IPL 2025 Sunrisers Hyderabad Full Squad and Sold Players List: सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२४ मध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. २०२४ मध्ये कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आक्रमक पवित्राने खेळत उत्कृष्ट कामगिरी केली. ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांनी तर अक्षरशः गोलंदाजांची बेदम धुलाई केली. हैदराबाद संघानेही आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी याच ५ खेळाडूंना रिटेन केलं आहे. जागतिक क्रिकेटमधील तीन विस्फोटक फलंदाज आणि एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असताना आता हैदराबादचा संघ मधली फळी अधिक मजबूत करण्यासाठी लिलावात बोली लावणार आहे.

सनराइजर्स हैदराबाद संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये हेनरिक क्लासेनला आयपीएल २०२५च्या रिटेन्शनमधील २३ कोटी ही सर्वात मोठी रक्कम दिली. तर पॅट कमिन्सला १८ कोटी, ट्रॅव्हिस हेडला १४ कोटी, अभिषेक शर्माला १४ कोटी आणि नितेश कुमार रेड्डीला ६ कोटी देत संघाने कायम ठेवलं. रिटेंन्शननंतर हैदराबाद संघाकडे १२० कोटींपैकी ४५ कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. संघाकडे एक राईट टू मॅच कार्ड देखील उपलब्ध आहे.

IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
actor jitendra joshi speech in Sarva Karyeshu Sarvada Event
सामाजिक काम करणाऱ्यांना आपलेसे करा!
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Former BJP MP from Dindori Constituency Harishchandra Chavan passed away
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

तुफान फटकेबाजी करणारं त्रिकूट, उत्कृष्ट नेतृत्व आणि मजबूत फलंदाजी फळी असतानाही हैदराबादला केकेआरविरूद्ध आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि कोलकत्ता संघाविरुद्ध त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याचे संघाचे लक्ष्य असेल. हैदराबादच्या ताब्यात अनेक उत्कृष्ट खेळाडू होते. महत्त्वाचं म्हणजे हैदराबादच्या ताफ्यात भारतीय संघाचा भुवनेश्वर कुमार हा वेगवान गोलंदाज होता, हैदराबादचा संघ कदाचित भुवनेश्वर कुमारसाठी राईट टू मॅच कार्डचा वापर करू शकतो.

हैदराबाद संघामध्ये याशिवाय फलंदाजांमध्ये एडन मारक्रम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स यांसारखे फलंदाज होते तर वॉशिंग्टन सुंदर मार्को यान्सन यांसारखे खेळाडूही होते. त्यामुळे संघ कोणत्या खेळाडूंसाठी राईट टू मॅच कार्ड वापरणार आणि कोणत्या खेळाडूंवर बोली लावून त्यांना पुन्हा संघात सामील करणार याकडे सर्वांच्या नजरा आहे.