IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Rajasthan Royals Live Match Score Updates : आज बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ घरच्या मैदानावर विजय मिळवण्यात संघर्ष करताना दिसतोय. त्यामुळे आजतरी हा संघ घरच्या मैदानावर विजय मिळवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
RCB vs RR Live : बंगळुरूत कोहली- पडिक्कलचा 'विराट' शो! राजस्थानसमोर जिंकण्यासाठी ठेवलं २०६ धावांचं आव्हान
पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. या डावात फलंदाजी करताना विराटने ७० धावा चोपल्या. तर देवदत्त पडिक्कलने ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकअखेर २०५ धावा केल्या आहेत.
RCB vs RR Live: आरसीबीला चौथा धक्का
आरसीबीला चौथा धक्का बसला आहे. विराट कोहली बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कलने पॅव्हेलियनची वाट धरली . आता रजत पाटीदारही स्वस्तात माघारी परतला आहे.
RCB vs RR Live: आरसीबीला दुसरा मोठा धक्का! विराट कोहली आऊट
विराट कोहलीने सलामीला फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्याला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो ७० धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरूवात करून दिली आहे. विराटने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, तर आरसीबीचं सांघिक शतक पूर्ण झालं आहे.
RCB vs SRH Live: पावरप्लेमध्ये आरसीबीची दमदार सुरूवात
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पावरप्लेमध्ये ६ षटकात ५९ धावा चोपल्या आहेत. सॉल्ड २५ तर विराट २७ धावांवर नाबाद आहे.
RCB vs RR Live: अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
राजस्थान रॉयल्स (Playing XI): यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, फझलहक फारुकी, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Playing XI): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेविड, क्रुणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल
RCB vs RR Live: राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय
बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
RCB vs RR Live: गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी?
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. राजस्थानला आतापर्यंत केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ५ सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. हा सामना जिंकून आरसीबीकडे आणखी पुढे जाण्याची संधी असणार आहे.
<br />IPL 2025, RCB vs RR LIVE Cricket Score Updates: