IPL 2025 Punjab Kings Full Squad and Sold Players List: नवा हंगाम नवे खेळाडू नवा कर्णधार आणि नवे प्रशिक्षक असं काम चालणारा संघ म्हणजे पंजाब किंग्सचा संघ. पंजाब किंग्सचा संघ आयपीएल २०२५ पूर्वी नव्याने संघ बांधणी करणार आहे. पंजाबने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये फक्त दोन खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये शशांक सिंग याला ५.५ कोटी आणि प्रभसिमरन सिंगला ४ कोटींना संघात कायम ठेवलं आहे. गेल्या काही हंगामात शिखर धवनने पंजाबचं नेतृत्व केलं. मात्र धवनने निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर पंजाब संघाला कर्णधारापासून सुरुवात करावी लागणार आहे. शेवटच्या लिलावात पंजाबाने सॅम करनसाठी तिजोरी रीती केली होती. सॅम करनने धवनला दुखापत झालेली असताना संघाचे नेतृत्वही केलं, पण त्याच्या लौकिकाला साधेचा त्याला खेळ करता आला नाही. त्यामुळे संघाने या हंगामापूर्वी त्याला रिलीज केल आहे.

पंजाब किंग्सने या हंगामापूर्वी रिकी पाँटिंगला संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून नेमलं आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावात पंजाबचा संघ रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली नव्याने संघ तयार करणार आहे. पंजाब किंग्सचा संघ २०२५ च्या लिलावात १२० कोटींपैकी ११०.०५ कोटी अशा सर्वाधिक पर्ससह लिलावात उतरणार आहे. पंजाब संघाने दोनच खेळाडूंना रिटेन केल्यामुळे त्यांच्याकडे चार राईट टू मॅच कार्ड उपलब्ध आहेत.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

पंजाबच्या संघात हर्षल पटेल आणि सध्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्रिकेट घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज असलेला अर्शदीप सिंगदेखील होता. त्यामुळे कदाचित संघ या दोन्ही वेगवान गोलंदाजांसाठी राईट टू मॅच कार्डचा वापर करेल. याचबरोबर फलंदाजांमध्ये लियाम लिविंगस्टोन आणि आपल्या खेळीने छाप उमटवणारा विदर्भाचा खेळाडू जितेश शर्मा यांच्यासाठीही राईट टू मॅच कार्ड वापरू शकतो. याशिवाय पंजाब संघाला कर्णधार, सलामीवीर मधल्या फळीतील फलंदाज आणि चांगल्या गोलंदाजांची देखील आवश्यकता असेल.