सध्या आयपीएलची जोरदार तयारी सुरु आहे. आशा-निराशेच्या खेळात ८७ जागांसाठी झालेल्या आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव संपन्न झाला. त्यात तब्बल ४०५ खेळाडूंनी नशीब आजमावले. आयपीएलचा हा मिनी लिलाव कोचिन येथे पार पडला. नेहमीप्रमाणेच काही खेळाडूंना अपेक्षापेक्षा जास्त रक्कम मिळवली तर काहींना साधा खरेदीदार देखील मिळाला नाही. या लिलावात देखील असेच चित्र बघायला मिळाले. लिलावात सामील झालेल्या दोन सख्ख्या भावांसाठी ऊनसावलीची परिस्थिती बघायला मिळाली. सॅम करन आणि टॉम करन हे दोन सख्खे भाऊ आयपीएलच्या लिलावात सामील होते.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलच्या या मिनी लिलावात सॅम करन कोट्याधीश झाला. पंजाब किंग्ज संघाने त्याला तब्बल १८.५० कोटी रुपयांना खरेदी करत आपल्या संघात सामील केले. सॅम करन याने यंदाच्या टी२० विश्वचषात अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंडला संघाला विश्वविजेता बनवण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. आयपीएलमध्ये त्याने आधी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी मोलाची कामगिरी केली होती. आता तो पंजाब किंग्ज संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.दुसऱ्या बाजुला त्याचा भाऊ टॉम करन याला खरेदीदार न मिळाल्याने अनसोल्ड राहिला. या लिलावात त्याच्यामध्ये कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. टॉम हा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र, तो यावेळी जास्त प्रभाव पाडू शकला नाही.

कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. काही अनक‌ॅप्ड खेळाडूही करोडपती झाले. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, नामिबियाचा डेव्हिड विसे आणि आयर्लंडचा जोशुआ लिटल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. आजच्या आयपीएल लिलावात २९ परदेशी खेळाडूंसह ८० जणांना करारबद्ध केले गेले आणि त्यासाठी १६७ कोटी रुपये मोजले गेले.

‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा हा सोलावा हंगाम असणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने चारवेळा हा चषक जिंकला. यंदाचा आयपीएल चषक कोणत्या संघाच्या झोळीत जाणार हे पाहण्यासारखा असेल. रॉयल चॅलेंजर बंगलोर अजूनही त्यांचा पहिला वहिला चषक मिळवण्याची वाट बघत आहे.

हेही वाचा: IPL Auction 2023: “जिथून सुरु केलं तिथेच परत…” चेन्नईकडून पंजाबकडे पोहचल्यावर सॅम करन झाला व्यक्त, स्टोक्सने येलो कलर केला ट्विट

हैदराबादने जम्मू काश्मीरचा विव्रांत शर्मासाठी ५.५० कोटी मोजले आणि त्याला संघात घेतले. ४० वर्षीय अमित मिश्रा ५० लाख मुळ किमतीत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात. पियुष चावला ५० लाख मुळ किमतीत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला. न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सन हा १ कोटींत सीएसकेच्या संघात आला आणि नामिबिया आणि सेंट ल्युसिया किंग्सचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विसे याची १ कोटींत कोलकाताने निवड केली. टी२० विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा आयर्लंडचा जोश लिटल याला गुजरात टायटन्सने ४.४ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएल खेळणारा तो आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्स यांनीही बोली लावली होती.

यंदाच्या पर्वातील टॉप महागडे खेळाडू…

पंजाब किंग्स – सॅम कुरन ( १८.५० कोटी) मुंबई इंडियन्स – कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी) चेन्नई सुपर किंग्स – बेन स्टोक्स ( १६.२५ कोटी) लखनौ सुपर जायंट्स – निकोलस पूरन ( १६ कोटी) सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी) सनरायझर्स हैदराबाद- मयांक अग्रवाल ( ८.२५ कोटी) गुजरात टायटन्स – शिवम मावी ( ६ कोटी) राजस्थान रॉयल्स – जेसन होल्डर ( ५.७५ कोटी) दिल्ली कॅपिटल्स – मुकेश कुमार ( ५.५० कोटी) सनरायझर्स हैदराबाद – हेनरीच क्लासेन ( ५.२५ कोटी)

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2023 ipl auction finished the fortune of 80 players shined in the auction that lasted for six hours avw