IPL 2025 RCB appoints Omkar Salvi as bowling coach : एकीकडे आयपीएल २०२५ च्या हंगामाचा महालिलाव अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. अशात आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२५ च्या महालिलावापूर्वी आरसीबी संघाने आपल्या नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाचे नाव जाहीर करुन सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. आरसीबीने मुंबई वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक ओंकार साळवी यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. याबाबत आरसीबीने अधिकृत घोषणा केलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत ओंकार साळवी?

ओंकार साळवी यांचा एमसीएसोबतचा करार संपत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओंकार साळवीने आपल्या कारकिर्दीत जितक्या विकेट्स घेतल्या आहेत, त्यापेक्षा जास्त विकेट्स विराट कोहलीच्या नावावर फक्त आयपीएलमध्ये आहेत. ओंकार साळवीच्या लिस्ट-ए कारकिर्दीत फक्त एक विकेट आहे. मात्र, तो रेल्वेकडून एकच सामना खेळला. दुसरीकडे, जर आपण संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोललो तर त्याने आयपीएलमध्ये साळवीपेक्षा ४ विकेट्स जास्त घेतल्या आहेत. अशा प्रकारे, दिनेश कार्तिक संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे, जो मागील हंगामापर्यंत त्याच संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत होता.

ओंकार साळवी यांचा अनुभव –

अँडी फ्लॉवर संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील कोचिंगमध्ये साळवी हे मोठे नाव आहे. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ओंकार साळवी हे माजी भारतीय खेळाडू अविष्कार साळवी यांचे भाऊ आहेत. ओंकार यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबईने रणजी करंडक जिंकला, तर पंजाब संघाने सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकला. त्याचबरोबर इराणी ट्रॉफीमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईचे प्रशिक्षक होते. त्यांचा देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभव पाहून आरसीबीने त्यांच्याकडे मोठा जबाबदारी दिली असावी.

हेही वाचा – Cheteshwar Pujara : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराची एन्ट्री! अचानक मिळाली ‘ही’ मोठी जबाब

तसं पाहायला गेलं तर मुंबईसारख्या संघासाठी प्रशिक्षकाला फार काही करण्याची गरज नसते. कारण संघातील बहुतांश खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळलेले असतात. सध्या संघात भारताचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे, महान फलंदाज श्रेयस अय्यर, अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूर, अंडर-१९ विश्वविजेता कर्णधार पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे असे खेळाडू आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 rcb has appointed mumbaikar omkar salvi as its bowling coach ahead ipl 2025 mega auction vbm