्या षटकात शानदार विजय मिळवला. लखनौचा गेल्या चार सामन्यांमधील हा दुसरा पराभव आहे तर मुंबईला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Live Updates

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Cricket Score Updates: लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स

23:10 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: सूर्यकुमार यादव झेलबाद

आवेश खानच्या १७व्या षटकात सूर्यकुमार यादव बाहेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी गेला, पण कंट्रोलमध्ये नसल्याने सूर्या मैदानावर पडला आणि चेंडू थेट फिल्डरच्या हातात गेला. अब्दुल समदने एक कमालीचा झेल टिपला.

22:54 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: सूर्यकुमार यादवचं अर्धशतक

सूर्यकुमार यादवने लखनौ सुपर जायंट्स सामन्यात चांगली कामगिरी करत अर्धशतक झळकावले. सूर्याने ३१ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी त्याचा आयपीएलमधील १०० वा सामना खेळत आहे. सूर्याने या खास सामन्यात संघासाठी महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. यासह मुंबईला विजयासाठी ३६ चेंडूत ७० धावांची गरज आहे.

22:34 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: नमन धीर क्लीन बोल्ड

मुंबई इंडियन्स संघाचा डाव उचलून धरलेला नमन धीर दिग्वेश राठीच्या नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. नमन धीरने २४ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावा करत संघाचा डाव सावरला होता. सूर्याबरोबर त्याने अर्धशतकी भागीदारीही रचली होती. यासह मुंबईने ९ षटकांत ३ बाद ८९ धावा केल्या.

22:10 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI Live: मुंबईने पॉवरप्लेमध्ये केल्या इतक्या धावा

नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने लागोपाठ दोन विकेट्स मिळाल्यानंतर संघाचा डाव सावरला. यासह मुंबईने ६ षटकांत २ बाद ६४ धावा केल्या आहेत. नमन धीर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने आकाशदीपच्या षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत २१ धावा कुटल्या. तर सूर्यानेही त्याला चांगली साथ दिली.

21:47 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: दोन्ही सलामीवीर तंबूत

मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर पहिल्या ३ षटकांतच तंबूत परतले आहेत. शार्दुलच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरूवात केली. पण दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला आणि सीमारेषेजवळ झेलबाद झाला.

21:42 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

लखनौने दिलेल्या २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विल जॅक्स आणि रायन रिकल्टनची जोडी उतरली होती. पण विल जॅक्स मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. दुखपातीनंतर पहिलाच सामना खेळत असलेल्या आकाशदीपने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवून दिली. यासह मुंबईने २ षटकांत १ बाद १३ धावा केल्या.

21:17 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI Live: डेव्हिड मिलरने संघाला गाठून २०० धावांचा पल्ला

डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकात एक चौकार-षटकार लगावत संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. पण हार्दिक पंड्यानेही अखेरच्या षटकात सलग दोन चेंडूत २ विकेट घेत अधिक धावा करण्याची संधी दिली नाही. यासह लखनौने सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिले आहे. हार्दिक पंड्याने चांगली गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतले. तर लखनौकडून मिचेल मार्शने ६० धावा, एडन मारक्रमने ५३ धावा तर डेव्हिड मिलर १४ चेंडूत २७ धावा करत बाद झाला. या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या रचण्यात मोठी भूमिका बजावली.

21:02 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: एडन मारक्रमचे अर्धशतक

लखनौ संघाचा सलामीवीर एडन मारक्रम सुरूवातीच्या सामन्यांमधून खराब फॉर्ममधून जात आहे. पण मुंबई इंडियन्सविरूद्ध एका टोकाकडून विकेट्स जात असताना मारक्रमने एका टोकाला थांबत चांगली खेळी केली. मारक्रमने ३४ चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केले आहे. पण हार्दिकच्या १८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो ५३ धावांवर झेलबाद झाला. यासह हार्दिकने ३ विकेट्स घेतले आहेत. तर लखनौने १८ षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या आहे.

20:58 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: अश्वनी कुमारच्या खात्यात पहिली विकेट

केकेआरविरूद्ध सामन्याचा हिरो अश्वनी कुमारला या सामन्यात पहिली विकेट मिळवण्यात यश आले. आयुष बडोनीने षटकातील चौथ्या चेंडूवर बाहेर येऊन चौकार लगावला आणि पुढच्या चेंडूवरही तो सारखाच चौकार मारायला गेला, पण तो रिकल्टनकडून विकेटच्या मागे झेलबाद झाला. यासह लखनौने १६ षटकांत ४ बाद १५९ धावा केल्या आहेत.

20:43 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: आयुष बडोनीची चौकारांची हॅटट्रिक

लखनौचा फलंदाज आयुष बडोनीने मिचेल सँटनरच्या १४ व्या षटकात सलग तीन चौकार लगावत संघावरील दबाव कमी केला. लखनौने यासह १४ षटकांत ३ बाद १३७ धावा केल्या आहेत.

20:26 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: ऋषभ पंत पुन्हा अपयशी

हार्दिक पंड्याने ११ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर संघाला अजून एक विकेट मिळवून दिली. हार्दिकने चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतला झेलबाद केलं. कट मारून एक धाव घेण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उंच उडाला आणि कार्बिन बॉशने धावत येत एक कमालीचा झेल टिपला. यासह लखनौने ११ षटकांत ३ बाद १०८ धावा केल्या.

