IPL 2025, PBKS VS RCB Live Cricket Score Updates: पावसामुळे प्रत्येकी १४ षटकांच्या लढतीत पंजाब किंग्ज संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ५ विकेट्सनी विजय मिळवला. टीम डेव्हिडच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूने ९५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबनेही विकेट्स गमावल्या पण नेहल वढेराने नाबाद ३३ धावांची खेळी करत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं
IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज
नेहल वढेराची दिमाखदार खेळी; पंजाबची बंगळुरूवर सरशी
९५ धावांचा पाठलाग करताना नेहल वढेराच्या नाबाद ३३ धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबने बंगळुरूवर ५ विकेट्सनी विजय मिळवला.
पंजाबचीही घसरगुंडी
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचीही घसरगुंडी उडाली आहे. श्रेयस अय्यर आणि जोश इंगलिस तंबूत परतले आहेत.
पंजाबने गमावले सलामीवीर
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या सलामीवीरांना गमावलं आहे.
टीम डेव्हिडने इभ्रत राखली
सहकारी एकामागोमाग एक बाद होत असताना टीम डेव्हिडने आरसीबीची इभ्रत राखली. आरसीबीने १४ षटकात ९५ धावा केल्या. यापैकी डेव्हिडने ५० धावा केल्या. डेव्हिडने ५ चौकार आणि ३ षटकारांसह २६ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी साकारली.
मनोज भडागे इम्पॅक्ट प्लेयर
आरसीबीने अष्टपैलू लायम लिव्हिंगस्टोनऐवजी मनोज भडागेला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात घेतलं आहे.
कर्णधार रजत पाटीदारही माघारी
पावसामुळे बंगळुरूची लय पूर्णत: बिघडली आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारही मोठी खेळी करू शकला नाही. त्याने २३ धावा केल्या.
आरसीबीचा निम्मा संघ तंबूत
१४ षटकांच्या छोटेखानी लढतीत आरसीबीने ५ विकेट्स गमावल्या आहेत. विराट कोहली, फिल सॉल्ट या सलामीवीरांसह लायम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा आणि कृणाल पंड्या असे पाच शिलेदार तंबूत परतले आहेत.
बंगळुरूचे चौघे शिलेदार तंबूत; पंजाब सुसाट
फिरकीपटू युझवेंद्र चहलने आरसीबीचा विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माला बाद केलं.
लायम लिव्हिंगस्टोन माघारी
झेव्हियर बार्टलेटने लायम लिव्हिंगस्टोनला बाद केलं. त्याने ४ धावा केल्या.
अर्शदीपने केलं विराट कोहलीला बाद
१४ षटकांच्या सामन्यात आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या विराट कोहलीला अर्शदीप सिंगने बाद केलं. डाऊन द ट्रॅक येत विराटने जोरदार चेंडू मारला. मिडऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मार्को यान्सनने मागे धावत जात सुरेख झेल टिपला.
फिल सॉल्ट तंबूत
अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्टला तंबूत परतावलं. विकेटकीपर जोश इंगलिसने अतिशय उत्तम झेल टिपला.
पंजाब संघात मार्कस स्टॉइनस
पंजाबने अंतिम अकरात अष्टपैलू मार्कस स्टॉइनसला संधी दिली आहे. अनेक वर्ष आरसीबीचा भाग असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला अंतिम अकरातून वगळण्यात आलं आहे. मात्र इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत मॅक्सवेलचा समावेश आहे. हरप्रीत ब्रारलाही संधी देण्यात आली आहे.
पंजाबने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे सव्वा दोन तास उशिरा होणारा हा सामना प्रत्येकी १४ ओव्हरचा असणार आहे. पॉवरप्ले ४ ओव्हरचा असेल.
बंगळुरूत पाऊस थांबला, कव्हर्स काढायला सुरुवात
बंगळुरूत पाऊस थांबल्यामुळे सामना सुरू होण्याची चिन्हं आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर उत्तम अशी ड्रेनेज व्यवस्था असल्याने पाण्याचा पटकन निचरा होतो. सामन्याचा जवळपास दोन तास वेळ वाया गेल्याने हा सामना कमी षटकांचा असेल. पंच, सामनाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली.
गुणतालिकेत बंगळुरू-पंजाब कडवी टक्कर
गुणतालिकेत आरसीबी तिसऱ्या स्थानी आहे. ६ सामन्यांपैकी त्यांनी ४ जिंकलेत आणि दोनमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पंजाब किंग्ज चौथ्या स्थानी असून, ६ सामन्यात त्यांनीही ४ सामने जिंकले आहेत आणि दोनमध्ये पराभूत झाले आहेत. मात्र आरसीबीच्या तुलनेत त्यांना नेट रनरेट कमी आहे.
बंगळुरूत पाऊस सुरूच
बंगळुरूत पावसाचा जोर कायम राहिल्याने सामना सुरू होऊ शकलेला नाही. पाऊस असल्यामुळे टॉसही झालेला नाही.
१७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरू झालं होतं आयपीएल
१७ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २००८ रोजी आयपीएल स्पर्धेची सुरुवात झाली होती. सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलमने नाबाद १५८ धावांची अविश्सनीय खेळी साकारली होती. कोलकाता संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर मोठा विजय मिळवला होता. जाणून घ्या त्या दिवशी काय काय घडलं होतं?
पावसामुळे टॉस लांबणीवर
बंगळुरूत पाऊस पडत असल्याने टॉस नियोजित वेळी होऊ शकलेला नाही.
ग्लेन मॅक्सवेल आणि युझवेंद्र चहल ठरणार का आरसीबीची डोकेदुखी?
युझवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल अनेक वर्ष रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होते. मात्र आता ते पंजाब किंग्ज संघाचा भाग आहेत. बंगळुरूतल्या चिन्नास्वामी स्टेडियमची दोघांनाही माहिती आहे. हे दोघं आरसीबीची डोकेदुखी ठरू शकतात.
RCB vs PBKS Live: पंजाब किंग्जचा संपूर्ण संघ
पंजाब किंग्ज- शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार (कर्णधार), लियम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज सिंह, मनोजभनंद भांडगे, जॅकब बेथेल, स्वप्निल सिंह, अभिनंदन सिंह, रोमारियो शेपर्ड, लुंगी न्गिदी, नुआन थुसारा, मोहित राठी, स्वास्तिक चिकारा.