IPL Auction 2025 Highlights Day 1, 24 November 2024 : आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशीचा लिलाव संपन्न झाला आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी १० फ्रँचायझींमध्ये खेळाडू खरेदी करण्यासाठी स्पर्धा होती. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलचा आपल्या संघात समावेश केला आहे. दरम्यान, ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे. श्रेयसला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. या दोघांनी मागील वर्षातील मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे डेव्हिड वॉर्नरसारखा स्टार खेळाडू पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला. या लिलावात सर्व संघ जास्तीत जास्त २५ खेळाडू आणि किमान १८ खेळाडू खरेदी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

IPL Mega Auction 2025 Highlights, Day 1 : आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावात ५७७ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौने त्याला २७ कोटी रुपयांना खरेदी केले. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये रसीख दार सर्वात महागडा खेळाडू ठरला.

18:22 (IST) 24 Nov 2024

KL Rahul IPL Mega Auction 2025 Day 1 Live : आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंतला लखनौने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात श्रेयस हा दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाबने 26 कोटी 75 लाख रुपयांना अय्यरचा संघात समावेश केला होता. मिचेल स्टार्कला गेल्या वर्षी लिलावात कोलकाताने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पॅट कमिन्स हा चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे. हैदराबादने त्याला 20 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केले. सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत सॅम करन पाचव्या स्थानावर आहे. करणला पंजाबने 2023 साठी 18.50 कोटींमध्ये घेतले होते.

18:06 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : पहिल्या दोन सेटमध्ये भारतीय खेळाडू झाले मालामाल

आयपीएल 2025 मेगा लिलावात मार्की खेळाडूंच्या बोलीमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखले आहे. ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू विकला गेला आहे. लखनऊने त्याला 27 कोटी रुपयांना खरेदी केले. मार्की खेळाडूंच्या यादीत सात भारतीय खेळाडूंवर बोली लावण्यात आली. फ्रँचायझीने या खेळाडूंवर 126 कोटी रुपये खर्च केले आहेत.

17:54 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live: हे खेळाडू IPL 2025 च्या लिलावात पहिल्या मार्की सेटमध्ये विकले गेले.

ऋषभ पंत – रु. 27 कोटी (लखनौ सुपर जायंट्स)

श्रेयस अय्यर – 26.75 कोटी रुपये (पंजाब किंग्स)

अर्शदीप सिंग – 18 कोटी रुपये (पंजाब किंग्स)

जोस बटलर – रु 15.75 कोटी (गुजरात टायटन्स)

मिचेल स्टार्क – 11.75 कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)

कागिसो रबाडा – रु. 10.75 कोटी (गुजरात टायटन्स

17:42 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Day 1 Live Updates : युजवेंद्र चहल दुसऱ्या सेटमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला

युजवेंद्र चहल दुसऱ्या सेटमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला

मोहम्मद शमी – 10 कोटी रुपये (सनरयझर्स हैदराबाद)

डेव्हिड मिलर – रु. 7.50 कोटी (लखनौ सुपर जायंट्स)

युजवेंद्र चहल – 18 कोटी रुपये (पंजाब किंग्स)

मोहम्मद सिराज – रु. 12.25 कोटी (गुजरात टायटन्स)

लियाम लिव्हिंगस्टोन – रु 8.75 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)

केएल राहुल – 14 कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)

17:29 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : दिल्लीने केएल राहुलला १४ कोटीमध्ये विकत घेतले

