IPL 2025, PBKS vs RR Highlights: राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळताना मुल्लापूर इथे झालेल्या लढतीत पंजाबवर ५० धावांनी विजय मिळवला. राजस्थानने यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्या नेतृत्वाखाली खेळताना २०५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबची सुरुवात डळमळीत झाली पण त्यानंतर नेहल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मॅरेथॉन भागीदारी करत डाव सावरला. हे दोघं राजस्थानचा विजयाचा घास हिरावणार असं चित्र असताना ५ मिनिटांच्या अंतरात दोघेही बाद झाले. ही जोडी फुटताच पंजाबच्या विजयाच्या आशा मावळल्या. राजस्थानतर्फे जोफ्रा आर्चरने ३ तर संदीप शर्मा आणि महेश तीक्षणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Live Updates

Punjab Kings vs Rajasthan Royals Highlights: पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स  

23:22 (IST) 5 Apr 2025

संजूचं नेतृत्व राजस्थानला फलदायी

राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळताना मुल्लापूर इथे झालेल्या लढतीत पंजाबवर ५० धावांनी विजय मिळवला. राजस्थानने यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्या नेतृत्वाखाली खेळताना २०५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबची सुरुवात डळमळीत झाली पण त्यानंतर नेहल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मॅरेथॉन भागीदारी करत डाव सावरला. हे दोघं राजस्थानचा विजयाचा घास हिरावणार असं चित्र असताना ५ मिनिटांच्या अंतरात दोघेही बाद झाले. ही जोडी फुटताच पंजाबच्या विजयाच्या आशा मावळल्या. राजस्थानतर्फे जोफ्रा आर्चरने ३ तर संदीप शर्मा आणि महेश तीक्षणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

23:17 (IST) 5 Apr 2025

राजस्थानची पंजाबवर ५० धावांनी सरशी

राजस्थानने पंजाबवर ५० धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. जोफ्रा आर्चरने ३ तर संदीप शर्मा आणि महेश तीक्षणाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

22:46 (IST) 5 Apr 2025

हासारंगा यशस्वी, नेहल वढेरा बाद

अफलातून फटकेबाजी करणाऱ्या नेहल वढेराला वानिंदू हासारंगाने रोखलं. ध्रुव जुरेलने सुरेख झेल टिपला. नेहलने ४१ चेंडूत ६२ धावांची शानदार खेळी केली.

22:43 (IST) 5 Apr 2025

तीक्षणाचा अचूक वेध; मॅक्सवेल माघारी

महेश तीक्षणाने फिरकीच्या जाळ्यात धोकादायक ग्लेन मॅक्सवेलला फसवलं. मॅक्सवेलने २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली.

22:37 (IST) 5 Apr 2025

नेहल वढेराचं अर्धशतक

४ शिलेदार तंबूत परतलेले असतानाही दडपणाने खचून न जाता नेहल वढेराने सुरेख खेळ करत अर्धशतक साकारलं.

22:25 (IST) 5 Apr 2025

वढेरा-मॅक्सवेलची अर्धशतकी भागीदारी

नेहल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी पंजाबची पडझड थांबवत अर्धशतकी भागीदारी केली. धावगतीचं आव्हान वाढत असताना या जोडीने नियमितपणे चौकार, षटकार वसूल करत डावाला आकार दिला.

22:10 (IST) 5 Apr 2025

प्रभसिमरन सिंहही तंबूत

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची घसरगुंडी सुरूच आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात समाविष्ट होताच कुमार कार्तिकेयने लगेचच प्रभसिमरन सिंगला तंबूत परतावलं.

21:46 (IST) 5 Apr 2025

पंजाबची घसरगुंडी

दोनशेपल्याड धावसंख्येचं लक्ष्य मिळालेल्या पंजाबची २६/३ अशी घसरगुंडी उडाली आहे.

21:14 (IST) 5 Apr 2025

राजस्थानला उभारला २०५ धावांचा डोंगर

संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग या त्रिकुटाच्या खणखणीत फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने मुल्लापूर इथे सुरू असलेल्या लढतीत पंजाबविरुद्ध २०५ धावांचा डोंगर उभारला. यशस्वी (६८), संजू (३८) आणि रियान (४३) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. पंजाबतर्फे लॉकी फर्ग्युसनने २ विकेट्स घेतल्या.

20:33 (IST) 5 Apr 2025

लॉकी फर्ग्युसनने यशस्वी जैस्वालला केलं त्रिफळाचीत

लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान चेंडूवर यशस्वी जैस्वाल त्रिफळाचीत झाला. यशस्वीने ४५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. यामध्ये ३ चौकार, ५ षटकारांचा समावेश होता.

20:18 (IST) 5 Apr 2025

संजू सॅमसन बाद

पंजाबला १० षटकं संघर्ष केल्यानंतर विकेट मिळाली आहे. लॉकी फर्ग्युसनने संजू सॅमसनला बाद केलं. संजूने २६ चेंडूत ३८ धावांची खेळी केली.

20:16 (IST) 5 Apr 2025

१० षटकात राजस्थानची ८५ धावांची मजल

यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी मुल्लापूर इथे सुरू असलेल्या पंजाबविरुद्धच्या लढतीत मनमुराद फटकेबाजी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

19:58 (IST) 5 Apr 2025

सॅमसन-जैस्वाल सुसाट

यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये ५१ धावा वसूल केल्या.

19:32 (IST) 5 Apr 2025

PBKS vs RR live: सामन्याला सुरूवात

पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्याला सुरूवात झाली आहे. राजस्थानकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वालची जोडी उतरली आहे. तर अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

19:09 (IST) 5 Apr 2025

PBKS vs RR live: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन

प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल

19:08 (IST) 5 Apr 2025

PBKS vs RR live: राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक, संदीप शर्मा

19:04 (IST) 5 Apr 2025
PBKS vs RR Live: नाणेफेक

पंजाब किंग्सने राजस्थानविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंजाबच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. तर राजस्थाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे.

18:51 (IST) 5 Apr 2025

PBKS vs RR Live: राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ

संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंह, तुषार देशपांडे, फजलहक फारूकी, क्वेना माफाका, अशोक शर्मा, संदीप शर्मा.

18:50 (IST) 5 Apr 2025

PBKS vs RR Live: पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्याला अविनाश, हरनूर सिंग, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, नेहल वढेरा, अजमतुल्ला उमरझाई, ॲरॉन हार्डी, मार्को यान्सन, ग्लेन मॅक्सवेल, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, झेव्हियर बार्टलेट, युझवेंद्र चहल, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर

IPL 2025, Punjab Kings vs Rajasthan Royals Highlights: आयपीएल २०२५ मधील आजचा दुसरा सामना पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे.