Venkatesh Iyer IPL Mega Auction 2025: कोलकाता नाईट रायडर्स संघाने संघाची उत्कृष्ट फलंदाज व्यंकटेश अय्यरसाठी तिजोरी रिती केली आहे. व्यंकटेश अय्यरसाठी केकेआर आणि आरसीबीमध्ये बिडिंग वॉर रंगलं होतं. दोन्ही संघ एकामागून एक मोठी बोली लावत होते. अखेरीस २३ कोटींच्या वर बोली गेल्यानंतर आरसीबीने माघार घेतली पण केकेआरचा संघ अखेरपर्यंत व्यंकटेशला संघात कायम ठेवण्यासाठी दटून राहिला होता. अखेरीस कोलकाता संघाने २३.७५ कोटींना व्यंकटेश अय्यरला संघात पुन्हा सामील करून घेतले. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतनंतर व्यंकटेश अय्यर आयपीएल २०२४ च्या लिलावातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्यंकटेश अय्यर कॅप्ड अष्टपैलूंच्या चौथ्या सेटचा भाग होता. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. केकेआरने व्यंकटेशसाठी पहिली बोली लावली होती. त्याच्याशिवाय लखनौ सुपर जायंट्सनेही बोली लावली. केकेआरने ७.७५ कोटी रुपयांची बोली लावली तेव्हा लखनौने माघार घेतली आणि इथून आरसीबीची बोली लावली. दोन्ही संघांनी २० कोटी रुपयांपर्यंत सलग बोली लावली. अखेरीस आरसीबीने माघार घेतली.

हेही वाचा – IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?

व्यंकटेश आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. संघाचा कर्णधार राहिलेल्या श्रेयस अय्यरला आयपीएल संघाने इतकी मोठी बोली लावली नव्हती, तितकी मोठी बोली व्यंकटेश अय्यरसाठी लावली आहे. श्रेयस अय्यर सध्याच्या घडीला उत्कृष्ट फॉर्मात आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी बोली लागली होती. व्यंकटेश अय्यर हा भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाही, तरीही त्याच्यावर इतकी मोठी बोली का लावण्यात आली अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – Rishabh Pant IPL Mega Auction 2025: ऋषभ पंतसाठी लखनौची विक्रमी बोली, अय्यरला मागे टाकत काही मिनिटात ठरला सर्वात महागडा खेळाडू