IPL 2025, SRH VS MI Highlights: आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने हैदराबाद विरूद्ध सामन्यात बाजी मारत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत हैदराबादला १६३ धावांवर रोखले. तर नंतर रोहित-रिकल्टनची सुरूवात आणि सूर्या-विल जॅक्सने चांगली भागीदारी रचत मुंबईचा विजय निश्चित केला. तर तिलक वर्माने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. विल जॅक्सने कमालीची गोलंदाजी करत २ विकेट्स घेत धावाही केल्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Live Updates

IPL 2025 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: आयपीएल २०२५ मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे हायलाईट्स

23:25 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सचा विजय

मुंबईने १ धाव करण्यासाठी २ विकेट्स गमावत संपूर्ण षटक वाया घालवलं आणि १९व्या षटकात असा मिळवला विजय....

MI vs SRH: मुंबई इंडियन्सची गाडी रूळावर! यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय, हैदराबादला वानखेडेवर पाजलं पराभवाचं पाणी
22:54 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: विल जॅक्स झेलबाद

पॅट कमिन्सने १५व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विल जॅक्सला झेलबाद केलं. जॅक्सही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह मुंबईला ३३ चेंडूत ३५ धावांची गरज आहे.

22:43 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: सूर्यकुमार यादव झेलबाद

चांगल्या सुरूवातीनंतर सूर्यकुमार यादव कमिन्सच्य गोलंदाजीवर झेलबाद झाला. पॅट कमिन्सच्या १३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळायच्या नादात सूर्या झेलबाद झाला. सूर्यकुमारने विल जॅक्सबरोबर २९ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तर सूर्या १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावा करत माघारी गेला.

22:22 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: रिकल्टन झेलबाद

हर्षल पटेलच्या आठव्या षटकात रिकल्टने २ चौकार लागवत चांगली सुरूवात केली, पण नंतर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हिस हेडकरवी झेलबाद झाला. यासह मुंबईने ८ षटकांत २ विकेट गमावत ७० धावा केल्या आहेत. तर मुंबईला विजयासाठी ७२ चेंडूत ९३ धावांची गरज आहे.

22:18 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: रायन रिकल्टन नाहाद

रायन रिकल्टन झीशान अन्सारीच्या सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला होता. परंतु चौथ्या पंचांनी नो बॉल दिल्याने रिकल्टन मैदानावर परतला. हेनरिक क्लासेनचे ग्लोव्ह्ज विकेटच्या पुढे असल्याने हा निर्णय देण्यात आला.

22:08 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: पॉवरप्ले

पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात रायन रिकल्टनने इशान मलिंगाच्या गोलंदाजीवर चौकारांची हॅटट्रिक लगावली. यासह मुंबईने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावत ५५ धावा केल्या आहेत. रायन २१ धावा तर विल जॅक्स ८ धावा करत खेळत आहे.

21:57 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: रोहित शर्मा वादळी सुरूवातीनंतर झेलबाद

रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या षटकात दोन षटकार तर कमिन्सच्या षटकात एक षटकार लगावत झेलबाद झाला. कमिन्सच्या चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा फुल टॉसवर फटका खेळायला गेला, पण ट्रॅव्हिस हेडकरवी झेलबाद झाला. रोहितने पूल शॉट अन् चांगली फटकेबाजी करत सुरूवात केली. पण रोहित १६ चेंडूत ३ षटकारांसह २६ धावा केल्या.

21:46 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: मुंबईच्या फलंदाजीला सुरूवात

हैदराबादने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनची जोडी उतरली आहे. तर मोहम्मद शमीच्या हातात नवा चेंडू आहे. तर मुंबईने २ षटकांत संथ सुरूवात केली आणि बिनबाद ७ धावा केल्या आहेत.

21:19 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: मुंबईसमोर इतक्या धावांचे आव्हान

हार्दिक पंड्याच्या अखेरच्या षटकात अनिकेत वर्माने दोन तर पॅट कमिन्सने एक षटकार लगावत संघाची धावसंख्या २० षटकांत १६२ धावांवर पोहोचवली. वानखेडेच्या आजच्या सामन्यातील खेळपट्टीवर धावा काढणं कठीण होतं, पण क्लासेनने १८व्या षटकात २१ तर अखेरच्या षटकातील २२ धावांसह हैदराबादने १६२ धावांचा पल्ला गाठला. मुंबईकडून बुमराह, बोल्ट, हार्दिक यांनी १-१ तर विल जॅक्सने २ विकेट घेतल्या आहेत. यासह मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले आहे.

