IPL 2025 Royal Challengers Bangalore Full Squad and Sold Players List : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या लिलावातील डावपेचांवर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार ट्रोलिंग केलं आहे. सोशल मीडियावर असंख्य मीम्स फिरत आहेत. बंगळुरू संघाने ऋषभ पंत, के.एल.राहुल आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंसाठी प्रयत्न केले पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी हंगामात त्यांचा कर्णधार कोण हा प्रश्न कायम आहे. विराट कोहली संघात आहे मात्र त्याचं वय आणि भविष्याचा विचार करता बंगळुरूला नवा कर्णधार हवा आहे. पण त्यांचे डावपेच पाहता त्यांनी याचा विचार केलेला नाही असंच दिसतं. त्यांचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ कसा आहे? जाणून घेऊया.
रविवारी लिलावात बंगळुरूने मोहम्मद सिराजसाठी राईट टू मॅचचा अधिकार वापरला नाही. विकेटकीपर, फलंदाज, नेतृत्व सगळं करू शकणाऱ्या राहुलसाठी जोरदार बोली लावली नाही. लिलावात त्यांनी फिल सॉल्ट, लायम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना घेतलं. रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांच्यासाठी पैसा मोजला.
नव्याने संघ बांधणी केली आहे. मागील हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसने संघाचं नेतृत्व सांभाळलं होतं. त्याचा फिटनेस उत्तम आहे. फॉर्मही चांगला आहे मात्र तो चाळिशीत आला आहे. तो आणखी किती वर्ष आयपीएलसारखी दोन महिने चालणारी स्पर्धा खेळू शकतो याबाबत साशंकता आहे. त्यामुळे संघाने भविष्याचा विचार करता फाफ डू प्लेसिसला रिलीज केलं. तसेच विराट कोहलीसह दोन युवा खेळाडू रजत पाटीदार आणि यश दयाल यांनी रिटेन केलं आहे. आता आयपीएल २०२५ महालिलावात कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत. विराट कोहलीला २१ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
बंगळुरू संघाने अष्टपैलू खेळाडू लायम लिव्हिंगस्टोनला ८.७५ कोटी रुपये मोजून संघात समाविष्ट केलं. बंगळुरूने धडाकेबाज फलंदाज फिल सॉल्टला ११.५० कोटी रुपयांची बोली लावून संघात समाविष्ट केलं.
यावेळी बीसीसीआयने सर्व संघांना त्यांचे ६ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली होती. ज्या संघांनी समान संख्येने खेळाडू राखले आहेत त्यांच्याकडे आरटीएम नसेल, परंतु ज्या संघाने यापेक्षा कमी खेळाडू राखले आहेत, ते आरटीएम म्हणजेच राईट टू मॅच कार्ड वापरून त्यांचे कोणतेही जुने खेळाडू रिडीम करू शकतात परतावा मिळवा. जर आरसीबीबद्दल बोलायचे झाले तर, टीमने विराट कोहलीला २१ कोटी रुपयांना रिटेन करून पहिली रिटेनशन दिली आहे. यानंतर टीमने रजत पाटीदारला ११ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यश दयाल यांनाही संघाने कायम ठेवले असून, त्यांची किंमत केवळ ५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार
जर आपण आरसीबीच्या तिसऱ्या आरटीएम खेळाडूच्या शक्यतांबद्दल बोललो तर त्यात आकाश दीपचे नाव येते. जो सध्या भारताच्या कसोटी संघाचा भाग आहे. तो सध्या भारताचा सर्वात वेगाने पुढे येणारा वेगवान गोलंदाज मानला जातो. कारण तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, विल जॅक्स यांच्यासाठीही आरसीबी संघ आरटीएम संघ वापरू शकतो.. आरसीबीने प्रयत्न केल्यास ते या तीन खेळाडूंना पुन्हा आपल्या संघात समाविष्ट करू शकतात. कारण त्याच्याकडे लिलावासाठी ८३ कोटी रुपये शिल्लक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ :
विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडगे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी नागिडी, अभिनंदन सिंग,