IPL 2025 Gujarat Titans Full Squad and Sold Players List: आयपीएलमधील पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावणारा संघ म्हणून गुजरात टायटन्सने आपली ओळख तयार केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने ही किमया केली होती. दुसऱ्या हंगामातही संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु चेन्नई सुपर किंग्स संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हार्दिक पंड्याला केंद्रस्थानी ठेवून संघाने संघ निर्मिती केली होती, पण २०२४ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला ट्रेडऑफमध्ये आपल्या संघात घेतलं. यानंतर शुबमन गिलच्या खांद्यावर संघाची धुरा आली, जी त्याने लिलया पार पाडली.
गुजरात टायटन्सने रिटेन्शनमध्ये अपेक्षित अशा पाच खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये संघाचा कर्णधार शुबमन गिल, रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान या खेळाडूंचा समावेश आहे. संघाने रशीदला सर्वाधिक १८ कोटी आणि त्यानंतर गिलला १६.५० कोटीत रिटेन केलं. त्यानंतर युवा फलंदाज साई सुदर्शनला ८.५० कोटी आणि राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना प्रत्येकी चार कोटी देत संघात कायम ठेवलं. रिटेन्शन नंतर गुजरात टायटन्सकडे लिलावाकरत १२० कोटींपैकी ६९ कोटी पैसे पर्समध्ये शिल्लक आहेत. संघाकडे एक राईट टू मॅच कार्डही उपलब्ध आहे.
हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी
u
फिनिशरची भूमिका पार पाडणाऱ्या डेव्हिड मिलरला संघाने रिलीज केलं पण त्याच्यासाठी संघ राईटू मॅच कार्ड वापरू शकतो. मोहम्मद शमीची दुखापत पाहता संघाने त्यालाही रिलीज केलं होतं. पण मोहम्मद शमी आता पुन्हा फिट झाला असून संघ त्याच्यासाठीही राईट मॅच कार्ड वापरू शकतो. गुजरात टायटन संघ मधल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाजांसाठी लिलावात बोलू लावणार आहेत.