RR vs CSK IPL 2025 Malaika Arora Kumar Sangakkara Video: आयपीएल २०२५ मधील ११वा सामना राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. राजस्थानकडून नितीश राणाने वादळी फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण राजस्थान रॉयल्सच्या डगआऊटमधील एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि राजस्थानचा माजी कोच कुमार संगकाराबरोबर दिसत आहे.

मलायका अरोरा सीएसके विरूद्ध राजस्थान सामन्यात मलायका अरोरा राजस्थान रॉयल्स संघाची जर्सी घालून डगआऊटमध्ये बसली आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं असून अनेक प्रश्नांचा वाचा फोडली आहे. मलायका अरोराने राजस्थानची जर्सी घातलेली असून ती राजस्थान रॉयल्स संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती.

कुमार संगकारा गेल्या अनेक हंगामांसाठी रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता आणि अजूनही तो संघाचा क्रिकेट संचालक म्हणून काम पाहत आहे. २०२५ च्या हंगामापूर्वी राहुल द्रविडने त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून जागा घेतली. संगकारा आयपीएलमध्ये खेळाडू असताना पंजाब किंग्ज (पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब), डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला होता.

मलायका अरोराला कुमार संगकाराच्या बाजूला बसलेलं पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर सतत प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘प्रेम लपवता येत नाही.’ आणखी एका यूजरने लिहिले की, मलायका अरोरा कुमार संगकाराला डेट करत आहे का? या दाव्यात किती तथ्य आहे हे स्पष्ट झालेलं नाही. पण या व्हायरल फोटो आणि व्हीडिओवर चाहते खूप प्रतिक्रिया देत प्रश्न विचारत आहेत. चाहत्यांना कुमार संगकारा आणि मलायका अरोरा एकत्र का बसले आहेत याबाबत सतत उत्सुकता आहे आणि ते सतत कमेंट करत आहेत.

नितीश राणाच्या ८१ धावांच्या वादळी खेळीनंतरही, रॉयल्स संघाा डेथ ओव्हर्समध्ये अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर सारखे खेळाडू संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकले नाहीत. रॉयल्सने त्यांच्या निर्धारित २० षटकांत ९ बाद १८२ धावा केल्या.