20:21 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: निकोलस पुरन झेलबाद

हार्दिक पंड्याने नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या निकोलस पुरनला झेलबाद केले. निकोलस पुरनने येताच चौकार-षटकार लगावत दबाव टाकला. पण हार्दिकने त्याला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. यासह १० षटकांत लखनौने २ बाद १०० धावांचा आकडा गाठला.

20:09 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI Live: विघ्नेश पुथूरने मिळवून दिला ब्रेकथ्रू

विघ्नेश पुथूरने पॉवरप्लेनंतर पहिल्याच षटकात संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. विघ्नेश पुथूरने सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मिचेल मार्शला झेलबाद केला. विघ्नेशच्या अखेरच्या चेंडूवर मार्शने सरळ फटका खेळला आणि विघ्नेशने खाली वाकून एक कमालीचा झेल टिपला. मिचेल मार्श ३१ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा करत बाद झाला.

19:58 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: मार्शचं झंझावाती अर्धशतक

मिचेल मार्शने मुंबई इंडियन्सविरूद्ध वादळी अर्धशतक झळकावलं आहे. पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात मार्शने अवघ्या २७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले आहे. बोल्ट, चहर, अश्वनी कुमार सर्व गोलंदाजांची धुलाई केली. यासह लखनौने ६ षटकांत बिनबाद ६९ धावा केल्या आहेत.

19:50 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: लखनौच्या डावाला सुरूवात

लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजीला सुरूवात झाली असून मुंबईकडून बोल्टने गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्या ४ षटकांत ३५ धावा केल्या आहेत. बोल्ट, चहर आणि अश्वनीने ४ षटकं टाकली. तर अश्वनीने त्याच्या पहिल्या षटकात फक्त ३ धावा दिल्या.

19:35 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI Live: सूर्यकुमार यादवचा मुंबई इंडियन्सचा १०० वा सामना

मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबई संघासाठी आयपीएलमधील त्याचा १०० वा सामना खेळत आहे. या खास पराक्रमासाठी त्याला सामन्यापूर्वी कायरन पोलार्डने त्याला १०० आकडा लिहिलेली जर्सी दिली आहे.

19:10 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: लखनौ सुपर जायंटस संघाची प्लेईंग इलेव्हन

एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर/रकर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप, आवेश खान

19:09 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज अंगद बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर, विघ्नेश पुथूर

19:08 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर

मुंबई इंडियन्सच्या लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर झाला आहे. तर या सामन्यात नवा फलंदाज राज अंगद बावा खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये हा एक बदल झाला आहे. तर लखनौच्या ताफ्यात आकाशदीप पुन्हा परतला आहे.

19:02 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI Live: नाणेफेक

लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स सामन्याची नाणेफेक मुंबई संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर लखनौचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे.

18:43 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: रोहित शर्माचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सहभाग

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नाहीये. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून त्याला दोन सामन्यांत स्थान मिळाले. रोहित खराब फॉर्मशी झुंजत आहे, त्यानंतर आता रोहित कसं पुनरागमन करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

18:17 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI Live: मुंबईला दुसऱ्या विजयाची अपेक्षा

पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला पहिल्या सामन्यात चेन्नईने तर दुसऱ्या सामन्यात गुजरातने पराभूत केले होते. मुंबईने कोलकात्यावर ८ विकेट्सने विजय मिळवला होता.

18:14 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI Live: लखनौला दुसऱ्या विजयाची अपेक्षा

लखनौचा पहिल्याच अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभव केला. यानंतर संघाने सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून पराभव केला. तर तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जकडून ८ गडी राखून पराभव पत्करावा लागला. यासह लखनौचा संघ एकच विजय मिळवू शकला आहे.

18:01 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI Live: रोहित शर्माचा व्हायरल व्हीडिओ

MI vs LSG: “आता मला काही करायची गरज नाही…”, रोहित शर्माचं झहीर खानशी बोलताना धक्कादायक वक्तव्य, ऋषभ पंतमुळे चर्चेत व्यत्यय; VIDEO व्हायरल

17:34 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI: लखनौचा खेळाडू संघात परतला

दुखापतीनंतर फिट होत लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आकाशदीप संघात गुरुवारी झाला आहे. त्याने सांगितले की तो संघासाठी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. आकाशदीप म्हणाला, “मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि संघासाठी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. दुखापतीमुळे मी संघाबरोबर जास्त वेळ घालवू शकलो नाही पण संघ व्यवस्थापनाच्या पाठिंब्याने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.”

17:11 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI: हेड टू हेड रेकॉर्ड

लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी लखनौने ५ सामने जिंकले आहेत. मुंबई संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. लखनौने मुंबईविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकून आयपीएलमध्ये आघाडी घेतली आहे.

16:38 (IST) 4 Apr 2025

LSG vs MI: लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ

एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, मणिमरन सिद्धार्थ, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, हिम्मत सिंग, आकाश महाराज सिंग, मॅथ्यू ब्रीट्जके, आर्यन जुयाल, अर्शीन कुलकर्णी, शमार जोसेफ

16:35 (IST) 4 Apr 2025
LSG vs MI: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, रॉबिन मिंज, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान, कर्ण शर्मा, रीस टॉप्ले, बेवन जेकॉब्स, कृष्णन श्रीजीत, अर्जुन तेंडुलकर

IPL 2025, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Highlights: लखनौ सुपर जायंट्स संघाने पुन्हा एकदा घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला आहे.