IPL 2025 Delhi Capitals Full Squad and Sold Players List: ऋषभ पंतला रिलीज केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल २०२५ च्या लिलावात कोणकोणत्या खेळाडूंवर बोली लावणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रिटेन्शनमध्ये सर्वात चर्चेत असलेलं नाव होतं ते म्हणजे ऋषभ पंत आणि ऋषभ पंतने त्याची आयपीएल कारकीर्द ही दिल्ली कॅपिटल्सच्या संघातूनच उभी केली होती. पण दिल्ली संघाने २०२५ च्या लिलाबापूर्वी ऋषभ पंतला रिलीज केलं. महेंद्रसिंग धोनीचा वारसदार या दृष्टीने ऋषभ पंतकडे पाहिलं जातं आणि त्याच्यावर आता कोणता संघ बोली लावणार याची उत्सुकता आहे. ऋषभ पंतला रिलीज केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने चार खेळाडूंना रिटेन केलं. पण त्याला रिलीज केल्यानंतर दिल्ली कॅपिटलचा संघ आता कर्णधाराच्या शोधात आहे, त्यामुळे लिलावात संघ प्रथम कर्णधारावर बोली लावणार आहे.

दिल्ली कॅपिटल संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक परेल यांचा समावेश आहे. अक्षर पटेलला सर्वाधिक १६.५० कोटी, कुलदीप यादवला १३.२५ कोटी आणि ट्रिस्टन स्टब्सला १० कोटी तर अभिषेक पोरेला ४ कोटी देऊन संघाने रिटेन केलं आहे. रिटेन्शन नंतर दिल्ली कॅपिटल्सच्या पर्समध्ये १२० कोटींपैकी ७३ कोटी पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यासोबत संघाकडे दोन राईट टू मॅच कार्ड देखील उपलब्ध आहेत.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडे डेव्हिड वॉर्नर, हॅरी ब्रुक, मिचेल मार्श, शाई होप, सारखे फलंदाज होते, यापैकी काही खेळाडूंवर संघ राईट मॅच कार्ड वापरू शकतो. गोलंदाजांमध्ये मुकेश कुमार, अॅनरिक नॉर्किया, इशांत शर्मा यांसारखे गोलंदाज होते, यापैकी एखाद्या गोलंदाजावरही संघ राईट टू मॅच कार्ड वापरू शकतो अशी शक्यता आहे. कॅपिटल्स संघाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्णधार आणि फलंदाजी फळी बरोबरच गोलंदाजही लिलावात खरेदी करायचे आहेत. दिल्ली संघाकडे डेव्हिड वॉर्नर होता ज्याला संघाने रिलीज केलं. पण जर संघाने वॉर्नर साठी राईट टू मॅच कार्ड वापरले तर त्यांना कर्णधारही मिळू शकतो.