IPL 2025, Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Highlights: केकेआरने राजस्थान रॉयल्सच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत 8 विकेट्सने सामना जिंकला आहे. यासह केकेआरने गुणतालिकेत महत्त्वाचे २ गुण कमावत खाते उघडले. केकेआरच्या या विजयाचा स्टार ठरले क्विंटन डि-कॉक आणि संघाचे फिरकीपटू. फिरकीपटूंनी सर्वाधिक विकेट घेत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर क्विंटन डिकॉकने ९७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. राजस्थानच्या संघाने चांगली झुंज दिली. पण फलंदाजी करताना १५१ धावा ही साधारण धावसंख्या उभारल्याचा त्यांना फटका बसला आणि सलग दुसरा पराभव त्यांना स्वीकारावा लागला.
RR vs KKR IPL 2025 Match Highlights: आयपीएल २०२५ मधील केकेआरने पहिला विजय नोंदवत गुणतालिकेत आपले खाते उघडले. राजस्थानचा त्यांच्या घरच्या मैदानावर ८ विकेट्सने पराभव केला.
RR vs KKR Live: केकेआरने उघडलं विजयाचं खात
केकेआरने राजस्थानचा ८ विकेट्सने पराभव करत आयपीएल २०२५ मधील विजयाचं खात उघडलं आहे. क्विंटन डि-कॉकने ९७ धावांची तर अंगक्रिश रघुवंशीने २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिले. तर केकेआरच्या फिरकीपटूंनी विजयाचा पाया रचला.
RR vs KKR Live: केकेआरला विजयासाठी इतक्या धावांची गरज
केकेआरला विजयासाठी १८ चेंडूत १७ धावांची गरज आहे. क्विंटन डिकॉक आणि अंगक्रिश रघुवंशीची जोडी मैदानात आहे.
RR vs KKR Live: अजिंक्य रहाणे झेलबाद
हसरंगाच्या ११व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला आणि चेंडू हवेत उंच उडाला. तितक्यात तुषार देशपांडेने त्याचा झेल टिपत १८ धावांवर त्याला झेलबाद केलं. यासह केकेआरने ११ षटकांत २ बाद ८० धावा केल्या आहेत.
RR vs KKR Live: मोईन अलीची विकेट
रियान परागच्या सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोईन अलीने फटका खेळत एक धाव घेतली आणि तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला तितक्यात महिश तीक्ष्णाने चेंडू फेकला. रियानने झटपट चेंडू घेत मोईन अलीला धावबाद केले. यासह केकेआरला पहिला धक्का बसला. यासह केकेआरने ७ षटकांत १ बाद ४४ धावा केल्या आहेत.
राजस्थानने दिलेल्या १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी केकेआर संघाकडून मोईन अली आणि क्विंटन डी कॉक फलंदाजीसाठी उतरले आहेत. आर्चरने पहिल्याच षटकात कमालीची गोलंदाजी करत १ धाव दिली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने केकेआरच्या भेदक गोलंदाजीपुढे अवघ्या ९ विकेट्स गमावत अवघ्या १५१ धावा केल्या आहेत. यामध्ये ध्रुव जुरेलने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली.
यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसनने संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. ८ षटकांच्या आत राजस्थानने ६७ धावा केल्या होत्या. पण संजू सॅमसन, रियान पराग आणि यशस्वी जैस्वाल यांच्या विकेटनंतर राजस्थानच्या धावांना ब्रेक लागला. धावांना ब्रेक लागण्यामागचं अजून कारण होत ते म्हणजे केकेआरची फिरकी गोलंदाजी. सुनील नरेनच्या अनुपस्थितीतही संघाने चांगली गोलंदाजी करत विकेट्स घेतले.
केकेआरच्या सर्व पाच गोलंदाजांनी विकेट्स घेत योगदान दिले.
RR vs KKR Live: जोफ्रा आर्चर क्लीन बोल्ड
अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार लगावत आर्चरने चांगली सुरूवात केली. पण स्पेन्सर जॉन्सनने त्याला अजून मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही आणि पाचव्या चेंडूवर क्लीन बोल्ड करत त्याला माघारी धाडले.
हर्षित राणाने १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर संघासाठी महत्त्वपूर्ण धावा करणारा ध्रुव जुरेल क्लीन बोल्ड झाला. ध्रुव जुरेल २८ चेंडूत ५ चौकारांसह ३३ धावा केल्या. तर आर्चरने पुढच्याच चेंडूवर षटकार लगावला. पण अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळत शिमरॉन हेटमायर झेलबाद झाला.
