IPL 2025 Gujarat Titans Full Squad and Sold Players List: आयपीएलमधील पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावणारा संघ म्हणून गुजरात टायटन्सने आपली ओळख तयार केली आहे. पाच खेळाडूंना रिटेन करणाऱ्या गुजरातने लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यांना ताफ्यात समाविष्ट केलं. त्यामुळे आता संपूर्ण संघ कसा आहे? जाणून घेऊया
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्यवस्थित अभ्यास करुन लिलावात उतरणारा संघ ही ओळख गुजरातने या लिलावातही कायम राखली. सामने आणि जेतेपद पटकावयचं असेल तर गोलंदाजांची मजबूत फळी असायला हवी यावर प्रशिक्षक आशिष नेहरा यांचा भर असतो. याचाच भाग म्हणून त्यांनी मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा यांना संघात घेतलं. या दोघांसाठी गुजरातला मोठी रक्कम मोजावी लागली. महिपाल लोमरुर, कुमार कुशाग्र, निशांत सिंधू, अनुज रावत आणि मानव सुतार या युवा खेळाडूंचा संचच गुजरातने खरेदी केली.
हेही वाचा – IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने ही किमया केली होती. दुसऱ्या हंगामातही संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु चेन्नई सुपर किंग्स संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हार्दिक पंड्याला केंद्रस्थानी ठेवून संघाने संघ निर्मिती केली होती, पण २०२४ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला ट्रेडऑफमध्ये आपल्या संघात घेतलं. यानंतर शुबमन गिलच्या खांद्यावर संघाची धुरा आली, जी त्याने लिलया पार पाडली.
गुजरात टायटन्सने रिटेन्शनमध्ये अपेक्षित अशा पाच खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये संघाचा कर्णधार शुबमन गिल, रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान या खेळाडूंचा समावेश आहे. संघाने रशीदला सर्वाधिक १८ कोटी आणि त्यानंतर गिलला १६.५० कोटीत रिटेन केलं. त्यानंतर युवा फलंदाज साई सुदर्शनला ८.५० कोटी आणि राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना प्रत्येकी चार कोटी देत संघात कायम ठेवलं. रिटेन्शन नंतर गुजरात टायटन्सकडे लिलावाकरत १२० कोटींपैकी ६९ कोटी पैसे पर्समध्ये शिल्लक आहेत. संघाकडे एक राईट टू मॅच कार्डही उपलब्ध आहे.
हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी
गुजरात टायटन्स संघ
शुबमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, जेराल्ड कोएत्झी, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंग ब्रार, मोहम्मद खान, अरविंद खान, इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजुरालिया.