IPL 2025 LSG VS KKR Live Match Updates: प्रियांश आर्यच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्सला १८ धावांनी नमवलं. प्रियांशच्या अविश्वसनीय खेळीनंतर मार्को यान्सन आणि शशांक सिंग यांची भागीदारी निर्णायक ठरली. पंजाबने २१९ धावांचा डोंगर उभारला. डेव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी मोठी भागीदारी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. महेंद्रसिंग धोनीने १२ चेंडूत २७ धावांची खेळी केली पण तीही अपुरी ठरली.
IPL 2025 Punjab Kings vs Chennai Super Kings Highlights: पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
पंजाब चेन्नईवर भारी
पंजाबने २१९ धावांचा यशस्वी बचाव करत चेन्नई सुपर किंग्स संघाला १८ धावांनी नमवलं. प्रियांश आर्यची वादळी शतकी खेळी पंजाबच्या विजयाचा केंद्रबिंदू ठरला.
महेंद्रसिंग धोनी बाद; यश ठाकूरला मोठं यश
६ चेंडूत २८ धावा हव्या असताना विदर्भवीर यश ठाकूरने महेंद्रसिंग धोनीला बाद करत चेन्नईच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. धोनीने १२ चेंडूत २७ धावांची खेळी केली.
कॉनवे रिटायर आऊट
चेन्नईने सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला रिटायर आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉनवेने ४९ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. त्याच्याऐवजी रवींद्र जडेजा मैदानात आला आहे.
चेन्नईला २५ चेंडूत ६९ धावा हव्या असताना धोनीचं आगमन
सामना जिंकण्यासाठीचं समीकरण अवघड होत असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं मैदानावर आगमन झालं आहे.
शिवम दुबे तंबूत
लॉकी फर्ग्युसनने मोक्याच्या क्षणी चेन्नईला जोरदार धक्का दिला. लॉकीने दुबेला त्रिफळाचीत केलं. दुबेने २७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.
विकेट्स हातात पण रनरेटचं आव्हान वाढतं
चेन्नईकडे विकेट्स आहेत पण धावगतीचं आव्हान षटकामागे १७ पर्यंत जाऊन पोहोचलं आहे.
दुबे-कॉनवेची फटकेबाजी
शिवम दुबे आणि डेव्हॉन कॉनवे यांनी तुफान फटकेबाजी करत चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. कॉनवेने यादरम्यान अर्धशतकही पूर्ण केलं आहे.
रवींद्र-ऋतुराज तंबूत; चेन्नईला दोन धक्के
रचीन रवींद्रपाठोपाठ कर्णधार ऋतुराज गायकवाडही तंबूत परतला आहे. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर शशांक सिंगने त्याचा सुरेख झेल टिपला.
मॅक्सवेलने मिळवून दिला ब्रेकथ्रू; रचीन रवींद्र तंबूत
२२० धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना रचीन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी चांगली सुरुवात करून दिली मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीसमोर रवींद्र निष्प्रभ ठरला. त्याने ३६ धावांची खेळी केली.
चेन्नईचे सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र या सलामी जोडीला अखेरीस सूर गवसला आहे. या दोघांनी शानदार फलंदाजी करत ५ षटकांत ४७ धावा केल्या आहेत. कॉन्वेने २१ धावा तर रचिनने २६ धावा केल्या आहेत.
प्रियांशच्या शतकानंतर यान्सन-शशांकची फटकेबाजी; पंजाबने उभारला २१९ धावांचा डोंगर
प्रियांश आर्यच्या शतकानंतर मार्को यान्सन आणि शशांक सिंग यांनी सहाव्या विकेटसाठी ३८ चेंडूत ६५ धावांची भागीदारी रचली. यामुळे पंजाबने २१९ धावांचा डोंगर उभारला.
वादळी शतकानंतर प्रियांश माघारी
४२ चेंडूत १०३ धावांची थराराक खेळी साकारल्यानंतर प्रियांश आर्य बाद झाला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचा प्रियांशचा प्रयत्न विजय शंकरच्या हातात जाऊन विसावला.
पथिराणाच्या षटकात लुटल्या २३ धावा
शतकवीर प्रियांश आर्यने मथिशा पथिराणाच्या षटकात २३ धावा कुटल्या.
प्रियांश आर्यचं अविश्सनीय शतक
२४वर्षीय प्रियांश आर्यने चेन्नईविरुद्ध ३९ चेंडूत शतकाला गवसणी घातली. मथिशा पथिराणाच्या षटकात ३ षटकार आणि चौकार लगावत प्रियांशने आयपीएलमधलं पहिलंवहिलं शतक गाठलं.
पंजाबचा निम्मा संघ तंबूत
प्रियांश आर्यच्या धुवांधार अर्धशतकानंतरही पंजाबची अवस्था बिकट झाली आहे. १० षटकं पूर्ण होण्याआधीच त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.
वढेरा, मॅक्सवेल अश्विनच्या जाळ्यात
अनुभवी रवीचंद्रन अश्विनने एकाच षटकात नेहल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांना तंबूत धाडण्याची किमया केली.
प्रियांश आर्यचं १९ चेंडूत अर्धशतक
फटकेबाजीसाठी प्रसिद्ध प्रियांश आर्यने १९ चेंडूतच अर्धशतकाला गवसणी घातली.
PBKS vs CSK live: पहिलाच चेंडू षटकार
पंजाबकडून सलामीला उतरलेल्या प्रियांश आर्याने खलील अहमदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली आहे.
PBKS vs CSK live: पीबीकेएसची प्लेईंग इलेव्हन
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जॉन्सन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.
PBKS vs CSK live: सीएसकेची प्लेईंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी/अंशुल कंबोज, खलील अहमद, मतिषा पाथिराना.
पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याची नाणेफेक श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली पंजाब संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. तर गेल्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनसह चेन्नईचा संघ उतरणार आहे.
PBKS vs CSK live: हेड टू हेड
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत ३० सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नईने १६ तर पंजाबने १३ सामने जिंकले आहेत.
PBKS vs CSK live: पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ
शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.
PBKS vs CSK live: चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद