IPL Mega Auction 2025 Day 1 Marquee Players List: आयपीएल मेगा लिलाव २०२५ मध्ये सर्व १२ मार्की खेळाडू विकले गेले आहेत. काहींसाठी आरटीएम कार्ड वापरण्यात आले तर काहींना दुसऱ्या फ्रँचायझीकडून मोठी रक्कम देण्यात आली. आयपीएल २०२४ चा विजेता कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज संघात सामील झाला आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला. त्याच वेळी, गेल्या मोसमात एलएसजीचा कर्णधार असलेला केएल राहुल यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. या मोसमात आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरला आहे. पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. संघांनी १२ खेळाडूंवर १८०.५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IPL Mega Auction 2025 Live Updates : पहिल्या दोन सेटमध्ये पंत-अय्यरसह ‘हे’ खेळाडू झाले मालामाल

ऋषभ पंत या हंगामातीलच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आणि तो आयपीएलमधील दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला. या यादीत तिसरे नाव अजूनही मिचेल स्टार्कचे आहे, ज्याला गेल्या वर्षी KKR कडून २४.७५ कोटी रुपये मिळाले होते. मात्र, यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. डीसीने त्याला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतले.

हेही वाचा – Rishabh Pant IPL Mega Auction 2025: ऋषभ पंतसाठी लखनौची विक्रमी बोली, अय्यरला मागे टाकत काही मिनिटात ठरला सर्वात महागडा खेळाडू

महागडे खेळाडू

मार्की प्लेयरच्या पहिल्या सेट मध्ये, अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जने RTM द्वारे १८ कोटी रुपयांना विकत घेतले. श्रेयस अय्यरलाही पंजाबने विकत घेतले. गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटींना खरेदी केले. ऋषभ पंत लखनौला, तर मिचेल स्टार्क दिल्लीत सहभागी झाला आहे. कागिसो रबाडाला गुजरातने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. मार्की प्लेयरच्या दुसऱ्या सेटमध्ये, मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने १० कोटींमध्ये विकत घेतले. डेव्हिड मिलरवर लखनौने ७.५० कोटी रुपये खर्च केले. युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने १८ कोटींना विकत घेतले. मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्सने १२.२५ कोटींना विकत घेतले. लियाम लिव्हिंगस्टोन ८.७५ कोटी रुपयांना आरसीबीमध्ये सामील झाला आहे. केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींना विकत घेतले.

हेही वाचा – Shreyas Iyer IPL 2025 Auction: २६.७५ कोटी! श्रेयस अय्यर ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्सने लावली तगडी बोली

खेळाडू क्र.खेळाडूफलंदाजयगोलंदाजदेशलिलावातील किंमत
१.जोस बटलरयष्टीरक्षकइंग्लंड१५.७५ कोटी
(गुजरात टायटन्स)
२.श्रेयस अय्यरफलंदाजभारत२६.७५ कोटी रुपये (पंजाब किंग्स)
३.ऋषभ पंतयष्टीरक्षकभारत२७ कोटी (लखनौ सुपर जायंट्स)
४.कगिसो रबाडागोलंदाजदक्षिण आफ्रिका१०.७५ कोटी (गुजरात टायटन्स)
५.अर्शदीप सिंगगोलंदाजभारत१८ कोटी रुपये (पंजाब किंग्स)
६.मिचेल स्टार्कगोलंदाजऑस्ट्रेलिया११.७५ कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
७.युझवेंद्र चहलगोलंदाजभारत१८ कोटी रुपये (पंजाब किंग्स)
८.लियाम लिव्हिंगस्टोनअष्टपैलूइंग्लंड८.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
९.डेव्हिड मिलरफलंदाजदक्षिण आफ्रिका७.५० कोटी (लखनौ सुपर जायंट्स)
१०.केएल राहुल यष्टीरक्षकभारत१४ कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
११.मोहम्मद शमीगोलंदाजभारत१० कोटी रुपये (सनरयझर्स हैदराबाद)
१२.मोहम्मद सिराजगोलंदाजभारत१२.२५ कोटी (गुजरात टायटन्स)
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2025 which players are in first 2 marquee sets of mega auction whose base price is 2 crore bdg