IPL Auction 2025 Day 2 Updates in Marathi: आयपीएल लिलाव 2025 मध्ये अनेक विविध खेळाडूंवर बोली लावण्यात आली. भारताचे आणि विदेश कॅप्ड खेळाडूंवर तर विक्रमी बोली लागल्या. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल हे सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीतील खेळाडू आहेत. पण भारताच्या एका अनकॅप्ड खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियांश आर्यला पंजाब किंग्स संघाने २.८० कोटींची बोली लावत संघात दाखल केले. त्याची मूळ किंमत ३० लाख होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांश आर्य याने दिल्ली प्रिमीयर लीगमधील आपल्या कामगिरीने लक्ष वेधलं होतं. दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2024) मधून प्रसिद्धीझोतात आलेला युवा फलंदाज प्रियांश आर्यला भविष्यातील सुपरस्टार म्हटले जात आहे. जेव्हा त्याचे नाव आयपीएल लिलावात आले तेव्हा या लीगच्या फ्रँचायझींनी त्याच्यावर मोठी बोली लावली. या खेळाडूला खरेदी करण्यासाठी दिल्ली, मुंबई, पंजाब आणि बेंगळुरूमध्ये मुकाबला झाला.

हेही वाचा – IPL Mega Auction 2025 Live Updates: लिलावातील सर्वात कमी वयाच्या खेळाडूवर १ कोटींची बोली, १३ वर्षीय खेळाडूला कोणी खरेदी केलं?

३० लाखांच्या मूळ किंमतीसह सुरू झालेल्या या खेळाडूची बोली ३ कोटी ८० लाख रुपयांवर थांबली, जेव्हा पंजाब किंग्सने (पीबीकेएस) त्याला खरेदी केले. प्रियांश आर्यवरील ही ३ कोटी बोली मोठी मानली जात आहे, यामागचे कारण म्हणजे तोपर्यंत सर्व संघांच्या पर्समधील पैसे खूपच कमी झाले होते. पण प्रियांशने आपल्या कामगिरीने प्रभावित केल्याने संघांनी त्याला संघात घेण्यासाठी चांगलीच ओढाओढ दाखवली.

हेही वाचा – Allah Ghazanfar IPL 2025 Auction : मुंबईने घेतलाय रहस्यमयी फिरकीपटू, कोण आहे अफगाणिस्तानचा नवा शिलेदार?

कोण आहे प्रियांश आर्य? (Who is Priyansh Arya?)

प्रियांशने आर्यने दिल्ली टी-२० लीगमध्ये उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारून खळबळ उडवून दिली. प्रियांश दिल्ली टी-२० लीगमध्ये दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळत होता. भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळणाऱ्या आर्यने दक्षिण दिल्लीच्या डावात १२व्या षटकात सहा षटकार मारून खळबळ उडवून दिली. डावखुऱ्या आर्यने ५० चेंडूत १० षटकार आणि १० चौकारांसह १२० धावा केल्या, तर त्याने केवळ ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा – IPL 2025 Auction : आयपीएल लिलावात ‘बिहारी बाबू’ मालामाल! मुकेश कुमार आणि आकाश दीपवर लागली करोडोंची बोली

आर्याने गोलंदाज मनन भारद्वाजविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार लगावण्याचा अप्रतिम पराक्रम केला. प्रियांशच्या त्या ऐतिहासिक खेळीमुळे आज पंजाब, दिल्ली आणि आरसीबीने त्याला लिलावात खरेदी करण्यासाठी बोली लावली आणि शेवटी पंजाब किंग्सच्या संघाने बाजी मारली.

दिल्ली प्रीमियर लीगमध्येही त्याने दोन शतकं झळकावली. त्याने या लीगचे पहिले शतक ५५ चेंडूत १०७ धावा करून आणि ५० चेंडूत १२० धावा करून दुसरे शतक झळकावले. तो या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्याने १० सामन्यांमध्ये ६०८ धावा केल्या, ज्यात २ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने या लीगमध्ये ४९ चौकार आणि ४३ षटकार लगावूनन सर्वांना प्रभावित केले. आता तो आयपीएलमध्येही अशीच खळबळ उडवून देईल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2025 who is priyansh arya delhi batter sold for rs 3 8 crore to punjab kings he hits 6 sixes on 6 balls bdg