IPL 2025 Player Auction List Announced: आयपीएल २०२५ लिलावापूर्वी खेळाडूंच्या रिटेंशननंतर आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा आयपीएलच्या महालिलावावर असणार आहेत. आयपीएल 2025 साठी महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे. आता IPL गव्हर्निंग काऊन्सिलने ५७४ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे,जे लिलावात दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२५ साठी यावेळी जगभरातील १५७४ खेळाडूंनी मेगा लिलावासाठी नोंदणी केली होती. बीसीसीआयने यासाठी ४ नोव्हेंबरची अंतिम मुदत दिली होती. मात्र, दरवेळेप्रमाणे या वेळीही बीसीसीआयला फ्रँचायझींकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर बोर्डाने खेळाडूंची एक शॉर्टलिस्ट तयार केली, ज्यामध्ये ५७४ खेळाडूंना स्थान मिळाले. आता या ५७४ खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. सर्व १० फ्रँचायझींची रिटेंशन यादी जाहीर झाल्यानंतर फक्त २०४ खेळाडूंसाठी एकूण स्लॉट उपलब्ध आहेत.

हेही वाचा – IPL Auction Date: आयपीएल लिलावाची तारीख जाहीर, १ नव्हे दोन दिवस चालणार महालिलाव; १४७५ खेळाडूंचा समावेश

आयपीएल काऊन्सिलने जाहीर केलेल्या यादीनुसार, यावेळी एकूण ३६६ भारतीय खेळाडू लिलावात सहभागी होणार असून, २०८ विदेशी खेळाडूंचा समावेश असेल. यापैकी ४८ कॅप्ड भारतीय खेळाडू आहेत आणि ३१८ अनकॅप्ड आहेत. विदेशी खेळाडूंमध्ये १९३ कॅप्ड, १२ अनकॅप्ड आणि ३ सहयोगी देशांचे खेळाडू आहेत.

हेही वाचा – IPL Auction Date: आयपीएल लिलावाची तारीख जाहीर, १ नव्हे दोन दिवस चालणार महालिलाव; १४७५ खेळाडूंचा समावेश

सर्व ५७४ खेळाडूंची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आयपीएल लिलावात २ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

आयपीएल लिलावात ५७४ खेळाडूंपैकी सर्वाधिक लक्ष या १२ खेळाडूंवर असेल, हे मार्की खेळाडू आहेत. ज्यांना २ वेगवेगळ्या सेटमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक सेटमध्ये ६-६ खेळाडू असतात. पहिल्या सेटमध्ये जोस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. दुसऱ्या सेटमध्ये युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टन, डेव्हिड मिलर, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available see full list in marathi bdg