IPL 2025 Chennai Super Kings Full Squad and Sold Players List : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर संघाने आयपीएल २०२५ च्या महालिलावासाठी जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे सीएसके संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केले आहे. याचा अर्थ तो आयपीएल २०२५ मध्ये खेळणार आहे. चेन्नई संघाने एमएस धोनीसह पाच खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यामुळे आता लिलावात हा संघ कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जने पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. ज्यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिश पाथिराना, शिवम दुबे आणि एमएस धोनी यांचा समावेश आहे. चेन्नईने रवींद्र जडेजाला १८ कोटी रुपये दिले आहेत. ऋतुराज गायकवाडलाही १८ कोटींना कायम ठेवण्यात आले आहे. मथिश पाथिरानाला १३ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. शिवम दुबेला १२ कोटी आणि धोनीला ४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता संघाकडे लिलावात उतरण्यापूर्वी ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार
ह
u
चेन्नई सुपर किंग्जकडे राईट टू मॅच कार्डचा पर्याय आहे. त्याचा वापर एका खेळाडूसाठी केला जाऊ शकतो. हा खेळाडू कोण असेल हा प्रश्न आहे. हा खेळाडू रचिन रवींद्र असू शकतो जो न्यूझीलंडचा खेळाडू आहे. रचिन रवींद्र हा सध्याच्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी एक आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो. याशिवाय तो गोलंदाजीही करू शकतो आणि त्याचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम आहे, तथापि, रचिन रवींद्र गेल्या सत्रात सीएसकेसाठी काही खास कामगिरी करू शकला नाही. या खेळाडूला १० सामन्यात केवळ २२२ धावा करता आल्या. जरी त्याचा स्ट्राइक रेट १६० पेक्षा जास्त होता. चेन्नईचा संघ रचिन रवींद्रसाठी आरटीएम वापरू शकतो.