दिल्लीने केएल राहुलला १४ कोटीमध्ये विकत घेतले

मार्की खेळाडू म्हणून केएल राहुलने 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीने लिलावात प्रवेश केला. गतविजेत्या केकेआरने त्यांच्यासाठी बोली लावली आणि आरसीबीनेही रिंगणात उडी घेतली. राहुलला घेण्यासाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये स्पर्धा होती. दिल्लीनेही राहुलमध्ये स्वारस्य दाखवले आणि केकेआरसह बोलीमध्ये सामील झाले. दिल्लीने राहुलसाठी 11.50 कोटी रुपयांची बोली लावली, पण केकेआरही मागे हटायला तयार नव्हते. दिल्लीने राहुलसाठी 12 कोटींची बोली लावली, पण केकेआरने माघार घेतली. दरम्यान, सीएसकेने बोलीमध्ये उडी घेतली आणि राहुलसाठी बोली लावली. दिल्लीने 14 कोटींची बोली लावली आणि लखनऊने राहुलसाठी आरटीएमचा वापर केला नाही. राहुलच्या विक्रीबरोबरच लिलावातील मार्की खेळाडू पूर्ण झाले. आतापर्यंत एकूण 12 खेळाडूंची विक्री झाली आहे.

17:20 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : लियाम लिव्हिंगस्टोनसाठी आरसीबीने 8.75 कोटी रुपयांची बोली लावली

लिव्हिंगस्टोनसाठी आरसीबीने बोली लावली

लियाम लिव्हिंगस्टोन 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह मैदानात उतरला आणि हैदराबाद आणि आरसीबीने त्याच्यासाठी सुरुवातीची बोली लावली. मात्र, नंतर दिल्लीनेही लिव्हिंगस्टोनमध्ये रस दाखवला. लिव्हिंगस्टोनसाठी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात स्पर्धा होती. आरसीबीने लिव्हिंगस्टोनला 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

17:19 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : गुजरातने सिराजला 12.75 कोटीत विकत घेतले

गुजरातने सिराजला विकत घेतले

गुजरात आणि सीएसकेने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी प्रारंभिक बोली लावली आणि दोन फ्रँचायझींमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. सिराजची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, मात्र अल्पावधीतच बोली 8 कोटींच्या पुढे गेली. सीएसकेने माघार घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने बोलीमध्ये उडी घेतली. गुजरातने अखेर 12.75 कोटी रुपयांमध्ये सिराजला घेतले. आरसीबीने सिराजसाठी आरटीएमचा वापर केला नाही.

17:11 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : युजवेंद्र चहल ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय फिरकी गोलंदाज

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल पुन्हा लिलावात दाखल झाला, ज्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चेन्नईने चहलवर बोली लावायला सुरुवात केली, पण दुसऱ्या टोकाकडून गुजरातनेही चहलसाठी उत्सुकता दाखवली. पंजाबनेही चहलला घेण्यासाठी बोली लावली आणि त्याची गुजरातशी टक्कर झाली. त्याचवेळी लखनौनेही उडी घेतली. लखनौ आणि पंजाब यांच्यात चहलसाठी लढत झाली. पंजाबने चहलसाठी १४ कोटींची बोली लावली तेव्हा आरसीबी आणि हैदराबादनेही लिलावात उडी घेतली. त्यानंतर चहलला घेण्यासाठी हैदराबाद आणि पंजाबमध्ये स्पर्धा लागली. पंजाबने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. अशा प्रकारे चहल आयपीएल लिलावात विकला गेलेला भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.

17:00 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : लखनौने मिलरला 7.50 कोटी रुपयेत खरेदी केले

डेव्हिड मिलरसाठी गुजरात आणि आरसीबी यांच्यात लढत झाली. मिलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सही या शर्यतीत सामील झाली. मिलरसाठी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. लखनौही मागे राहिले नाही आणि बोलीही लावली. लखनौने मिलरसाठी 7.50 कोटी रुपयांची बोली लावली. गुजरातला मिलरसाठी आरटीएम वापरण्याची संधी होती, परंतु त्यांनी तसे केले नाही. अशाप्रकारे लखनौने मिलरला विकत घेतले.

16:57 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : मोहम्मद शमीसाठी सनरायझर्स हैदराबादने १० कोटीची बोली लावली

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा मार्की खेळाडूच्या दुसऱ्या सेटमध्ये आला. शमीची मूळ किंमत २ कोटी रुपये होती आणि त्याला मिळवण्यासाठी CSK आणि KKR यांच्यात शर्यत होती. केकेआरने शमीसाठी 8.25 कोटी रुपयांची बोली लावली ज्यानंतर सीएसकेने माघार घेतली. मात्र, चेन्नईने माघार घेतल्यानंतर लखनौने बोलीत उडी घेतली, पण केकेआरनेही हार मानली नाही. KKR ने 9.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि लखनौने माघार घेतली. शमी यापूर्वी गुजरातकडून खेळला होता, पण टायटन्सने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही. पण केकेआरने 10 कोटींच्या किमतीत माघार घेतली, तर हैदराबादने शमीला याच किंमतीत विकत घेतले.

16:54 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : मोहम्मद शमीसाठी केकेआर आणि सीएसकेमध्ये चढाओढ

मोहम्मद शमीसाठी केकेआर आणि सीएसकेमध्ये चढाओढ

दुसऱ्या सेटमध्ये पहिले नाव घेतले जात आहे ते मोहम्मद शमीचे. कोलकाता आणि चेन्नईने बोली लावली आहे. 2 कोटींच्या मूळ किमतीवरून, बोलीने 9 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. CSK किंवा KKR दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत. लखनौने एंट्री केली पण लवकरच हात मागे घेतला.

16:42 (IST) 24 Nov 2024
IPL Mega Auction 2025 Live : ऋषभ पंत ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

लखनौने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला 27 कोटींना खरेदी केले. त्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू बनला आहे. या प्रकरणात, त्याने श्रेयस अय्यरला मागे सोडले आहे, जो थोड्याच वेळापूर्वी 26.75 कोटी रुपयांना विकला गेला होता. ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला युद्ध रंगले होते. पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली होती.

https://twitter.com/blazeinspired/status/1860642645988831488

16:35 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : ऋषभ पंतसाठी बोली सुरू

ऋषभ पंतसाठी बोली सुरू आहे

ऋषभ पंतसाठी बोली सुरू आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी स्वारस्य दाखवले. सनरायझर्स हैदराबादने 11.75 कोटींच्या बोलीनंतर प्रवेश केला.

16:30 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : दिल्लीने स्टार्कला 11.75 कोटींना विकत घेतले

दिल्लीने स्टार्कला विकत घेतले

मिचेल स्टार्कने लिलावात प्रवेश केला असून त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. केकेआरने पुन्हा एकदा त्यांच्यासाठी बोली लावली, पण मुंबई इंडियन्सही या शर्यतीत कायम राहिली. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीनेही स्टार्कला घेण्यास स्वारस्य दाखवले. दिल्लीने स्टार्कला 11.75 कोटींना विकत घेतले. गेल्या वेळी स्टार्कवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली गेली होती, जी आज श्रेयसने मागे टाकली होती, हे माहीत आहे.

16:27 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : जोस बटलरला गुजरातने १५.७५ कोटींना विकत घेतले

जोस बटलरला गुजरातने खरेदी केले

जोस बटलरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती आणि त्याच्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा होती. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सही शर्यतीत सामील झाले आणि त्यांची गुजरातशी टक्कर पाहिली. अखेर गुजरातने बटलरला १५.७५ कोटींना विकत घेतले. बटलरला राजस्थान रॉयल्सने सोडले.

16:24 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live :श्रेयस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे

श्रेयस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे

श्रेयस अय्यर, ज्याने KKR ला त्याच्या नेतृत्वाखाली IPL 2024 चे विजेतेपद मिळवून दिले, तो IPL इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. पंजाबने श्रेयसला ७५ कोटी रुपयांना खरेदी केले. श्रेयसची मूळ किंमत २कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी दिल्ली आणि कोलकाता यांच्यात लढत झाली. या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना अखेर विकत घेतले होते.

