IPL Auction 2025 Day 2 Live Updates, 25 November 2024: आयपीएल २०२५चा महालिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पाडला. अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या तर काही खेळाडूंनी इतिहासही रचला. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) २७ कोटी रुपयांना संघात सामील केले. तर श्रेयस अय्यर २६.७५ कोटींना पंजाब किंग्सच्या ताफ्यात सामील झाला, जो या लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर १३ वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीसाठी पहिल्याच लिलावात कोट्यवधींची बोली लागली.
IPL Mega Auction 2025 Day 2 Highlights: आयपीएल २०२५ महालिलावाच्या दुसऱ्या दिवसाच्या हायलाईट्स
अभिनंदन सिंह मूळ किंमत ३० लाखांसह आरसीबीच्या ताफ्यात दाखल. विघ्नेश राठी मूळ किंमत ३० लाखांसह आरसीबीच्या ताफ्यात दाखल
IPL Live Updates : गुजरात
कुलवंत खिजरोलिया गुजरातच्या संघात मूळ किंमत ३० लाखांना संघात दाखल
अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मूळ किंमत ३० लाखांसह त्याला संघात सामील केलं आहे. यासह लिजाड विलियमसला मुंबईने ७५ लाखांना संघात सामील केलं. विघ्नेश पुथूर मूळ किंमत ३० लाखांना संघात दाखल.
IPL Live Updates : कुणाल राठोड
लिलावाच्या अखेरच्या टप्प्यात राजस्थानने मूळ किमतीसह कुणाल राठोडला संघात सामील केलं आहे.
IPL Live Updates : हे खेळाडू अनसोल्ड
डेव्हिड वॉर्नर, पियुष चावला, शार्दुल ठाकूर, हार्विक देसाई, तनुष कोटियन हे खेळाडू राहिले अनसोल्ड
IPL Live Updates : मुंबई इंडियन्स
न्यूझीलंडचा फलंदाज बेवन जेकब्स मूळ किमत ३० लाखांसह मुंबईच्या ताफ्यात सहभागी झाला.
IPL Live Updates : करीम जनत
अफगाणिस्तानचा खेळाडू करीम जनत ७५ लाख मूळ किमतीसह गुजरातच्या संघात झाला सहभागी
अजय मंडल, मानवंत कुमार आणि त्रिपूर्ण विजय यांना दिल्ली संघाने ३० लाखांमध्ये मूळ किमतीसह संघात सामील केलं. माधव तिवारी ४० लाखांना दिल्लीच्या संघात दाखल
IPL Live Updates : प्रवीण दुबे
भारताचा अनकॅप्ड खेळाडू प्रवीण दुबेसा ३० लाखांच्या मूळ किमतीसह पंजाबने संघात सामील केले.
IPL Live Updates : क्वेना मफाका
दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज क्वेना मफाकासाठी राजस्थान आणि आरसीबीसाठी बोलींचा मुकाबला झाला. यात राजस्थानने बाजी मारत १.५ कोटींना संघात सामील केले.
लखनौ संघाने राजवर्धन हंगरगेकरला मूळ किंमत ३० लाखांसह संघात दाखल केलं. यासह अर्शीन कुलकर्णीलाही मूळ किंमत ३० लाखांसह संघात पुन्हा सहभागी करून घेतलं. मॅथ्यू ब्रिटजके मूळ किंमत ३० लाखांसह संघात दाखल
IPL Live Updates : आंद्रे सिद्धार्थ
आंद्रे सिद्धार्थला ३० लाख मूळ किमतीला संघात केलं दाखल
IPL Live Updates : सचिन बेबी
भारताचा अनकॅप्ड खेळाडू ३० लाखांना हैदराबादच्या संघात दाखल
IPL Live Updates : मोईन अली, उमरान मलिक
मोईन अलीला केकेआर संघाने २ कोटी मूळ किमतीसह संघात खरेदी केले. तर उमरान मलिकली ७५ लाखांसह संघात सहभागी केलं आहे.
IPL Live Updates : अर्जुन तेंडुलकर
अर्जुन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला आहे. कोणत्याच संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. अर्जुनने अलीकडेच पाच विकेट्स घेण्याचा देशांतर्गत सामन्यात पराक्रम केला होता. पण तरीही त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही.
