IPL 2025, SRH vs PBKS Live Match Updates: अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकाच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २४६ धावांचं डोंगराएवढं लक्ष्य सहजी पार करून दाखवलं. आयपीएलच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या विक्रमी विजयाचा केंद्रबिंदू ठरला युवा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेकने पंजाबच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवत अवघ्या ४० चेंडूतच शतक गाठलं. अभिषेकने ५५ चेंडूत १४१ धावांची अविश्सनीय खेळी साकारली. अभिषेक आणि ट्रॅव्हिस जोडीने १२.२ षटकात १७१ धावांची तडाखेबंद सलामी दिली. या भागीदारीनेच हैदराबादच्या विजयाचा पाया रचला.
IPL 2025 Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Highlights: आयपीएल २०२५ सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स
अभिषेक शर्माचं अविश्सनीय शतक
युवा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने ४० चेंडूतच शंभरी पार केली. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत अभिषेकने विक्रमी शतक पूर्ण केलं.
पंजाबला अखेर मिळाली विकेट; ट्रॅव्हिस हेड बाद
१२.२ षटकात १७१ धावांची भागीदारी केल्यानंतर ट्रॅव्हिस हेड तंबूत परतला. चहलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. हेडने ३७ चेंडूत ६६ धावांची खेळी केली.
हेड-अभिषेकचा झंझावात
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीच्या झंझावातासमोर पंजाबचे गोलंदाज निष्प्रभ ठरले आहेत. या जोडीने ११व्या षटकात दीडशे धावा चोपून काढल्या आहेत.
हैदराबादची वादळी सुरुवात
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी हैदराबादला झंझावाती सुरुवात करून दिली आहे. २४६ धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला पॉवरप्लेमध्ये अधिकाअधिक धावा करणं गरजेचं आहे.
SRH vs PBKS live: चौकारांची हॅटट्रिक
पहिल्या षटकात हेडने ९ धावा केल्यानंतर दुसऱ्या षटकात अभिषेक शर्माने १९ धावा कुटल्या आहेत. त्याने अखेरच्या चौकारांची हॅटट्रिक केली. तर षटकात ४ चौकार लगावले आहेत. यासह हैदराबादने २ षटकांत २८ धावा केल्या आहेत.
SRH vs PBKS: पहिल्याच षटकात चौकार
पंजाबने दिलेल्या २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने आपल्या अंदाजात फटकेबाजीला सुरूवात केली आहे. हेडने पहिल्याच षटकात दोन चौकार लगावले आहेत.
मोहम्मद शमीच्या ४ षटकात ७५ धावा
पंजाबच्या फलंदाजांनी शमीच्या गोलंदाजीवर तुटून पडत ७५ धावा वसूल केल्या. आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा देण्याचा नकोसा विक्रम जोफ्रा आर्चरच्या नावावर आहे. आर्चरने ७६ धावा दिल्या होत्या.
पंजाबने उभारला २४५ धावांचा डोंगर
मार्कस स्टॉइनसच्या टोलेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने हैदराबादविरुद्ध २४५ धावांची मजल मारली. स्टॉइनसने मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकात चार षटकार लगावले. शमीने या षटकात एकूण २७ धावा दिल्या. स्टॉइनसने ११ चेंडूत ३४ धावांची खेळी केली.
श्रेयस अय्यरही माघारी; ३६ चेंडूत ८२ धावांची खेळी
हर्षल पटेलने ग्लेन मॅक्सवेल पाठोपाठ शतकाकडे कूच करणाऱ्या श्रेयस अय्यरला बाद केलं. त्याने ३६ चेंडूत ८२ धावांची खेळी केली.
ग्लेन मॅक्सवेलचा आत्मघातकी फटका
खेळपट्टीवर स्थिरावण्याआधीच रिव्हर्स लॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न ग्लेन मॅक्सवेलच्या अंगलट आला.
हर्षल पटेलने शशांक सिंगला धाडलं माघारी
हर्षल पटेलने धोकादायक शशांक सिंगला खेळपट्टीवर स्थिरावू दिलं नाही.
मलिंगाचा अचूक लक्ष्यवेध
इशान मलिंगाने उत्तम फॉर्मात असलेल्या इशान मलिंगाला पायचीत करत पंजाबच्या धावगतीला वेसण घातली.
श्रेयस अय्यरचं अर्धशतक
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने झंझावाती फॉर्म कायम राखत हैदराबादविरुद्धही अर्धशतक झळकावलं.
पंजाब सुसाट
आक्रमण हाच पवित्रा स्वीकारून खेळणाऱ्या हैदराबादचा फंडा पंजाबने अवलंबला आहे. पंजाबने १० षटकात १२० धावांची मजल मारली आहे.
SRH vs PBKS Live: मलिंगाच्या खात्यात पहिली विकेट
आपला पहिला सामना खेळत असलेला इशान मलिंगाला पहिल्याच सामन्यातील पहिल्या षटकात विकेट मिळाली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात इशान मलिंगा या गोलंदाजाला संधी दिली. त्याने सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर वादळी फटकेबाजी करणाऱ्या प्रभसिमरन सिंगला झेलबाद केले. प्रभसिमरन सिंग २३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा करत बाद झाला.
प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्या वादळी सुरूवातीनंतर पंजाब किंग्सने पॉवरप्लेमध्येच ६ षटकांत १ बाद ८९ धावांचा टप्पा गाठला आहे. आयपीएलमधील ही दुसरी सर्वात मोठी पॉवरप्लेमधील धावसंख्या आहे. प्रियांश आर्य ३६ धावा करत बाद झाला. तर प्रभसिमरन सिंग २० चेंडूत ४१ धावा तर श्रेयस अय्यर ९ धावांवर खेळत आहे.
SRH vs PBKS Live: प्रियांश आर्य झेलबाद
हर्षल पटेलची धुलाई करताना अखेरच्या षटकात प्रियांश आर्य मोठा फटका खेळण्याच्या नादात चौथ्या षटकात झेलबाद झाला. प्रियांश आर्य १३ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावा करत बाद झाला. यासह पंजाबने ४ षटकांत १ बाद ६६ धावा केल्या आहेत.
SRH vs PBKS Live: प्रियांश-प्रभसिमरनची वादळी फटकेबाजी
प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्यच्या जोडीने ३ षटकांत ५३ धावा केल्या आहेत. प्रियांश आर्य १० चेंडूत २९ धावा तर प्रभसिमरन ८ चेंडूत २३ धावा करत खेळत आहे.
सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स सामन्याला सुरूवात झाली आहे. हैदराबादकडून मोहम्मद शमी गोलंदाजीला सुरूवात करत आहे. तर पंजाबकडून शतकवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगची जोडी उतरली आहे. प्रभसिमरनने मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर सलग तीन चौकार लगावत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे.
SRH vs PBKS Live: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, इशान मलिंगा
सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स सामन्याची नाणेफेक पंजाब किंग्स संघाने जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. हैदराबादच्या संघाता नवा गोलंदाज इशान मलिंगाची एन्ट्री झाली आहे.
SRH vs PBKS:विस्फोटक फलंदाजीच हैदराबादची मोठी कमजोरी
सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी फळी खूप विस्फोटक आहे. पण हीच फलंदाजी फळी संघाची कमजोरी ठरत आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, इशान किशन, नितीश रेड्डी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.
श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.
SRH vs PBKS: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, वियान मुल्डर, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा, सचिन बेबी.