IPL 2025 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Match Score Updates: रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या धुवांधार अर्धशतकांच्या बळावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवला.

Live Updates

IPL 2025, CSK VS MI Highlights: आयपीएल २०२५ मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स  

22:53 (IST) 20 Apr 2025

रोहित-सूर्याची बाजी; मुंबईने उडवला चेन्नईचा धुव्वा

रोहित शर्मा (४५ चेंडूत ७६) आणि सूर्यकुमार यादव (३० चेंडूत ६८) यांच्या झंझावाची खेळींच्या बळावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवला.

22:52 (IST) 20 Apr 2025

सूर्यकुमार यादवचंही अर्धशतक

खेळपट्टीवर आल्यापासून आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या सूर्यकुमार यादवने खणखणीत अर्धशतक पूर्ण केलं.

22:23 (IST) 20 Apr 2025

रोहित शर्माचं अर्धशतक

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केलं.

21:41 (IST) 20 Apr 2025

अश्वनी कुमारच्या जागी रोहित शर्मा; दुबेच्या जागी अश्विन

मुंबई इंडियन्सने अश्वनी कुमारच्या जागी रोहित शर्माचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समावेश केला आहे. दुसरीकडे चेन्नईने अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या शिवम दुबेऐवजी अनुभवी रवीचंद्रन अश्विनचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समावेश केला आहे.

21:37 (IST) 20 Apr 2025

२ चौकारांसह मुंबईची सुरूवात

सीएसकेने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून रायन रिकल्टन आणि रोहित शर्माची जोडी उतरली आहे. रायन रिकल्टने पहिल्याच षटकात सलग दोन चौकार लगावत चांगली सुरूवात केली आहे. यासह मुंबईने पहिल्याच षटकात १० धावा केल्या.

21:16 (IST) 20 Apr 2025

दुबे-जडेजाची अर्धशतकं; चेन्नई १७६

शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या बळावर चेन्नईने १७६ धावांची मजल मारली.

21:14 (IST) 20 Apr 2025

रवींद्र जडेजाचं अर्धशतक

चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रवींद्र जडेजाने ट्रेंट बोल्टला षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं.

21:10 (IST) 20 Apr 2025

महेंद्रसिंग धोनी बाद

जसप्रीत बुमराहला मोठा फटका खेळण्याचा महेंद्रसिंग धोनीचा प्रयत्न तिलक वर्माच्या हातात जाऊन विसावला. त्याने पुढे झेपावत सुरेख झेल टिपला. त्याने ४ धावा केल्या.

20:57 (IST) 20 Apr 2025

बुमराहने दुबेला फसवलं

जसप्रीत बुमराहने अर्धशतकी खेळी करणाऱ्या शिवम दुबेला तंबूत परतावलं. त्याने ३२ चेंडूत ५० धावांची खेळी केली.

20:53 (IST) 20 Apr 2025

शिवम दुबेचं अर्धशतक

सलामीचे शिलेदार तंबूत परतल्यानंतर शिवम दुबेने डाव सावरत अर्धशतकी खेळी साकारली आहे.

20:15 (IST) 20 Apr 2025

सँटनरच्या अफलातून चेंडूवर शाईक रशीद यष्टीचीत

मिचेल सँटनरने आपल्या फिरकीची ताकद दाखवून देत शाईक रशीदला फसवलं. रायल रिकलटनने त्वरेने चेंडू पकडून त्याला यष्टीचीत केलं.

20:11 (IST) 20 Apr 2025

दीपक चहरने संपुष्टात आणली आयुष म्हात्रेची खेळी

१७व्या वर्षी आयपीएल पदार्पण करणाऱ्या आयुष म्हात्रेची आक्रमक खेळी दीपक चहरने संपुष्टात आणली.

19:54 (IST) 20 Apr 2025

रचीन रवींद्र बाद

अश्वनी कुमारने रचीन रवींद्रला बाद केलं.

19:26 (IST) 20 Apr 2025

चेन्नई सुपर किंग्सकडून नव्या खेळाडूचं पदार्पण

IPL 2025: कोण आहे आयुष म्हात्रे? १७ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूचं CSKकडून IPLमध्ये पदार्पण, रोहित शर्माला मानतो आदर्श
19:10 (IST) 20 Apr 2025

कर्ण शर्मा दुखापतीमुळे बाहेर, चेन्नई संघात आयुष म्हात्रे

मुंबई इंडियन्स

रायल रिकलटन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर- कार्बिन बॉश, रोहित शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, एस.राजू

चेन्नई सुपर किंग्स

शाईक रशीद, रचीन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओव्हर्टन, महेंद्रसिंग धोनी, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराणा

इम्पॅक्ट प्लेयर- अंशुल कंबोज, कमलेश नागरकोट्टी, रामकृष्ण घोष, सॅम करन, रवीचंद्रन अश्विन

19:06 (IST) 20 Apr 2025

आयुष म्हात्रे करणार पदार्पण

चेन्नई सुपर किंग्सने राहुल त्रिपाठीऐवजी आयुष म्हात्रेला पदार्पणाची संधी दिली आहे.

18:59 (IST) 20 Apr 2025

डेवाल्ड ब्रेव्हिस, आयुष म्हात्रे खेळणार?

मुंबईकर १७वर्षीय आयुष म्हात्रे आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील झाले आहेत. मुंबईकर आयुषला वानखेडेवर खेळण्याची संधी मिळणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

17:41 (IST) 20 Apr 2025

MI vs CSK Live:चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ

ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद

17:40 (IST) 20 Apr 2025

MI vs CSK Live: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर

IPL 2025, MI vs CSK Highlights: आयपीएलमधील एल क्लासिको सामना म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स या संघांमध्ये वानखेडेच्या मैदानावर खेळवला जात आहे.