IPL 2025 Mega Auction Updates in Marathi : आयपीएल २०२५ साठी लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित केला जाईल. यावेळी मेगा लिलाव होणार असून तो दोन दिवस चालणार आहे. २४ आणि २५ नोव्हेंबरला हा लिलाव होणार आहे. या लिलावात २०४ जागांसाठी ५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. बीसीसीआयने या बोलीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या शॉर्टलिस्टमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची नावे या यादीत नाहीत. ती कोणती ५ नावे आहेत? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅमेरून ग्रीन –

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन देखील आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होणार नाही. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग होता, परंतु लिलावापूर्वी त्याला कायम ठेवण्यात आले नाही. पाठीच्या दुखापतीमुळे ग्रीन किमान पुढील सहा महिने क्रिकेटपासून दूर आहे. या कारणास्तव कोणत्याही संघाने त्याला शॉर्टलिस्ट केले नाही.

अमित मिश्रा –

आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या अमित मिश्राचाही या लिलावात समावेश नाही. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक हॅट्ट्रिक्सही आहेत. त्याने आयपीएल २०२३ आणि २०२४ सह ८ सामने खेळले. २०२२ च्या मेगा लिलावात तो विकला गेला नव्हता. मागील हंगामात तो लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग होत, पण यंदा तो ही शॉर्टलिस्ट होऊ शकला नाही.

हेही वाचा – Rishabh Pant : नेट प्रॅक्सिटदरम्यान लागली पैज; बुमराह झाला बॅट्समन, बॉलिंगला ऋषभ पंत, काय झालं पुढे?

क्रीडा

u

जोफ्रा आर्चर –

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव आयपीएल 2025 च्या लिलावाच्या यादीत नाही. आर्चरला २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते. दुखापतीमुळे तो २०२२ चा हंगाम खेळू शकला नाही. २०२३ च्या मोसमातही तो काही सामन्यांनंतर बाहेर पडला होता. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे २०२४ च्या सीझनमध्येही हा वेगवान गोलंदाज अनेकदा जखमी झाला आहे. त्यामुळे आर्चरला लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेले नाही.

बेन स्टोक्स –

इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स देखील आयपीएल २०२५ च्या लिलावात दिसणार नाही. तथापि, स्टोक्सने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी नोंदणी केली नाही. हा अष्टपैलू खेळाडू चेन्नई सुपर किंग्जसाठी २०२३ मध्ये शेवटचा खेळला होता. त्याने दोन सामने खेळताना केवळ १५ धावा केल्या होत्या. स्टोक्स २०२२ च्या टी-20 विश्वचषक फायनलपासून इंग्लंड टी-२० संघाचाही भाग नाही.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा झाला पुन्हा बाबा; टीम इंडियानेच केलं शिक्कामोर्तब! तिलक-संजूसह सूर्याने दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

सौरभ नेत्रावळकर –

भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर शॉर्टलिस्ट जाहीर झाल्यानंतर चर्चेचा विषय ठरला आहे. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली होती. त्यानंतर त्याला आयपीएल संघांकडून मागणी असल्याची अफवा पसरली होती. मात्र, त्याला शॉर्टलिस्ट करण्यात आले नाही. आयपीएल पदार्पणाचे स्वप्न पाहण्यासाठी नेत्रावळकरला आणखी किमान एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 mega auction jofra archer cameron green ben stokes amit mishra not shortlisted in ipl 2025 ahead mega auction vbm