मूळचा दिल्लीकर, मात्र आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विराट कोहलीने फिरोझशाह कोटलाच्या खेळपट्टीचा नूर अचूक ओळखत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली डेअरडेव्हिल्सला अवघ्या ९५ धावांत गुंडाळत चॅलेंजर्सच्या वेगवान गोलंदाजांनी कोहलीचा निर्णय अचूक असल्याचे सिद्ध केले. विजयासाठी मिळालेल्या नाममात्र लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेलने चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह रविवारी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दहा विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध ख्रिस गेलला यंदाच्या हंगामात सूर गवसला नव्हता. मात्र अल्पशा लक्ष्यासमोर खेळताना गेलने प्रत्येक चेंडूवर टोलेबाजी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. डॉमिनिक मुथ्युस्वामीच्या पहिल्या षटकात गेलने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. दिल्लीचा कर्णधार जेपी डय़ुमिनीने सहा गोलंदाजांचा प्रयोग केला. मात्र एकाही गोलंदाजांना गेलला रोखता आले नाही. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत गेलने आपल्या विक्रमी २००व्या ट्वेन्टी-२० सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. गेलने ४० चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. विराट कोहलीने त्याला चांगली साथ देताना २३ चेंडूत ६ चौकारांसह ३५ धावा केल्या.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वेगवान गोलंदाजांच्या भेदक आक्रमणासमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला पायचीत करत मिचेल स्टार्कने दणक्यात सुरुवात केली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडू खेळण्याचा कर्णधार जे पी डय़ुमिनीचा प्रयत्न फसला. डेव्हिड वाइसने त्याला बाद केले. त्याने १३ धावा केल्या.

लिलावात सर्वाधिक बोली मिळवणारा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराजची सिंगची अपयशाची परंपरा या सामन्यातही खंडित होऊ शकली नाही. त्याने फक्त २ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला मयांक अगरवाल इक्बाल अब्दुल्लाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने २७ धावांची खेळी केली. वरुण आरोनच्या उसळत्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूज तंबूत परतला. त्यालाही भोपळा फोडता आला नाही. नॅथन कोल्टिअर-नीलला वाइसने पायचीत पकडले. स्टार्कने अमित मिश्रा आणि शाहबाझ नदीम यांना त्रिफळाचीत करत दिल्लीचे शेपूट वळवळणार नाही याची काळजी घेतली. एका बाजूने विकेट्स पडत असताना केदार जाधवने ३३ धावांची खेळी केली. दिल्लीचा डाव ९५ धावांतच संपुष्टात आला. मिचेल स्टार्कने २० धावांत ३ तर वरुण आरोन तसेच डेव्हिड वाइस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : १८.२ षटकांत सर्वबाद ९५ (केदार जाधव ३३, मयांक अगरवाल २७; मिचेल स्टार्क ३/२०, डेव्हिड वाइस २/१८, वरुण आरोन २/२४) पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १०.३ षटकांत बिनबाद ९९ (ख्रिस गेल नाबाद ६२, विराट कोहली नाबाद ३५)
सामनावीर : वरुण आरोन