धुवांधार पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना रद्द करण्यात आला.  शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला तसेच रविवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिला. पंचांनी मैदानाची वारंवार पाहणी केली. दोन तासानंतर पाऊस थांबला. मात्र मैदान निसरडे होते. चाहत्यांसाठी ५ षटकांचा सामना खेळवण्याची शक्यता होती. मात्र पावसामुळे मैदान निसरडे असल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 8 rr back on top after rain washes out eden contest