IPL 2025 Mumbai Indians Full Squad and Sold Players List: मुंबई इंडियन्सने लिलावाच्या पहिल्या टप्प्यात मूक साक्षीदार म्हणून राहणं पसंत केलं. पण दुसऱ्या टप्प्यात त्यांनी नेहमीच्या खाक्याला जागत ट्रेंट बोल्टच्या रुपात डावखुरा वेगवान गोलंदाज ताफ्यात सामील केला. बोल्टसाठी मुंबईला १२.५० कोटी रुपये मोजावे लागले. काही वर्षांपूर्वी बोल्ट मुंबईकडेच होता. वानखेडेवर बुमराह आणि बोल्ट यांना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी असेल. दरम्यान गेल्या हंगामात त्यांच्याकडेच असणाऱ्या नमन धीरसाठी मुंबईने ५.२५ कोटी रुपये मोजले. मुंबई इंडियन्सने लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चेन्नईच्या ताफ्यातील वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी मोठी बोली लावली. मुंबईने चहरला ९.२५ कोटींना संघात सामील केलं आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकीपटू गझनफरला ४.८० कोटींना खरेदी केलं आहे.
आयपीएल स्पर्धेतील सर्वात बहुचर्चित संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई संघाने आयपीएलपूर्वी संघातील पाच मुख्य खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. मुंबई संघाने सर्वाेत्कृष्ट जसप्रीत बुमराहला १८ कोटी अशा सर्वाधिक किंमत देत संघात कायम ठेवलं आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबईचा संघ यष्टीरक्षक आणि गोलंदाजांची निवड करणार आहे. मुंबईचा संघाचा कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
हेही वाचा – IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?
आयपीएल २०२५ रिटेन्शनच्या नियमानुसार मुंबई इंडियन्सने पाच खेळाडूंना संघात कायम ठेवले. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहला १८ कोटी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांना प्रत्येकी १६.३५ कोटी रोहित शर्माला १६.३० कोटी आणि तिलक वर्माला ८ कोटी रुपयांसह रिटेन केलं. रिटेन्शननंतर मुंबई संघाकडे १२० कोटींपैकी ५५ कोटींसह लिलावात उतरणार आहे. त्याचबरोबर राईट टू मॅच कार्ड देखील संघाकडे आहे.
हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी
मुंबई इंडियन्सचा लिलावानंतर संपूर्ण संघ
जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट (१२.५० कोटी), नमन धीर (५.२५ कोटी), रॉबिन मिंज (६५ लाख), कर्ण शर्मा (५० लाख) , रायन रिकेल्टन (१ कोटी), दीपक चहर (९.२५ कोटी), अल्लाह गझनफर (४.८० कोटी), विल जॅक्स (र५.२५ कोटी), अश्वनी कुमार (३० लाख), मिचेल सँटनर (२ कोटी), रीस टोपले (७५ लाख), कृष्णन श्रीजीथ (३० लाख), राज अंगद बावा (३० लाख), सत्यनारायण राजू (३० लाख), बेव्हॉन जेकब्स (३० लाख), अर्जुन तेंडुलकर (३० लाख), लिजाड विलियमस (७५ लाख), विघ्नेश पुथूर (३० लाख)