IPL 2025 Lucknow Super Giants Full Squad and Sold Players List : लखनौ सुपर जायंट्स संघाने लिलावात २७ कोटींची विक्रमी बोली लावत ऋषभ पंतला ताफ्यात समाविष्ट करुन घेतलं. कर्णधारपद आणि यष्टीरक्षक या दोन्ही जबाबदाऱ्या हाताळू शकेल अशा खेळाडूच्या लखनौ शोधात होतं. रिटेन्शममध्ये त्यांनी कर्णधार लोकेश राहुलला रिलीज केलं होतं. ऋषभ पंतसाठी जोरदार बोली लागली. दिल्ली कॅपिटल्स संघही ऋषभ पंतला ताफ्यात ठेवण्यासाठी उत्सुक होता. मात्र लखनौने तब्बल २७ कोटींची बोली लावत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. कसा आहे संपूर्ण संघ? जाणून घ्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिनिशर म्हणून प्रसिद्ध डेव्हिड मिलरला लखनौनं घेतलं आहे. ऋषभ, पूरन, मिलर हे डावखुरं त्रिकुट प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. विदेशी खेळाडूंमध्ये मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या खेळाडूंवर लखनौनं विश्वास ठेवला आहे. अब्दुल समद या हैदराबादकडे अनेक वर्ष असणाऱ्या खेळाडूला लखनौनं आपल्याकडे वळवलं आहे.

हेही वाचा – मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

आयपीएल २०२५ च्या महालिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्सने एकूण ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. आपल्या संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुलचे नाव या ५ खेळाडूंमध्ये समाविष्ट नाही, म्हणजेच केएल राहुलने फ्रँचायझीशी संबंध तोडले असून आता तो लिलावात दिसणार आहे. यावेळी लखनौ सुपर जायंट्सने एकूण ३ कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि २ अनकॅप्ड खेळाडूंनाही संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत आता लखनौ सुपर जायंट्स संघ एकूण ६९ कोटी रुपयांसह लिलावात उतरणार आहे. हा संघ नवीन कर्णधाराच्या शोधात असून कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

हेही वाचा – IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?

लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान आणि आयुष बडोनी यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निकोलस पूरन हा संघाचा सर्वात महागडा रिटेन्शन खेळाडू आहे. लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनसाठी २१ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय रवी बिश्नोई आणि मयंक यादव यांना प्रत्येकी ११ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. गेल्या मोसमात मयंक यादवने आपल्या वेगाची छाप सोडली होती. तो पुन्हा एकदा या संघाकडून खेळताना दिसणार आहे. याशिवाय मोहसीन खान आणि आयुष बडोनी यांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी ४ कोटी रुपयांसह संघात कायम ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार

केएल राहुल आयपीएल २०२२ पासून लखनौ सुपर जायंट्स संघाशी जोडला होता. मात्र संघाला एकदाही विजेतेपद मिळवून देण्यात त्याला यश आले नाही. गेल्या मोसमात, एका सामन्यानंतर केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्याशी जोरदार वाद झाला होता. आता एलएसजी संघाला लिलावात इतर खेळाडू शोधताना कर्णधाराचा पर्याय शोधावा लागणार आहे. हा संघ लिलावात ६९ कोटी रुपयांसह उतरणार आहे.

आयपीएल २०२५ साठी लखनौ सुपर जायंट्स संघ:

रिटेन केलेले खेळाडू : निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी

लिलावात खरेदी केलेले खेळाडू : ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडन मार्करम, मिचेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ (आरटीएम) , प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगेरकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 mega auction lucknow super giants full squad lsg sold players list vbm