IPL 2025, RR vs LSG Live Cricket Score Updates: अटीतटीच्या मुकाबल्यात लखनौ सुपरजायंट्स संघाने अवेश खानच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दोन धावांनी अविश्वसनीय विजय मिळवला.
IPL 2025 Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Highlights: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स
अवेश खानची भेदक गोलंदाजी; लखनौचा अविश्वसनीय विजय
अवेश खानच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांना २ धावांनी धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं.
यशस्वी जैस्वाल-रियान पराग भागीदारीने राजस्थान स्थिर
रियान पराग आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करत राजस्थानच्या विजयाची पायाभरणी केली.
शार्दूलने केलं नितीश राणाला बाद
शार्दूल ठाकूरने अनुभवी नितीश राणाला बाद केलं.
पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी बाद
१४व्या वर्षी आयपीएल पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी बाद होऊन तंबूत परतला आहे. एडन मारक्रमच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याला यष्टीचीत केलं. त्याने २० चेंडूत ३४ धावांची खेळी केली. ड्रेसिंगरुममध्ये परतताना वैभवच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पॉवरप्लेमध्ये वैभव-यशस्वीची तुफान फटकेबाजी
१४वर्षीय पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेत ६ षटकात ६१ धावा चोपून काढल्या.
वैभव सूर्यवंशीचा षटकार
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आहे. यासह राजस्थानने पहिल्या षटकात १३ धावा केल्या आहेत.
अब्दुल समदची फटकेबाजी; लखनौ १८०
अब्दुल समदने केलेल्या १० चेंडूत ३० धावांच्या खेळीच्या बळावर लखनौनं १८० धावांची मजल मारली.
वेगवान अर्धशतकानंतर आयुष बदोनी तंबूत
तडाखेबंद अर्धशतकानंतर आयुष बदोनी तंबूत परतला. बदोनीने ३४ चेंडूत ५० धावांची खेळी केली.
हासारंगाने केलं मारक्रमला बाद
वानिंदू हासारंगाने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या एडन मारक्रमला बाद केलं. त्याने ६६ धावांची खेळी केली.
एडन मारक्रमचं अर्धशतक
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी एडन मारक्रमने अर्धशतक पूर्ण केलं आहे.
लखनौनं मिचेल मार्श, निकोलस पूरन आणि ऋषभ पंत यांना ७ षटकात गमावलं आहे.
एडन मारक्रम सुसाट
एडन मारक्रमने राजस्थानविरुद्ध आक्रमक सुरुवात केली आहे.
अंतिम अकरा कसे आहेत?
लखनौ सुपरजायंट्स
एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, अवेश खान.
इम्पॅक्ट प्लेयर्स- मयांक यादव, आयुष बदोनी, हिंमत सिंग, शाहबाझ अहमद, मॅथ्यू ब्रीझ्टके
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, रियान पराग, नितीश राणा, ध्रुव जुरेल, शिमोरन हेटमायर, वानिंदू हासारंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.
इम्पॅक्ट प्लेयर्स- वैभव सूर्यवंशी, युधवीर सिंग, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, कुणालसिंग राठोड
१४वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार
१४वर्षीय वैभव सूर्यवंशी लखनौविरुद्ध राजस्थानसाठी पदार्पण करणार आहे. लिलावात राजस्थानने १.१ कोटी रुपये खर्चत वैभवला ताफ्यात समाविष्ट केलं होतं.
लखनौनं टॉस जिंकला; फलंदाजीचा निर्णय
लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला असून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन या लढतीत खेळू शकणार नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत रियान पराग संघाचं नेतृत्व करत आहे.