IPL 2025, RR vs RCB Highlights: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सरस ठरला. यशस्वी जैस्वालच्या ७५ धावांच्या खेळीच्या बळावर राजस्थानने १७३ धावांची मजल मारली. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी दमदार सलामी दिली. या दोघांच्या अर्धशतकांच्या बळावर बंगळुरूने ९ विकेट्सने सहज विजय मिळवला.
IPL 2025 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Highlights : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
बंगळुरूचा राजस्थानवर सफाईदार विजय
तब्बल १० झेल सुटलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थानवर ९ विकेट्सनी विजय मिळवला. विजयासाठी बंगळुरूला १७४ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. फिल सॉल्ट (६५) आणि विराट कोहली (६२) यांच्यासह देवदत्त पड्डीकल (४०) यांच्या खेळींच्या बळावर बंगळुरूने सहज विजय मिळवला.
तत्पूर्वी राजस्थानने यशस्वी जैस्वालच्या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर १७३ धावांची मजल मारली होती. रियान परागने ३० तर ध्रुव जुरेलने ३५ धावांची खेळी केली.
षटकासह विराट कोहलीचं अर्धशतक
वानिंदू हासारंगाच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचत विराट कोहलीने अर्धशतक गाठलं.
फिल सॉल्ट माघारी
६५ धावांची वेगवान खेळी करून फिल सॉल्ट तंबूत परतला. कुमार कार्तिकेयने त्याला बाद केलं.
बंगळुरुची जोरदार सुरुवात; सॉल्ट आक्रमक
फिल सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीने बंगळुरूला पॉवरप्लेच्या ६ षटकात ६५ धावांची खणखणीत सलामी करून दिली.
राजस्थानने बंगळरूला दिलं १७४ धावांचं लक्ष्य
राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
रियान पराग बाद
३० धावांची खेळी करून रियान पराग बाद झाला. यश दयाळच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याचा झेल टिपला.
यशस्वी जैस्वालचं अर्धशतक
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम अर्थात घरच्या मैदानावर प्रचंड उकाडा आणि आर्द्र वातावरणात खेळताना राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अर्धशतक पूर्ण केलं.
कृणाल पंड्याने मिळवून दिला ब्रेकथ्रू
डावखुरी फिरकीपटू कृणाल पंड्याने पहिल्याच षटकात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला तंबूत परतावलं.
राजस्थानची पॉवरप्लेमध्ये सावध सुरुवात
संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे.
राजस्थान संघात फरुकीच्या जागा हासारंगा
घरच्या मैदानावर होणाऱ्या लढतीसाठी राजस्थान संघात वानिंदू हासारंगाचं पुनरागमन झालं आहे.