IPL 2025, DC VS RCB Highlights: केएल राहुलच्या ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने गमावलेला सामना जिंकला आहे. दिल्लीने आरसीबीच्या घरच्या मैदानावर त्यांचा ६ विकेट्सने आणि १३ चेंडू राखून विजय मिळवला आहे. केएला राहुल संघाच्या विजयाच्या हिरो ठरला. दिल्लीने या विजयासह सलग चौथा सामना जिंकला आहे तर बंगळुरू घरच्या मैदानावर दुसरा सामना गमावला आहे.

Live Updates

IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Highlights: आयपीएल २०२५ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे हायलाईट्स

23:29 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: दिल्लीचा शानदार विजय

RCB vs DC: दिल्लीने RCBकडून हिसकावला विजय, कॅपिटल्सचा सलग चौथा विजय; केएल राहुल ठरला हिरो
22:45 (IST) 10 Apr 2025
RCB vs DC Live: केएल राहुलने केल्या २२ धावा

बंगळुरूमध्ये पावसाची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे डीएलएसप्रमाणे १५ षटकांत ११५ धावा दिल्लीच्या करण्याची गरज होती. पण केएल राहुलने १५व्या षटकात २२ धावा करत संघाला ६ धावांनी पुढे केलं आहे. जोश हेझलवुडच्या षटकात राहुलने ३ चौकार आणि एका षटकारासह संघाच्या विजयाच्या पाया रचला आहे.

22:37 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: केएल राहुलचं अर्धशतक

केएल राहुलने १४व्या षटकात ३३ चेंडूत आपलं महत्त्वपूर्ण अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह दिल्लीला विजयासाठी ३६ चेंडूत ६५ धावांची गरज आहे.

22:13 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live:अक्षर पटेल झेलबाद

सुयश शर्माच्या नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अक्षरने चौकार लगावला आणि षटकात धावा करण्याचा प्रयत्न करत होता, पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात टीम डेव्हिडकरवी झेलबाद झाला. यासह दिल्लीने चौथी विकेट गमावली.

21:57 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: दिल्लीने दिले विकेट

दिल्लीचे तिन्ही फलंदाज एकाच पद्धतीने बाद झाले. अभिषेक पोरेलदेखील भुवनेश्वर कुमारच्या पाचव्या षटकातीला तिसऱ्या चेंडूवर अक्रॉस द लाईन फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच उडाला आणि जितेश शर्माने झेल टिपला. याह दिल्लीने ५ षटकांत ३ बाद ३१ धावा केल्या आहेत.

21:41 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: जेक फ्रेझरने गिफ्ट केली विकेट

भुवनेश्वर कुमारच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू हवेत उंच उडाला आणि यष्टीरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद झाला. यासह दिल्लीने ३ षटकांत २ बाद १९ धावा केल्या आहेत.

21:39 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: आरसीबीच्या खात्यात पहिली विकेट

आरसीबीने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फाफ डू प्लेसिस आणि जेक फ्रेझर मॅकगर्क सलामीसाठी उतरले होते. पण फाफ डू प्लेसिस झेलबाद झाला. यश दयालच्या दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला आणि चेंडू हवेत उंच उडाला अन् रजत पाटीदारने त्याला झेलबाद केलं.

21:13 (IST) 10 Apr 2025
RCB vs DC Live: आरसीबीने दिले इतक्या धावांचे लक्ष्य

टीम डेव्हिडने १९व्या षटकात १७ धावा तर अखेरच्या षटकात १९ धावा केल्या आणि यासह धावांसाठी कष्ट करत असलेल्या आरसीबीला १६३ धावांचा टप्पा गाठून दिला आहे. टीम डेव्हिडने २० चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३७ धावा केल्या. आरसीबीने ३ षटकांत ५३ धावा केल्या होत्या. पण फिल सॉल्ट चौथ्या षटकात धावबाद झाल्यानंतर संघाचा डाव रूळावरून घसरला आणि संघाने एकामागून एक विकेट गमावल्या. दिल्लीने आरसीबीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात असं अडकवलं की कोणताच फलंदाज पुनरागमन करू शकला नाही. यासह दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य मिळालं आहे.

20:56 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: सातवी विकेट

विपराज निगमच्या अठराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कृणाल पंड्या झेलबाद झाला. आरसीबीच्या संघाने चांगल्या सुरूवातीनंतर मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत आहे.

20:47 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: रजत पाटीदार झेलबाद

कुलदीप यादवच्या १५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रजत पाटीदार झेलबाद झाला. कुलदीपने गुगली टाकत आरसीबीच्या कर्णधाराला चकवले आणि मोठी विकेट आपल्या नावे केली. यासह आरसीबीने १५ षटकांत अवघ्या ११७ धावा केल्या आहेत.

20:34 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live:जीवदान अन् विकेट

कुलदीप यादवच्या ११ व्या षटकातील पहिला चेंडू जितेश शर्माच्या पॅडवर जाऊन आदळला, पण विकेटवर न आदळल्यामुळे त्याला बाद दिलं नाही आणि जितेशला जीवदान मिळालं. पण दुसऱ्या चेंडूवर कुलदीपने असा चेंडू टाकला की जितेशला चेंडूच कळला नाही आणि बॅटची कड घेत चेंडू हवेत उडाला आणि राहुलने टिपला. यासह आरसीबीचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.

