इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी २३ डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल २०२३ मिनी लिलाव पार पडला. या लिलावात सर्वच संघांनी आपल्याला महत्त्वपूर्ण असलेल्या खेळाडूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघात सामील करून घेतले. या लिलावावेळी प्रसारण वाहिनीसाठी काही माजी क्रिकेटपटू एक्सपर्ट म्हणून जोडले गेले होते. त्यावेळी जिओ सिनेमावरील एका कार्यक्रमात वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल व भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या दरम्यान एक घटना घडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आयपीएल २०२३ साठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता चाहते मैदानावरील लाइव्ह अॅक्शनची वाट पाहत आहेत. ख्रिस गेल २०२१ च्या हंगामापर्यंत पंजाब किंग्जचा भाग होता. आता त्याने आयपीएलमधून निवृत्तीही घेतली आहे. हा डावखुरा कॅरेबियन फलंदाज सर्वसाधारणपणे अतिशय हसरा-खेळता प्रसन्न व्यक्तिमत्त्व मानला जातो, मात्र जिओ सिनेमाच्या लाइव्ह शोदरम्यान त्याने आपल्या खास शैलीत पंजाब संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा क्लास घेतला. त्याने कुंबळेला मजेशीर टोमणा मारला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ख्रिस गेल अत्यंत विनोदी पद्धतीने अनिल कुंबळेला त्याच्या चुकीची आठवण करून देताना दिसत आहे. वास्तविक, लाइव्ह चॅट शो दरम्यान, गेल म्हणाला, “मी कदाचित नशीबवान आहे. किंवा मी काय बोलू (कुंबळेकडे बघून). मी अनेक प्रसंगी भाग्यवान आहे. अनिल आता तिथे नाही. तो संघाचा भाग होता, म्हणून त्याने मला संघातून वगळले. यामुळेच आता तोही माझ्यासोबत इथे बसला आहे. आता त्यांनी अनिललाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला समजले आहे. मला आशा आहे की आपल्या दोघांसाठी ही वेळ केवळ चांगल्यासाठी असेल.”
यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन आणि स्कॉट स्टायरिसही बसले होते, ज्यांना गेलचा विनोद समजला. तेव्हा गेल म्हणाला, “आम्ही दोघे एकाच ठिकाणी होतो.” आयपीएल लिलावावेळी या लिलावाचे थेट प्रक्षेपण करत असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कुंबळे व गेल हे एक्सपर्ट म्हणून सहभागी झालेले. गेल हा आपल्या मजेदार स्वभावासाठी ओळखला जातो. तसेच कुंबळे हे शांत व तितकेच परखडही आहेत.
पंजाब किंग्जचा प्रवास आयपीएल २०२२ दरम्यान १० संघांच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर संपला. दीड दशकापासून आयपीएलचे आयोजन केले जात आहे परंतु आतापर्यंत या फ्रँचायझीला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. गेल्या मोसमातील खराब कामगिरीनंतर फ्रँचायझी मालकांनी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. गेल हा २०१८ व २०१९ या आयपीएल हंगामामध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होता. त्याचवेळी कुंबळे हे देखील संघाचे प्रशिक्षक होते. पंजाबसाठीच खेळत असताना गेल याला खराब कामगिरीमुळे आयपीएलमधून बाजूला व्हावे लागले. दुसरीकडे अनिल कुंबळे यांनी तब्बल पाच वर्ष पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले. मात्र, एकदाही ते संघाला विजयी करू शकले नाहीत. याच कारणाने आयपीएल २०२२ नंतर त्यांना आपल्या पदावरून हटवले गेले. सध्या ते समीक्षक व समालोचक म्हणून काम करतात.