16:20 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : श्रेयस अय्यरने सर्व विक्रम मोडीत काढले

अय्यरने सर्व विक्रम मोडीत काढले

पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केले आहे. यासह अय्यर आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

16:15 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live श्रेयस अय्यर आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला

श्रेयस अय्यर आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे

श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अय्यरवरची बोली २४.२५ कोटींवर पोहोचली आहे. दिल्लीने 24.50 कोटी रुपयांची बोली लावली, ज्याचा पंजाबने प्रतिकार केला. 25 कोटींच्या बोलीने मिचेल स्टार्कचा सर्वात महागडा आयपीएल खेळाडूचा विक्रम मोडला आहे.

16:06 (IST) 24 Nov 2024
IPL Mega Auction 2025 Live : गुजरातने रबाडावर मारली बाजी

गुजरातने रबाडावर मारली बाजी , त्याला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला गुजरात टायटन्सने विकत घेतले. रबाडाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरातने त्याला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले.

16:00 (IST) 24 Nov 2024
IPL Mega Auction 2025 Live : अर्शदीप आयपीएलमधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला

अर्शदीप आयपीएलमधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला

SRH अर्शदीपसाठी बोली युद्धात उडी घेते. अर्शदीप सिंग हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने आरटीएम कार्ड खेळले आहे. पंजाबने अर्शदीपला RTM द्वारे 18 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात परत घेतले आहे.

15:49 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : अर्शदीप सिंगवर बोली लावली जात आहे

अर्शदीप सिंगवर बोली लावली जात आहे

अर्शदीप सिंगच्या नावावर पहिली बोली लावली जात आहे. चेन्नई सुपर किंग्जने अर्शदीपसाठी प्रथम बोली लावली असून त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. दिल्लीनेही हात वर केले आहेत.

15:46 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : मेगा लिलाव सुरू, काही वेळाने पंतवर बोली लावली जाईल

मेगा लिलाव सुरू, काही वेळाने पंतवर बोली लावली जाईल

आयपीएल 2025 मेगा लिलाव सुरू झाला आहे. अरुणकुमार धुमाळ संबोधित करत आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू ऋषभ पंतवर पहिली बोली लावली जाणार आहे. ऋषभ पंत मार्की खेळाडूंच्या सेट 1 चा भाग आहे.

15:42 (IST) 24 Nov 2024

IPL Auction 2025 News in Marathi : IPL 2025 साठी खेळाडूंचा महालिलाव सुरू, BCCI अधिकारी उपस्थित

सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सर्व अधिकारीही उपस्थित आहेत.

15:39 (IST) 24 Nov 2024

IPL Auction Live News in Marathi : 10 फ्रँचायझी 14 राईट टू मॅच कार्ड वापरू शकतात

10 फ्रँचायझी 14 राईट टू मॅच कार्ड वापरू शकतात

10 फ्रँचायझी 14 राईट टू मॅच कार्ड (RTM कार्ड) वापरू शकतात. राईट टू मॅच कार्ड वापरून, फ्रँचायझी सोडलेल्या खेळाडूला त्याच्या संघात पुन्हा समाविष्ट करू शकते. हा नियम जरी सोपा नसला तरी. जेव्हा राईट टू मॅच कार्ड वापरले जाईल, तेव्हा खेळाडूसाठी सर्वाधिक बोली लावणाऱ्या फ्रँचायझीला आणखी एक संधी मिळेल. तिला पाहिजे तितकी बोली वाढवू शकते.

15:17 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction Live Updates : लिलाव स्टेज तयार

लिलाव स्टेज तयार

आयपीएल 2025 साठी मेगा लिलावाचा टप्पा तयार झाला आहे आणि आता लवकरच खेळाडूंसाठी बोली सुरू होईल. आयपीएल लिलावाच्या तयारीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

15:01 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction Live Updates : मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसाचे वेळापत्रक

मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसाचे वेळापत्रक

IPL मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी 12 सेटमध्ये 84 खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. मार्की खेळाडूंसाठी बोली लावली जाईल. यानंतर दुपारचे जेवण होईल. त्यानंतर कॅप्ड बॅट्समन, अष्टपैलू आणि यष्टिरक्षक यांच्यासाठी बोली लावली जाईल. यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक असेल. यानंतर कॅप्ड गोलंदाजांचा लिलाव होणार आहे. यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक असेल. पहिल्या दिवसाच्या अंतिम सेटमध्ये अनकॅप्ड खेळाडूंचा पहिला सेट असेल. यामध्ये सात खेळाडूंचा सहभाग असेल. याचा अर्थ फाफ डू प्लेसिस, केन विल्यमसन, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या मोठ्या नावांवर सोमवारी बोली लावली जाणार आहे.

14:39 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction Live 2025 : या भारतीय गोलंदाजांवर चांगली बोली लावली जाऊ शकते

या भारतीय गोलंदाजांवर चांगली बोली लावली जाऊ शकते

खलील अहमद: वेगवान गोलंदाजासाठी चांगली बोली लावली जाऊ शकते. कारण यश दयालला आरसीबीने कायम ठेवले आहे.

दीपक चहर: गेल्या वर्षी दुखापतीमुळे खूप त्रासलेल्या स्विंग गोलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली.

आवेश खान : राजस्थानकडून गतवर्षी 19 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज 10 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला.

हर्षल पटेल: T-20 लीगमध्ये यशस्वी, गेल्या मोसमात 24 बळी घेतले.

भुवनेश्वर कुमार: पॉवरप्लेमध्ये अप्रतिम स्विंग आणि सीम दाखवण्यात माहिर, अनुभवही चांगला आहे.

14:18 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : या भारतीय फलंदाजांवर चांगली बोली लावली जाऊ शकते

या भारतीय फलंदाजांवर चांगली बोली लावली जाऊ शकते-

ऋषभ पंत : या लिलावात पंत सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. अनेक संघ त्याच्यावर बोली लावताना दिसतील.

केएल राहुल: राहुलने लिलावाच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियात आपली ताकद दाखवली. त्याच्यावरही मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात.

श्रेयस अय्यर : आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून श्रेयसचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. अशा परिस्थितीत ज्या संघांना कर्णधाराची गरज आहे ते श्रेयसची निवड करू शकतात.

व्यंकटेश अय्यर: आयपीएल 2024 मध्ये कोलकाताच्या विजयात या फलंदाजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यंदा त्याला चांगला भाव मिळू शकतो.

इशान किशन : हा फलंदाज चर्चेत नसला तरी त्याच्या क्षमतेवर शंका घेतली जाऊ शकत नाही. त्याने वनडेत द्विशतक झळकावले आहे.

14:04 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : बटलर सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरु शकतो

बटलर सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरु शकतो

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलरची क्षमता सर्वच संघांना माहीत आहे. अष्टपैलू बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरू शकतो. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. परदेशी क्रिकेटपटूंमध्ये, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा देखील बोलीमध्ये समावेश केला जाईल, ज्याला कोलकाताने आयपीएल 2024 मध्ये 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, ही आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरन आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यासाठी पण मोठी बोली लागू शकते.

13:51 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : आयपीएल महालिलावात सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडू कोण आहे?

आयपीएल महालिलावात सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडू कोण आहे?

या लिलावात बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये आहे. त्याचवेळी, 42 वर्षीय इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पहिल्यांदाच लिलावात उतरणार आहे. या लिलावात तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. अँडरसनने त्याची मूळ किंमत 1.25 कोटी ठेवली आहे. अँडरसन 2014 पासून एकही टी-20 सामना खेळलेला नाही आणि तो कधीही आयपीएलचा भागही नाही. मात्र, आता त्याने आयपीएलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै 2024 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याचा अनुभव लक्षात घेता अनेक संघ त्याच्यावर बोली लावू शकतात.

IPL Mega Auction 2025 Day 1 Highlights : पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. पहिल्या दिवशी एकूण ७२ खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.