20:21 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: दिल्लीच्या खात्यात तिसरी विकेट

आरसीबीच्या संघाने एका चांगल्या सुरूवातीनंतर झटपट विकेट गमावल्या आहेत. मोहित शर्माच्या १०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात लिव्हिंगस्टोन झेलबाद झाला.यासह आरसीबीने १० षटकांत ४ बाद ९१ धावा केल्या आहेत.

20:07 (IST) 10 Apr 2025
RCB vs DC Live: विराट झेलबाद

चांगल्या सुरूवातीनंतर आरसीबीचा डाव कोसळला आहे. सॉल्ट पड्डिकलनंतर विराट कोहलीही झेलबाद झाला. आठव्या षटकातील विपराज निगमच्या तिसऱ्या चेंडूवर विराटने षटकार लगावला. तर अखेरच्या चेंडूवर विराट कोहली स्टार्ककरवी झेलबाद झाला. यासह आरसीबीने ७ षटकांत ३ बाद ७४ धावा केल्या आहेत.

19:59 (IST) 10 Apr 2025
RCB vs DC Live: पड्डिकल झेलबाद

फिल सॉल्ट धावबाद झाल्यानंतर आरसीबीच्या धावांना ब्रेक लागला. सॉल्टच्या विकेटनंतर संघाला एकही बाऊंड्री लगावता आली नाही आणि अखेरीस संघाने दुसरी विकेट गमावली. देवदत्त पड्डिकल १ धावा करत मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यासह आरसीबीने पॉवरप्लेमध्ये २ बाद ६४ धावा केल्या आहेत.

19:53 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: सॉल्ट दुर्देवीरित्या रनआऊट

स्टार्कच्या षटकात ३० धावा कुटल्यानंतर पुढच्याच षटकात आरसीबीने मोठी विकेट गमावली. सॉल्ट अक्षर पटेलच्या षटकात धावबाद झाला. चेंडू टोलवत सॉल्ट धाव घेण्यासाठी गेला आणि अर्ध्यातच पाय घसरून पडला, तितक्यात चेंडू केएल राहुलच्या हातात आला आणि त्याने बेल्स उडवल्या.

19:47 (IST) 10 Apr 2025
RCB vs DC Live: सॉल्टची फटकेबाजी

फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने स्टार्कच्या एका षटकात ३० धावा कुटल्या आहेत. फिल सॉल्टने स्टार्कच्या षटकात पहिल्या चारही चेंडूवर मोठे फटके खेळले. पहिल्या चेंडूवर दोन षटकार, पुढच्या दोन चेंडूवर चौकार, तर नो बॉलवर चौकार आणि फ्री हिटवर षटकार लगावत स्टार्कची धुलाई केली. यानंतर विराटने अखेरच्या चेंडूवर विराटने चौकार लगावत ३ षटकांत ५३ धावा केल्या आहेत.

19:40 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: दुसऱ्या षटकात १६ धावा कुटल्या

विराट आणि सॉल्टने दुसऱ्या षटकात १६ धावा कुटल्या आहेत. फिरकीपटू अक्षर पटेल गोलंदाजीला आला आणि विराटने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. तर चौथ्या-पाचव्या चेंडूवर सॉल्टने चौकार-षटकार लगावले. यासह आरसीबीने दोन षटकांत बिनबाद २३ धावा केल्या आहेत.

19:38 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: सामन्याला सुरूवात

आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याला सुरूवात झाली असून आरसीबीकडून विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी उतरली आहे. तर दिल्लीकडून मिचेल स्टार्कने गोलंदाजी आक्रमणाला सुरूवात केली.

19:25 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live:विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा

आयपीएल २०२५ मध्ये चांगल्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीकडून आरसीबी चाहत्यांना पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. माजी भारतीय कर्णधाराने या हंगामात आतापर्यंत चार सामन्यांमध्ये ५४.६६ च्या प्रभावी सरासरीने आणि १४३.८५ च्या स्ट्राईक रेटने १६७ धावा केल्या आहेत. कोहलीने आयपीएलमध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळताना ३ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

19:09 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

19:08 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: आरसीबीची प्लेईंग इलेव्हन

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल

19:02 (IST) 10 Apr 2025
RCB vs DC Live: नाणेफेक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यातील नाणेफेक दिल्ली संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल झाला आहे. फाफ डू प्लेसिस फिट झाला असून संघात परतला आहे. तर आरसीबीचा संघात एकही बदल करण्यात आलेला नाही.

18:59 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: आरसीबीची चांगली सुरूवात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये दमदार सुरुवात केली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने चार सामने खेळले आहेत आणि तीन जिंकले आहेत. आरसीबीला फक्त गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला आहे.

18:57 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार बदलला

CSK चा मोठा निर्णय! धोनी पुन्हा झाला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, IPL 2025 च्या उर्वरित सामन्यांमध्ये करणार नेतृत्त्व

18:55 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: विजयीरथावर दिल्ली कॅपिटल्स स्वार

दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२५ मध्ये अद्याप एकही सामना गमावलेला नाही. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली संघाने लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे.

18:19 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव</p>

18:18 (IST) 10 Apr 2025

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडागे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड

IPL 2025, RCB vs DC Highlights: दिल्ली कॅपिटल्सने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आरसीबीचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे.