IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming Details: आयपीएल २०२५ चा महालिलावात कोणत्या खेळाडूंवर मोठी बोली लागणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत. येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे मेगा लिलाव होणार आहे. आयपीएल काऊन्सिलने लिलावापूर्वी ५७४ खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यात ३६६ भारतीय आणि २०८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. रिटेंशन यादी जाहीर केल्यानंतर फक्त २०४ स्लॉट शिल्लक आहेत. पंजाब किंग्जकडे सर्वाधिक ११०.५० कोटी रुपये आहेत, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी ४१ कोटी रुपये आहेत. आयपीएल लिलाव किती वाजता आणि कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घेऊया.

आयपीएलचा लिलाव सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार आहे. यावेळी खेळाडूंच्या मूळ किंमती ३० लाख रुपयांपासून सुरू होईल, जी गेल्या वेळेपेक्षा १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. इतर मूळ किंमती ४० लाख, ५० लाख, ७५ लाख, १ कोटी, १.२५ कोटी, १.५० कोटी आणि २ कोटी रुपये आहेत. या लिलावासाठी एकूण ७९ सेट तयार करण्यात आले आहेत. मार्की खेळाडूंच्या दोन सेटसह सुरुवात होईल, प्रत्येक सेटमध्ये ६ खेळाडू असतील, ज्यात गेल्या हंगामातील कर्णधार केएल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचाही समावेश आहे.

Credai MCHI organized 32nd Property fair at jio World Center in bkc
बीकेसीत आजपासून तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन, एकाच ठिकाणी घरखेरदीचे पर्याय उपलब्ध होणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आयपीएल २०२५ चा लिलाव किती वाजता सुरू होईल? जेद्दाहमधील स्थानिक वेळेनुसार, दुपारी १२.३० वाजता आयपीएल मेगा लिलाव सुरू होणार होता, पण आता या लिलावाची वेळ बदलली आहे. भारत आणि सौदी अरेबियामध्ये २ तास ३० मिनिटांचा फरक आहे. म्हणजे भारतात हा आयपीएल लिलाव दुपारी ३ वाजता सुरू होणार होता, असं पूर्वी सांगितलं होतं, पण आता मीडिया रिपोर्टनुसार हा लिलाव ३.३० वाजता सुरू होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI ने लिलावाची वेळ बदलून २४ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्थ कसोटीच्या दिवसाचा खेळ दुपारी २.५० पर्यंत संपणार होता पण दिवसाचा खेळ हा ३.२० पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सच्या विनंतीवरून आयपीएल लिलावाची वेळ दुपारी ३ नसून आता ३.३० करण्यात आली आहे. सौदी अरेबियामधील स्थानिक वेळेनुसार हा लिलाव दुपारी १ वाजता सुरू होईल.

हेही वाचा – Rohit Sharma Blessed with Boy: ज्युनियर हिटमॅन, रोहित शर्माला मुलगा झाला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पोस्टचा महापूर

आयपीएल २०२५ महालिलाव लाईव्ह कुठे पाहता येणार?

आयपीएल लिलावामध्ये भारताचे सर्वाधिक ३६६ खेळाडू आहेत. ज्यामध्ये ४८ कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. तर २०८ विदेशी खेळाडू आहेत, त्यामध्ये १९३ कॅप्ड खेळाडू आणि १२ सहयोगी देशाचे खेळाडू आहेत. हा आयपीएल लिलाव टीव्ही चॅनेलवर स्टार स्पोर्ट्सवर आणि मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे.

Story img Loader