IPL 2025 Marathi Quiz: आयपीएल २०२५ ला दणक्यात सुरूवात झाली आहे. आयपीएल २०२५ पूर्वी महालिलाव झाला, त्यामुळे सर्व संघांचं चित्र बदलेलं आहे. प्रत्येक संघ अगदी तोडीस तोड दर्जाचे आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सर्व संघ अनेक नव्या चेहऱ्यांसह मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे एकूण ५ संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर या लीगमध्ये ९ संघांचे कर्णधार हे भारतीय खेळाडू आहेत तर एका संघाचा कर्णधार विदेशी खेळाडू आहे.

आयपीएल २०२५ साठीचं क्विझ

IPL 2025 साठी पाच संघांनी त्यांचे कर्णधार कायम ठेवले आहेत. ज्यात चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा समावेश आहे. तर इतर ५ संघांनी नव्या कर्णधारांवर संघाची जबाबदारी दिली आहे.

यंदाच्या सीझनमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्स, अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आणि रजत पटीदारच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाने आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. दिल्ली सुरूवातीच्या तीन सामन्यांपैकी सर्व सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने यंदा सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा त्यांच्या घरच्या मैदानावर दारूण पराभव केला आहे. तर पंजाब किंग्सचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तर मुंबई इंडियन्स आणि सीएसके या दोन्ही बलाढ्य संघांनी मात्र निराश केलं आहे.