21:09 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: क्लासेन क्लीन बोल्ड

जसप्रीत बुमराहच्या १९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हेनरिक क्लासेन क्लीन बोल्ड झाला आहे. बुमराहने फुलटॉस चेंडू टाकत थेट क्लासेनचा त्रिफळा उडावला. बुमराहच्या खात्यातील या सामन्याची ही पहिली विकेट होती.

https://twitter.com/mipaltan/status/1912893329773342805

21:08 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: क्लासेनची बॅट तळपली

हेनरिक क्लासेनने दीपक चहरच्या १८व्या षटकात २१ धावा केल्या. क्लासेनने दोन षटकार आणि दोन चौकार लगावत अखेर एकेक धावांचा सिलसिला बंद केला. यासह १८ षटकांत हैदराबादने ४ बाद १३६ धावा केल्या आहेत.

21:03 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: वानखेडेवर फलंदाजांचं वर्चस्व

आजच्या सामन्यात वानखेडेवर फलंदाजांचं नाही तर गोलंदाजांच राज्य पाहायला मिळत आहे. वादळी फटकेबाजी करणाऱ्या हैदराबाद संघाला एकेक धाव काढण्यासाठी झगडावं लागत आहे. पण आजच्या सामन्यात मात्र गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत आहेत.

21:02 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: नितीश रेड्डी झेलबाद

ट्रेंट बोल्टच्या १७व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नितीश रेड्डी मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. नितीश रेड्डी एका चौकारासह १९ धावा करत बाद झाला.

20:40 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: विल जॅक्सच्या जाळ्यात अडकला हेड

विल जॅक्सच्या 12व्या षटकातील पहिला चेंडू त्याने वाईड टाकला. यानंतर पहिल्या लीगल चेंडूवर हेड मोठा फटका खेळण्याच्या नादात सीमारेषेजवळ सँटनरकडून झेलबाद झाला. हेड २९ चेंडूत ३ चौकारांसह २८ धावा करत बाद झाला. तर १२ षटकांत हैदराबादने ३ बाद ८३ धावा केल्या आहेत.

20:35 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: हेडला मिळालं जीवदान

हार्दिक पंड्याच्या १०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड झेलबाद झाला. पण मोठा ट्विस्ट म्हणजे हार्दिक पंड्याचा हा नो बॉल होता. त्यामुळे हेडला मैदानावर परतावं लागलं. तर फ्री हिट चेंडूवरही हेडला मोठा फटका खेळता आला अन् बाऊंड्री लाईनजवळ सँटनरने झेल टिपला, पण फ्री हिट असल्याने तो नाबाद राहिला. हैदराबादने १० षटकांत २ बाद ७५ धावा केल्या आहेत.

20:34 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: हेडला मिळालं जीवदान

हार्दिक पंड्याच्या १०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड झेलबाद झाला. पण मोठा ट्विस्ट म्हणजे हार्दिक पंड्याचा हा नो बॉल होता. त्यामुळे हेडला मैदानावर परतावं लागलं. तर फ्री हिट चेंडूवरही हेडला मोठा फटका खेळता आला अन् बाऊंड्री लाईनजवळ सँटनरने झेल टिपला, पण फ्री हिट असल्याने तो नाबाद राहिला. हैदराबादने १० षटकांत २ बाद ७५ धावा केल्या आहेत.

20:22 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: इशान किशन स्वस्तात परतला

विल जॅक्सच्या नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर इशान किशन स्टम्पिंगवर बाद झाला. यासह हैदराबादने दोन षटकात दोन विकेट गमावले. हैदराबादने ९ षटकांत २ बाद ७० धावा केल्या आहेत.

20:13 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: हार्दिक पंड्याला दुखापत

आठवे षटक टाकत असताना हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे २ चेंडूंनंंतर सामना थांबवण्यात आला आणि फिजिओने तपासणी केली. यानंतर तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने अभिषेक शर्माला झेलबाद केलं. यासह अभिषेक शर्मा ४० धावा करत बाद झाला. तर हैदराबादने ८ षटकांत १ बाद ६५ धावा केल्या आहेत.

20:08 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: पॉवरप्ले

पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादने एकही विकेट न गमावता ४६ धावा केल्या आहेत. पहिल्या ६ षटकांत मोठा ड्रामा पाहायला मिळाला आहे. दीपक चहरच्या पहिल्याच षटकात मुंबईने दोन झेल सोडले. यानंतर ओव्हरथ्रो पाहायला मिळाले. तर कर्ण शर्माच्या हाताला दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर गेला. हैदराबादलाही त्यांच्या वादळी अंदाजात फलंदाजी करताना अडथळे येत आहेत.

20:01 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: रोहित शर्माचा खास सन्मान

रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यापूर्वी खास सन्मान करण्यात आला. रोहित शर्मा आयपीएलच्या १८ ही सीझनमध्ये खेळला आहे. यंदा आयपीएलचं १८वं वर्ष आहे. यादरम्यान १८ ही सीझन खेळलेल्या खेळाडूंना आयपीएलकडून खास सन्मानचिन्ह देण्यात येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्याकडून हा सत्कार करण्यात आला.

https://twitter.com/IPL/status/1912869803083063564

19:50 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: कर्ण शर्माला दुखापत

दीपक चहरच्या तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा कर्ण शर्माने एक झेल सोडला. अभिषेक शर्माचा फटका लगावलेला चेंडू कर्णच्या पुढ्यात पडला आणि त्याच्या हाताला जाऊन लागला आणि त्याच्या हातातून रक्त आल्याने तो मैदानाबाहेर गेला आहे.

19:32 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: मुंबई वि. हैदराबाद सामन्याला सुरूवात

मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याला सुरूवात झाली असून दीपक चहरच्या हातात नवा चेंडू आहे. तर सनरायझर्स हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा फलंदाजीसाठी उतरला आहे. पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माचा झेल विल जॅक्सने सोडला आहे. तर चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडचा झेल कर्ण शर्माच्या हातून सुटला आहे.

19:08 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबादच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी, एशान मलिंगा

19:07 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आलेला नाही. मुंबईचा संघ प्रथम गोलंदाजी करत असल्याने रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनचा भाग नाही. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे.

रायन रिकेल्टन (विकेटकिपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा

https://twitter.com/mipaltan/status/1912864015836987706

19:01 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: नाणफेक

मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याची नाणेफेक झाली असून मुंबईने संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम नाणेफेक जिंकण्याचा निर्णय घेतला आहे. तर हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

https://twitter.com/IPL/status/1912862753976353028

18:58 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: काहीच वेळात होणार नाणेफेक

आज वानखेडेच्या मैदानावर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा सामना नक्कीच अटीतटीचा होणार आहे. काही वेळात नाणफेक होणार आहे.

16:53 (IST) 17 Apr 2025
MI vs SRH Live: हैदराबादला आव्हान देण्यासाठी मुंबई या ११ खेळाडूंना देऊ शकते संधी

या सामन्यासाठी अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११:

रोहित शर्मा, रायल रिकलटन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>

15:59 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: मुंबई की हैदराबाद कोण मारणार बाजी? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक विस्फोटक खेळाडू आहेत. दरम्यान दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ २३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान सनरायझर्स हैदराबादला १० तर मुंबईला १३ सामने जिंकता आले आहेत.

15:21 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: तिलक वर्माने रिटायर्ड आऊट केल्यानंतर पहिल्यांदाच केलं वक्तव्य

तिलक वर्माला मुंबई इंडियन्सच्या लखनौविरूद्धच्या सामन्यात रिटायर्ड आऊट करण्यात आलं होतं. याबाबत इतर सर्वांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या होत्या, पण तिलक वर्मानेही या घटनेवर भाष्य केलं. तो काय म्हणाला वाचा खालील लिंकमध्ये...

“मी कोच आणि स्टाफला सांगितलं…”, तिलक वर्माचं रिटायर्ड आऊट झाल्यानंतर मोठं वक्तव्य, पहिल्यांदाच ‘त्या’ घटनेबाबत म्हणाला…

15:07 (IST) 17 Apr 2025

MI vs SRH Live: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, वियान मुल्डर, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा, सचिन बेबी.

IPL 2025, MI vs SRH Highlights:आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय नोंदवत सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचं पाणी पाजलं आहे.