IPL Auction 2025 Highlights Day 1, 24 November 2024 : आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशीचा लिलाव संपन्न झाला आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी १० फ्रँचायझींमध्ये खेळाडू खरेदी करण्यासाठी स्पर्धा होती. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलचा आपल्या संघात समावेश केला आहे. दरम्यान, ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे. श्रेयसला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. या दोघांनी मागील वर्षातील मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे डेव्हिड वॉर्नरसारखा स्टार खेळाडू पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला. या लिलावात सर्व संघ जास्तीत जास्त २५ खेळाडू आणि किमान १८ खेळाडू खरेदी करू शकतात.

Live Updates

IPL Mega Auction 2025 Highlights, Day 1 : आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावात ५७७ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौने त्याला २७ कोटी रुपयांना खरेदी केले. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये रसीख दार सर्वात महागडा खेळाडू ठरला.

13:41 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : कोणत्या संघाकडे लिलावासाठी किती रक्कम शिल्लक?

फ्रँचायझींच्या पर्समध्ये लिलावासाठी शिल्लक राहिलेली रक्कम

पंजाब किंग्ज – 110.5 कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 83 कोटी

दिल्ली कॅपिटल्स – 73 कोटी

गुजरात टायटन्स – 69 कोटी

लखनौ सुपर जायंट्स – 69 कोटी

चेन्नई सुपर किंग्ज – 55 कोटी

मुंबई इंडियन्स – 45 कोटी

कोलकाता नाईट रायडर्स – 51 कोटी

सनरायझर्स हैदराबाद – 45 कोटी

राजस्थान रॉयल्स – 41 कोटी

13:25 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : खेळाडूंची आधारभूत किंमत किती असते आणि ती कशी ठरवली जाते?

खेळाडूंची आधारभूत किंमत किती असते आणि ती कशी ठरवली जाते?

कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंसाठी आधारभूत किंमत वेगळी आहे. अनकॅप्ड खेळाडूसाठी तीन आधारभूत किमती आहेत. ते 20, 30 आणि 40 लाख रुपयांच्या श्रेणीमध्ये स्वतःची नोंदणी करू शकतात. कॅप्ड खेळाडूंसाठी पाच वेगवेगळ्या श्रेणी आहेत. ते त्यांचे नाव 50 लाख, 70 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि 2 कोटी रुपयांमध्ये ठेवू शकतात. खेळाडूंना त्यांची नावे कोणत्या श्रेणीत ठेवायची हे फक्त खेळाडू ठरवतात.

13:09 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : आयपीएल लिलावाची प्रक्रिया काय आहे?

आयपीएल लिलावाची प्रक्रिया काय आहे?

लिलावात सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडू प्रथम नोंदणी करतात. यावेळी भारतासह 17 देशांतील 1574 खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे दिली होती. त्यापैकी 574 खेळाडूंना लिलावासाठी निवडण्यात आले होते. नंतर जोफ्रा आर्चर, सौरभ नेत्रावळकर यांच्यासह तीन खेळाडू जोडले गेले. फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, अष्टपैलू खेळाडूंना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. या सर्वांवर एक एक करून बोली लावली जाईल.

12:51 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : सर्वात प्रथम मार्की खेळाडूंवर लागणार बोली

मार्की खेळाडूंवर प्रथम लागणार बोली

आयपीएल 2025 मेगा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. प्रथम मार्की खेळाडूंवर बोली लावली जाईल. यावेळी 12 मार्की खेळाडू आहेत. यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जोस बटलर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क, केएल राहुल, युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे.

12:30 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : 577 खेळाडूंचे भवितव्य आज पणाला

577 खेळाडूंचे भवितव्य आज पणाला

यावेळी आयपीएल 2025 साठी खेळाडूंच्या मेगा लिलावात एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती, परंतु एकूण 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्यापैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत, तर तीन सहयोगी राष्ट्रांचे आहेत. यावेळी एकूण 331 अनकॅप्ड खेळाडूही आपले नशीब आजमावतील, त्यापैकी 319 भारतीय आणि 12 विदेशी खेळाडू आहेत. सर्व 10 फ्रँचायझी 204 रिक्त जागांसाठी बोली लावतील.

12:23 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Live : आयपीएलच्या 10 संघांमध्ये किती स्लॉट रिक्त?

आयपीएलच्या 10 संघांमध्ये किती स्लॉट रिक्त?

आयपीएलच्या 10 संघांमध्ये 204 खेळाडूंसाठी स्लॉट रिक्त आहेत, ज्यामध्ये 70 परदेशी खेळाडू स्थान मिळवू शकतात. आयपीएल 2025 मेगा लिलाव रविवारी (24 नोव्हेंबर) IST दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2025 चा हंगाम 14 मार्चपासून सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे.

12:19 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : आयपीएळ 2025 च्या महालिलावातील मार्की खेळाडूंची दोन गटात विभागणी

आयपीएळ 2025 च्या महालिलावातील मार्की खेळाडूंची यादी दोन गटांमध्ये विभागली गेली आहे, ज्यामध्ये एकूण 12 खेळाडू आहेत आणि त्यात कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुलसह सात भारतीय खेळाडू आहेत. जेद्दाहमधील 330 अनकॅप्ड खेळाडूंवरही बोली लावली जाईल, ज्यात 318 भारतीय आणि 12 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

IPL Mega Auction 2025 Day 1 Highlights : पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. पहिल्या दिवशी एकूण ७२ खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.