IPL Live Updates : वंश बेदी
भारताचा अनकॅप्ड खेळाडू वंश बेदी ५५ लाखांना चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
IPL Live Updates : अनुकूल रॉय
अनुकूल रॉय अनकॅप्ड खेळाडू ४० लाखांना केकेआरच्या संघात सामील झाला आहे.
IPL Live Updates : स्वस्तिक चिकारा
मूळ किंमत ३० लाखांसह स्वस्तिक चिकारा आरसीबी संघात सामील झाला.
IPL Live Updates : अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे १.५० कोटी रूपयांना कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग झाला आहे.
IPL Live Updates :ग्लेन फिलीप्स
गुजरात टायटन्सने ग्लेन फिलीप्सला २ कोटी रूपयांना संघात सामील करून घेतले.
IPL Live Updates : श्रेयस गोपाल
भारतीय गोलंदाज श्रेयस गोपाल ३० लाख मूळ किमतीसह चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
IPL Live Updates : लवनीथ सिसोदिया
लवनीथ सिसोदिया मूळ किमती ३० लाखांसह केकेआरच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
IPL Live Updates : देवदत्त पडिक्कल
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू देवदत्त पडिक्कल मूळ किंमत २ कोटींसह आरसीबीच्या ताफ्यात सामील झाला आहे.
IPL Live Updates : 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला राजस्थानने १.१० कोटी मोजले
नॅथन स्मिथसाठी कोणीही बोली लावली नाही, ज्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
काइल जेमिसन मूळ किंमत 1.50 कोटी घेऊन मैदानात उतरला, पण त्याला कोणीही विकत घेतले नाही.
ख्रिस जॉर्डनला कोणीही घेतले नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
13 वर्षीय वैभव सूर्यवंशी, ज्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती, त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.
रिपल पटेलची मूळ किंमत ३० लाख रुपये होती, यासाठी कोणीही बोली लावली नाही.
IPL Live Updates : पी. अविनाशला पंजाब किंग्जने खरेदी केले
लान्स मॉरिससाठी कोणीही बोली लावली नाही, ज्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये होती.
ऑली स्टोनला कोणीही विकत घेतले नाही. ज्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती
पी. अविनाशला पंजाब किंग्जने त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये देऊन विकत घेतले.
रामकृष्ण घोष यांना चेन्नईने 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.
राज लिंबानी यांच्यासाठी कोणी बोली लावली नाही. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती
IPL Live Updates : कमलेश नागरकोटीला सीएसकेने लावली बोली
अब्दुल बासित ज्यांची मूळ किंमत 30 लाख रुपये होती त्याला कोणीही विकत घेतले नाही.
युवराज चौधरीला लखनऊने त्याच्या मूळ किंमत 30 लाख रुपये देऊन खरेदी केले.
कमलेश नागरकोटीला सीएसकेने त्याच्या मूळ किमतीच्या 30 लाख रुपयांत खरेदी केले.
तेजस्वी दहिया 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह उतरली, परंतु कोणीही त्याला घेण्यास स्वारस्य दाखवले नाही.
IPL Live Updates : संदीप वारियरही राहिला अनसोल्ड
75 लाख रुपये मूळ किंमत असलेल्या दिलशान मदुशंकाला कोणीही खरेदी केले नाही.
ॲडम मिल्नेला कोणीही विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
लुंगी एनगिडीमध्ये कोणीही रस दाखवला नाही. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
विल्यम ओ'रुर्के 1.50 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह मैदानात उतरला, परंतु कोणीही त्याच्यासाठी बोली लावली नाही.
चेतन साकारिया ज्यांची मूळ किंमत 75 लाख रुपये होती त्याला कोणीही खरेदी केले नाही.
संदीप वारियरसाठी कोणीही बोली लावली नाही. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती.
IPL Live Updates : पंजाब किंग्जने झेवियर बार्टलेटसाठी 80 लाखांची बोली लावली
मायकेल ब्रेसवेलसाठी कोणीही बोली लावली नाही. त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती.
जेमी ओव्हरटनला चेन्नईने त्याच्या मूळ किंमत 1.50 कोटींना विकत घेतले.
ओटेनिल बार्टमॅनला कोणीही विकत घेतले नाही, ज्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती.
पंजाब किंग्जने झेवियर बार्टलेटसाठी 80 लाखांची बोली लावली. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती.
IPL Live Updates: प्रिन्स यादव
भारताचा अनकॅप्ड खेळाडू प्रिन्स यादवला मूळ किंमत ३० लाखांना लखनौच्या संघात सामील केलं आहे.