IPL 2025 Kolkata Knight Riders Full Squad and Sold Players List : कोलकाता नाईट रायडर्सने अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरसाठी लिलावात तब्बल २३.७५ कोटी रुपयांची बोली लावली. गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना कोलकाताना जेतेपदाची कमाई केली होती. पण श्रेयसने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलकाताला नवा कर्णधार धुंडाळणे आवश्यक आहे. लिलावात पहिल्या सत्रात शांत असणाऱ्या केकेआरने वेंकटेश अय्यरसाठी तिजोरी रिती केली. वेंकटेश अय्यरला कोलकाताला रिटेन करता आलं नव्हतं. मात्र लिलावात त्यांनी याची कसर भरुन काढली. प्रदीर्घ काळ चाललेल्या लढतीत कोलकाताने तब्बल २३.७५ कोटींची बोली लावत वेंकटेशला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. वेंकटेशसाठी एवढी रक्कम मोजणं चाहत्यांनाही आश्चर्यकारक होतं. आता वेंकटेशची की रिंकूची कोणाची कर्णधारपदी वर्णी लागणार ते पाहावे लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेंकटेशव्यतिरिक्त कोलकाताने दक्षिण आफ्रिकेच्या अँनरिक नॉर्किया आणि क्विंटन डी कॉक या जोडगोळीला समाविष्ट केलं.अंगक्रिश रघुवंशी आणि रहमनुल्ला गुरबाझ यांची घरवापसी झाली. वैभव अरोरालाही कोलकाताने आपल्याकडेच वळवलं. मयांक मार्कंडेय हा गुणी फिरकीपटू आता कोलकाताकडून खेळताना दिसेल.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२५) च्या १८ व्या हंगामासाठी महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यापूर्वी, सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. कोलकाता नाईट रायडर्सने सर्व ६ खेळाडूंना रिटेन केले होते. गेल्या मोसमातील विजेते केकेआरने मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले आहे. त्यामुळे हा संघ नवीन कर्णधाराच्या शोधात असून कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

हेही वाचा – IPL Auction 2025: वेगवान गोलंदाजांना मागणी; भुवनेश्वरसाठी बंगळूरुकडून, तर दीपक चहरसाठी मुंबईकडून मोठी बोली

कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंगवर सर्वाधिक १३ कोटी रुपये खर्च केले होते. याशिवाय फ्रँचायझीने वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी १२ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. फ्रँचायझीने हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांना प्रत्येकी ४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. अशा स्थितीत केकेआरच्या खिशात ५१ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयपीएल २०२४ चा विजेता संघ मेगा लिलावात हुशारीने खरेदी करू इच्छितो. संघ व्यंकटेश अय्यर, फिल सॉल्ट, इशान किशन, जोस बटलर आणि अर्शदीप सिंग यांच्यावर मोठी बोली लावू शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स सलामीच्या फलंदाजाच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत जोस बटलर याची भरपाई करू शकतो. एवढेच नाही तर बटलर हा यष्टिरक्षणासाठीही चांगला पर्याय आहे. त्याने आयपीएलच्या १०७ सामन्यांमध्ये ३५८२ धावा केल्या आहेत. बटलरने गेल्या मोसमात ११ सामन्यात ३५९ धावा केल्या होत्या. बटलरशिवाय ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर या खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे.

हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार

आयपीएल २०२५ साठी केकेआरचा संपूर्ण संघ :

रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लाव्हेन्सी, लवनिथ सिसोदिया, अजिंक्य रहाणे, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 mega auction kolkata knight riders full squad kkr sold players list vbm