IPL 2025 Navjyot Singh Siddhu Ambati Rayudu Fight on Live TV: चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज अंबाती रायुडू सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांच्याशी झालेल्या वादाच्या एका दिवसानंतर, रायुडू थेट लाइव्ह सामन्यात नवजोत सिंग सिद्धू यांच्याशी भिडला. सीएसके वि. पंजाब किंग्स सामन्यात ही घटना घडली.

चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स सामन्यादरम्यान अंबाती रायुडू आणि नवज्योत सिंग सिद्धू समालोकन करत होते. हे सर्व सामन्यादरम्यान घडले जेव्हा रायुडूने सिद्धूवर ‘सरड्यासारखे रंग बदलता’ अशी टिपण्णी करत संघ बदलण्याचा आरोप केला, परंतु त्याला योग्य उत्तर मिळाले.

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात अंबाती रायुडू आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वाद झाला होता. धोनी बॅटिंगला येत असताना सिद्धू म्हणाला की, ‘आज धोनी धावत येतोय. यावेळी धोनी ज्या आवेगाने मैदानावर येतोय त्यावरून त्याचे इरादे कळत आहेत.’ यावर रायडू म्हणाला की हो, ‘धोनी आज तलवार घेऊन आला आहे.’ यावर सिद्धू म्हणतो, ‘अरे मित्रा, तू फलंदाजीला जातोय की युद्ध लढायला?’

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रायडू सिद्धूला म्हणत आहे की, ‘सरडा जितके रंग बदलत नाही, तितके तुम्ही संघ बदलताय.’ याला उत्तर देताना सिद्धू म्हणाला की ‘सरडा जर कोणाचा आराध्य देैवत असेल तर ते तुझं आहे.’ या वक्तव्यावरून धोनीवर निशाणा साधल्याचे चाहते म्हणत आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही सिद्धूने कॉमेंट्री करताना धोनीला लक्ष्य केलं होतं.

अंबाती रायडू महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जला भक्कम पाठिंबा देतो. तो दीर्घकाळ चेन्नई आणि धोनीचा विश्वासू राहिला आहे आणि तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर टीका केली आहे. नुकताच रायुडूचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात तो सहकारी समालोचक संजय बांगर यांच्याशी वाद घातला होता. मुंबई इंडियन्सच्या रणनीतीबाबत दोघांमध्ये वाद झाला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरवल्यावर हा वाद सुरू झाला.

संजय बांगर म्हणाले की क्षेत्ररक्षणादरम्यान रोहित शर्मा मैदानावर नसल्यामुळे मुंबई इंडियन्सचे नुकसान होत आहे. तो हार्दिक पांड्याला चांगले इनपुट देऊ शकतो. यावर अंबाती रायडूने विलंब न लावता हार्दिकला रोहितच्या इनपुटची गरज नसल्याचे सांगितले. हार्दिक हा कर्णधार आहे आणि तो त्याच्या मार्गाने जाईल. एवढेच नाही तर रायडूने असेही सांगितले की, जेव्हा कोहली कर्णधार होता आणि धोनी तिथे उपस्थित होता तेव्हा धोनीनेही त्याला प्रत्येक गोष्टीचा सल्ला दिला नाही.