आयपीएल २०२३ च्या लिलावात सर्वाधिक पैसे घेऊन उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने आपला पैसा प्रचंड खर्च केला आहे. टीम सीईओ काव्या मारन हिने लिलावाच्या सुरुवातीला वारेमाप पैसे खर्च करण्यापासून स्वतःला रोखले नाही. मात्र, जे खेळाडू हैदराबादने विकत घेतले तेवढे पैसे खर्च करून बहुतेकांना ते पसंत पडले नाहीत आणि त्यामुळेच काव्याला ट्विटरवर खूप ट्रोल केले जात आहे.
सनरायजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन लिलावाच्या सुरुवातीपासूनच खूप चर्चेत होती. तिचे फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र काल ती वेगळ्याच कारणाने आता ट्रोल झाली. तिने लिलावात सुरुवातीपासून बक्कळ पैसा खर्च केला. सर्वात आधी म्हणजे सुरुवातीच्या फेरीमध्येच तिने इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुक याच्यासाठी तब्बल १३.२५ कोटी खर्च केले. या खरेदीनंतर ती आनंदीही दिसली, ज्यानंतर तिने केलेल्या या बेभान खर्चावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
हैदराबादने लिलावात काय केले?
हैदराबादने हॅरी ब्रूकच्या रूपाने लिलावात सर्वात महागडी खरेदी केली. ब्रूकला खरेदी करणे हैदराबादसाठी थोडे अवघड झाले आहे कारण त्यांनी ब्रूकसाठी १३ कोटींहून अधिक खर्च केले आहेत, परंतु त्याला मधल्या फळीत बसवण्यासाठी विद्यमान खेळाडूंपैकी एकाला स्थान द्यावे लागेल. हैदराबादने मयंक अग्रवालला आठ कोटींहून अधिक रुपयांना खरेदी करून धोका पत्करला आहे. मात्र, मयंक ओपनिंग करून स्वत:ला सिद्ध करू शकतो.
यानंतर हैदराबादने हेनरिक क्लासेनला ५.२५ कोटी रुपयांना विकत घेऊन विचित्र गोष्ट केली कारण विकेटकीपर फलंदाज असल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे लागेल. क्लासेनला विकत घेऊन प्लेइंग इलेव्हनची निवड करणे अवघड करण्याबरोबरच हैदराबादने त्याला भरपूर पैसेही दिले. या गोष्टींसाठी काव्याला ट्रोल केले जात आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका ट्विटवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘”काव्याने सुरुवातीला दोन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी २२ कोटी रुपये खर्च केले. कृपया सांगा की हे रत्न नेमके आहेत तर कोण? असे म्हणत हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल याचे फोटो ट्विट केले. चित्रपटाचा फोटो शेअर करताना आणखी एका यूजरने लिहिले की, “काव्याला सांगायचे आहे की जर एखादी महागडी वस्तू सापडली नाही, तर स्वस्त वस्तू महाग करून कशी विकत घेतात.” दुसर्या यूजरने लिहिले, “काव्या येथे खरेदी करत आहे (लिलाव). या सगळ्याशिवाय काव्या मारनचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हॅरी ब्रूक विकत घेतल्यानंतर काव्याची प्रतिक्रिया दिसत आहे. काव्या खूप खुश दिसत होती.”