मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढतीत मुंबईचा विजय झाला. पाच गडी राखून मुंबईने दिल्लीला धूळ चारली. मुंबईचा विजय झाल्यामुळे बंगळुरु संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मैदानात न उतरता मिळालेल्या या यशमामुळे बंगळुरु संघातील खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केले. विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस यांच्यासह अन्य खेळाडूंच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. आरसीबीच्या याच सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> दिल्लीविरोधातील सामन्यात मुंबईचा विजय, फायदा मात्र बंगळुरुला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आरसीबीचा प्लेऑफमधील प्रवेश हा मुंबईच्या कामगिरीवर अवलंबून होता. मुंबईचा विजय झाला तरच बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार होता. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला असता तर बंगळरुचे आव्हान संपुष्टात आले असते. याच कारणामुळे बंगळुरुचे खेळाडू मुबई इंडियन्स संघाला पाठिंबा देताना दिसले. तसेच बंगळुरुचे सर्वच खेळाडू मुंबई विरुद्ध दिल्ली हा सामना एकत्र पाहत होते. या सामन्यात मुंबईने दिल्लीला पाच गडी राखून पराभूत केल्यानंतर बंगळुरुच्या संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. बंगळुरुचे विराट कोहली, कर्णधार फॅफ डू प्लेसिस यांच्यासारखे आघाडीचे खेळाडू मुंबईच्या विजायाचा आनंद साजरा करताना दिसले.

हेही वाचा >> DRS का घेतला नाही? खुद्द ऋषभ पंतने सांगितलं कारण; दुसऱ्यांवर फोडलं अपयशाचं खापर

मुंबईच्या विजयामुळे बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. त्यामुळे विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस यांनी मुंबईला धन्यावाद दिले. या सामन्यात दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली. या सामन्यात मुंबईचा फलंदाज टीम डेव्हिड याने चांगली कामगिरी केली. त्याने ११ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या.

Story img Loader