वैभव अरोराच्या १५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शुभम दुबे रसेलकरवी झेलबाद झाला. संघाला चांगल्या भागीदारीची गरज असताना शुभम दुबेही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह राजस्थानने १५ षटकांत ६ बाद ११० धावा केल्या.
RR vs KKR Live: नितीश राणाने पुन्हा केलं निराश
केकेआरचा पदार्पणवीर मोईन अलीने ११व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर क्लीन बोल्ड करत राजस्थान संघाला धक्का दिला आहे. नितीश राणा ८ धावा करत बाद झाला.
RR vs KKR Live: वरूण चक्रवर्तीच्या खात्यात दुसरी विकेट
वरूण चक्रवर्तीने १०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर फिरकीविरूद्ध कमालीची फलंदाजी करणाऱ्या वानिंदू हसरंगाला झेलबाद केले. हसरंगा ४ चेंडूत ४ धावा करत बाद झाले.यासह १० षटकांत राजस्थानने ४ बाद ७६ धावा केल्या आहेत.
RR vs KKR Live: यशस्वी जैस्वालही आऊट
रियान परागच्या विकेटनंतर राजस्थान रॉयल्सला अजून एक मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ झेलबाद झाला. केकेआरचा पदार्पणवीर मोईन अलीला दुसऱ्या षटकात मोठी विकेट मिळवण्यात यश आले. जैस्वाल २४ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांसह २९ धावा करत बाद झाला.
RR vs KKR Live: रियान पराग झेलबाद
आठव्या षटकातील वरूण चक्रवर्तीच्या पाचव्या चेंडूवर रियान पराग झेलबाद झाला. १५ चेंडूत ३ षटकारांसह २५ धावा करत रियानने त्याच्या घरच्या मैदानावर चांगली सुरूवात केली होती. पण वरूण चक्रवर्तीच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला. यासह राजस्थानने ८ षटकांत २ बाद ६७ धावा केल्या आहेत.
RR vs KKR Live: संजू सॅमसन क्लीन बोल्ड
राजस्थान रॉयल्सला चौथ्या षटकात मोठा धक्का बसला आहे. तुफान फॉर्मात असलेला संजू सॅमसन वैभव अरोराच्या चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला आहे. यासह संजू सॅमसन ११ चेंडूंत २ चौकारांसह १३ धावा केल्या.
RR vs KKR Live: राजस्थान-कोलकाता सामन्याला सुरूवात
केकेआर वि. आरआर सामन्याला सुरूवात झाली आहे. राजस्थानकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वालची जोडी उतरली आहे. तर केकेआरकडून स्पेन्सर जॉन्सनच्या हातात नवा चेंडू आहे. यासह जैस्वालने चौकारासह सुरूवात केली तर संजू सॅमसनने चौकारासह षटकाचा शेवट केला.
राजस्थान रॉयल्सच्या संघातही बदल झालेला आहे. फजलहक फारूकीच्या जागी वानिंदु हसरंगा या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (क), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
For the first time as a Royal. Wanindu Hasaranga. ?? pic.twitter.com/ll9RKO2h2N
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 26, 2025
कोलकाता नाईट रायडर्स संघाने मोईन अलीला पदार्पणाची कॅप दिली आहे. दरम्यान संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे सुनील नरेनच्या रूपात. सुनील नरेन आजारी असल्याने त्याच्या जागी मोईन अली खेळताना दिसणार आहे.
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
Magic Mo makes his debut as a Knight ??
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 26, 2025
He replaces Sunil who’s rested ‘cause of being unwell. pic.twitter.com/h177YT3yQD
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याची नाणेफेक केकेआरने जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर घरच्या मैदानावर खेळणारा राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. तर केकेआरच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
RR vs KKR Live: रियान पराग राजस्थान रॉयल्सचा कर्णधार
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन राहिला आहे आणि आयपीएल २०२५ मध्ये देखील राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनच असणार आहे. पण संजू सॅमसनला या स्पर्धेपूर्वी भारतीय संघातून खेळताना हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एनसीएने त्याला फलंदाजी करण्यासाठी फिट घोषित केले. पण विकेटकिपिंगसाठी अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे आयपीएल २०२५ मधील सुरूवातीचे सामने रियान पराग संघाचा कर्णधार असणार आहे.
RR vs KKR Live updates: हेड टू हेड
आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी १४-१४ सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांमधील आतापर्यंत २ सामने अनिर्णित आहेत. दोन्ही संघ आकडेवारीत बरोबरीत आहेत
RR vs KKR Live: कोलकाताचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लाव्हेन्सी, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया
RR vs KKR Live: राजस्थान रॉयल्सचा संघ
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्ष्णा, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, युधवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सुर्यवंशी, क्वेना मफाका, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.