IPL 2025 Delhi Capitals Full Squad and Sold Players List: दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२५ साठी मजबूत संघ तयार केला आहे. लिलावापूर्वी संघाने ऋषभ पंतला रिलीज करत कुलदीप यादव, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक परेल यांना रिटेन केलं होतं. आता लिलावानंतर दिल्लीच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे मिश्रण आहे. संघाने फाफ डू प्लेसिस, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श यांसारख्या दिग्गज खेळाडूंना खरेदी केले आहे आणि अनेक नवीन चेहऱ्यांवर मोठी बोली लावली. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने ७२.८० कोटी रुपये खर्च केले. दिल्ली संघाने केएल राहुल, मिचेल मार्श आणि टी नटराजन यांच्यावर सर्वाधिक पैसा खर्च केला. आता कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार? सध्या तरी केएल राहुल आणि अक्षर पटेलचे नाव चर्चेत आहे.
दिल्ली कॅपिटल संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक परेल यांचा समावेश आहे. अक्षर पटेलला सर्वाधिक १६.५० कोटी, कुलदीप यादवला १३.२५ कोटी आणि ट्रिस्टन स्टब्सला १० कोटी तर अभिषेक पोरेला ४ कोटी देऊन संघाने रिटेन केलं आहे. रिटेन्शन नंतर दिल्ली कॅपिटल्सच्या पर्समध्ये १२० कोटींपैकी ७३ कोटी पैसे शिल्लक राहिले होते.
दिल्ली कॅपिटल्स संघाने तब्बल १४ कोटी रुपये मोजून के.एल.राहुलला ताफ्यात समाविष्ट केलं. राहुल यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स संघांकडे होता. लखनौ संघमालक आणि राहुल यांच्यात बेबनाव झाला होता. यष्टीरक्षण, सलामीवीर आणि कर्णधारपद अशा तिहेरी भूमिका राहुल हाताळू शकतो. हॅरी ब्रूक आणि जेक फ्रेझर मॅकगर्क या धडाकेबाज जोडगोळीवर दिल्लीने विश्वास ठेवला आहे. अनुभवी मिचेल स्टार्कच्या जोडीला टी.नटराजन, मोहित शर्मा ही मंडळी दाखल झाली आहेत.
हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी
दिल्ली कॅपिटल्स संघ :
करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा. मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव
© IE Online Media Services (P) Ltd