IPL 2025 RR vs GT Highlights: आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने पहिल्या डावात फलंदाजी करताना २०९ धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थानला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने वादळी शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थानने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.

Live Updates

[caption id="attachment_5009171" align="alignnone" width="670"]GT Vs RR Live Match Score Updates in Marathi IPL 2025 RR vs GT Highlihts[/caption]

23:25 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: राजस्थानचा गुजरातवर एकतर्फी विजय

या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने हा सामना १५ षटकात जिंकला आहे. हा सामना ८ गडी राखून जिंकत राजस्थानने आपलं संघातील आव्हान कायम ठेवलं आहे.

22:24 (IST) 28 Apr 2025

RCB vs RR Live: गुजरातवर वैभव गरजला

अवघ्या १४ वर्षांच्या पोराने गुजरातच्या अनुभवी गोलंदाजांची झोप उडवली आहे. राजस्थानने १० षटकांच्या आत १३० धावांचा पल्ला गाठला आहे.

22:04 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: वैभव सूर्यवंशीचं विक्रमी अर्धशतक

या सामन्यात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. वैभव हा या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

21:57 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: राजस्थानची वादळी सुरूवात

राजस्थानला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने मिळून ४ षटकात ६० धावा कुटल्या आहेत.

21:20 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: गिल – सुदर्शनची जोडी चमकली! राजस्थानला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी २१० धावांचे आव्हान

या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २०९ धावा केल्या आहेत. गुजरातकडून शुभमन गिलने ८४ धावांची खेळी केली. साई सुदर्शनने ३९ धावा केल्या. तर बटलरने अर्धशतकी खेळी केली.

21:07 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live : गुजरातचे ३ फलंदाज तंबूत

गुजरातला तिसरा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर १३ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

20:57 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: गुजरातला दुसरा धक्का

गुजरात टायटन्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शुबमन गिल ८४ धावांवर माघारी परतला आहे.

20:46 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: गुजरातच्या १५० धावा

साई सुदर्शन बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि जोस बटलरने मिळून राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गुजरातने १५ व्या षटकात १५० धावांचा पल्ला गाठला आहे.

20:28 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: गुजरातची दमदार सुरूवात! गिल- सुदर्शनची जोडी जमली

या सामन्यातही गुजरात टायटन्सने दमदार सुरूवात केली आहे. सलामीला आलेल्या शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. तर साई सुदर्शन ३९ धावांवर माघारी परतला. गुजरातने १२ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

20:21 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: गुजरातला पहिला धक्का

गुजरातला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन ३९ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

20:16 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: शुबमन गिलचं अर्धशतक पूर्ण

गिलने गुजरात टायटन्सला दमदार सुरूवात करून दिली आहे. गिलने या डावात फलंदाजी करताना २९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

20:00 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: पावरप्ले

पावरप्लेच्या षटकांमध्ये गुजरात टायटन्सची जोडी खंबीरपणे उभी राहिली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी मिळून पावरप्लेमध्ये ५० धावांचा आकडा घातला आहे.

19:11 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

राजस्थान रॉयल्स (Playing XI): यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेतमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, संदीप शर्मा, युध्वीर सिंह चरक

गुजरात टायटन्स (Playing XI): साई सुधर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, करीम जनत, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

19:03 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: राजस्थानचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

18:18 (IST) 28 Apr 2025

RR vs GT Live: कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

गुजरातचा संघ या हंगामात चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला अजूनही सूर गवसलेला नाही. या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ आतापर्यंत ७ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान गुजरातने ६ सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला केवळ १ सामना जिंकता आला आहे.